लिंडेन ची बरणी
लिंडेन व त्याची पत्नी वैज्ञानिक प्रयोग करण्यात पटाईत होते. त्यांना एकेदिवशी Faraday आणि osterd ह्यांच्या प्रयोगविषयी कळाले. ते तारेचे वेटोळे बनवून विद्युत उर्जेचे चुंबकीय उर्जेत आणि नंतर चुंबकीय उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत करत होते. त्यांचे हे अनोखे प्रयोग पूर्ण युरोपात जोमाने पसरत होते. त्यांच्या प्रयोगाची सखोल माहिती वाचल्या नंतर लिंडेनच्या तुलनात्मक मनाने काम चालू केले. जर Inductor हा चुंबकीय उर्जा साठवत असेल तर ह्या जगी असे काहीतरी असेल ज्यात विद्युत उर्जा साठवली जात असावी. हाच प्रश्न त्याचे आयुष्य बनले. खूप प्रयोग करूनही हाती काहीच लागले नाही.