मर्डर ऑनलाईन
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत ,
पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे.
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत ,
पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे.
माणसाचं मन हा प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. मन नक्की कुठं असतं हे सुद्धा अजून स्पष्टपणे कळलेलं नाही. तो शरीराचा अवयव आहे की नुसती कल्पना हेच एक मोठे गौडबंगाल आहे. 'माझ्या मनात विचार आला' म्हणजे नक्की काय झालं ते मलाही सांगता येणार नाही पण माझं अख्खं आयुष्यच त्यावर अवलंबून असतं . मी इतरांशी कसा वागलो,वागतोय आणि इथून पुढे वागणार हे तिथेच ठरतं. मन म्हणजे काहीसं धुक्यात हरवलेला लोहगडाच्या विंचूकाट्यासारखं… ते तिथे आहे हे पक्कं माहित असतं पण धुक्यामुळे कायम अस्पष्ट आणि संदिग्ध….
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार.
मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.
सद्या मिपावर या धाग्यावर जाडे-बारीक मिठ, त्याची चव आणि त्यातले आयोडीन यावर चविष्ट चर्चा चालू आहे. त्याबाबत माझ्या मनात काही विचार आले आणि प्रतिसाद लिहू लागलो. मात्र प्रतिसादाच्या अखेरीस येईपर्यंत माझ्या प्रतिसादाने पाककलेच्या अंगाने जाणार्या सुंदर धाग्याला शास्त्रिय अवांतर होईल असे वाटले. शिवाय प्रतिसादही जरा मोठा होतो आहे असे वाटले. म्हणून मूळ धाग्याची चव बदलून त्याला हायजॅक करण्यापेक्षा नविन धागा बनवून सादर करणे जास्त योग्य वाटले. म्हणून हा प्रपंच (पंच इंटेंडेड ;) .
फ्रान्स नावाचा एक देश होता. तिथे बरेच शास्त्रज्ञ राहायचे/आले. त्यातला एक एके दिवशी एक दगड घेऊन आला नि म्हणाला कि आजपासून याच्या वस्तुमानाला एक किलो म्हणायचे. http://en.wikipedia.org/wiki/Kilogram दुसरा एक छडी घेऊन आला नि म्हणाला कि आजपासून हिच्या लांबीला एक मीटर म्हणायचे. http://en.wikipedia.org/wiki/Metre तिसरा एका द्रव्याचे एक आयसोटोप घेऊन आला नि म्हणाला कि आजपासून या या दोन उर्जास्थितींतून स्थांनांतर करताना याच्यातून एक हजार तरंगलांब्या निघायला जितका वेळ लागतो तो एक सेकंद मानायचे.
महत्वाची सुचना:
पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
मराठी विकिपीडियावरील वि़ज्ञान हा लेख अद्ययावत करू इच्छितो आहे. खालील माहितीचे स्वागत असेल
१) वि़ज्ञान म्हणजे काय (व्याख्या) ?
* उपप्रश्न :
** वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय ? वैज्ञानिक पद्धती कशी अवलंबिली जाते ? सायंटीफीक एनक्वायरी (मराठी शब्द सुचवा) म्हणजे काय ती कशी केली जाते ?
२) वि़ज्ञानाचे आणि वैज्ञानिकांचे उद्दीष्ट/ध्येय/साध्य काय असते ?
३) विज्ञानाची अभिप्रेत कार्ये कोणती ?
४) विज्ञानाची साधने कोणती ?
पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. -