पोपट....
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो,
जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो,
तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते,
तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते,
बर्याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही,
आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही,
मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल,
या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल,