|| मंगलमय दिन ||

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
24 Sep 2014 - 12:44 pm
गाभा: 

अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार.

मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.

प्रतिक्रिया

एस's picture

24 Sep 2014 - 1:16 pm | एस

आता मंगल-अमंगल वैग्रे खुळचट कल्पना कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही.

मंगळबिंगळ ज्यांच्या पत्रिकेत शनी होऊन बसलाय त्यांच्या विषयी सहानुभूती! :-)

बाळ सप्रे's picture

24 Sep 2014 - 5:39 pm | बाळ सप्रे

आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना कमी होतील अशी खुळचट आशा करायला हरकत नाही.

एकिकडे मंगळयान .. दुसरीकडे अर्ज भरायला पितृपक्ष संपण्याची वाट बघणारे उमेदवार !!

सर्वसाक्षी's picture

24 Sep 2014 - 1:19 pm | सर्वसाक्षी

मोहिम यशस्वी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन.
या सर्वांचा अभिमान वाटतो (गर्व हा शब्द हिंदीत 'अभिमान' या अर्थाने वापरतात. मराठीत गर्व म्हणजे अहंकार,माज, आढ्यता)

गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 2:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व हा शब्द मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे ! बरेच जण गर्व म्हणजे महाअभिमान (जास्त वजनदार अभिमान ;) )असे समजतात :)

हिंदीत "गर्व" = मराठीत "अभिमान"

मराठीत "गर्व / घमेंड / अहंकार" = हिंदीत "घमंड / अहंकार"

सर्वसाक्षी's picture

24 Sep 2014 - 4:22 pm | सर्वसाक्षी

गर्वसे कहो हम -- है

सदर घोषणा हिंदी आहे तेव्हा या घोषणेत गर्व हा शब्द योग्यच आहे.

सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही.

ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर तुम्ही लिहिलेल्या चार ओळीतील चुकिच्या शब्दयोजनेबद्दल भाष्य करत होते. "गर्व आहे तुमच्यावर" हे साफ चुकिचे आहे.
हिंदीतून मराठी लिहिण्यापेक्षा मराठीतून मराठी लिहा.

पगला गजोधर's picture

25 Sep 2014 - 9:33 am | पगला गजोधर

अऱ, व्हय कि ऱ मर्दा, म्या कुट नाय म्हन्तो. उगा आपल चिंगळ्या कशापाई चापताय म्हन्तो म्या, तस लइ बारीक बगीतलं तर बाईला बी मिसरूड दिसतया. यशस्वी मंगलयांनाविषयी "पुढें कांय तें बोलां" !

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 11:13 am | टवाळ कार्टा

पण काहिही झाले तरी तुम्ही तुमची चूक मान्य करु"च" नका..टांग उप्परईच होना

पगला गजोधर's picture

25 Sep 2014 - 12:37 pm | पगला गजोधर

क्या मिया, ना दुआ ना सलाम, सिद्दा इधरईकोच घेरनेके क्यु बाता करतंई आप ? मई उदरको, 'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्ते तकरीर करवातै, और इदरको, तुमें मेरेकु गल्तिया निकलते, छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |
सवेरेसवेरे खानसामा दूध की जगह मिर्ची का पावडर पिला दिये क्या !!!

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 12:46 pm | टवाळ कार्टा

छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |

खुद की गलतीयां कुबुल करनेके लिये जिगर अऊर बडा दिल और दिमाग लगता...और ये छोटी छोटी गलतीयोंके वजेसेईच "चलता है" अ‍ॅटिट्युड बनता है जिसके वास्ते देश का कचरा हो रहेला है

पगला गजोधर's picture

25 Sep 2014 - 2:10 pm | पगला गजोधर

'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्तेच इदरको बाता करो मिया.

नानासाहेब नेफळे's picture

25 Sep 2014 - 2:55 pm | नानासाहेब नेफळे

माशाल्ला, क्या खुब उर्दु जुबान है आपकी गजोधरभाई. मंगल पै तश्करी पहुंचने के इस मौके पर पुरी अवाम ज्योतिष पढके उसे नसीब मानने जैसी मनहुस आदतौ से परहेज करेगी, और ये बेकार रिवाज हमारी दिलोदिमाग से हमेशा के लिए हट जायेगा यहिं अल्लाताला से गुजारीश है.

शिद's picture

25 Sep 2014 - 3:02 pm | शिद

तश्करी नाही तश्तरी.

बाकी उपग्रहाला 'उडन तश्तरी' म्हणतात का हे मला माहीत नाही ब्वा.

अहो नेफळेबुवांना तश्करीच म्हणायचे असावे. एकदा का माणूस तिकडं पोचला की तश्करीच सुरू होणार नायतर काय? तिकडचेही गुंठामंत्री तयार होणार =))

हा हा हा. (स्मायल्या कुठं गायबल्या?)

शक्यता नाकारता येत नाही.

मृत्युन्जय's picture

26 Sep 2014 - 11:22 am | मृत्युन्जय

हो ना. तरी राने विकुनच यांनी करोडो कमावले. एरवी नुसते बसुनच असायचे. एवढी मोठ्ठली जमीन होती म्हणुन कसायचे कष्ट घ्यायचेच असे नाही.

अवांतर गंमत म्हणून सांगतो. एका मित्राचे परिचित होते रावेतमध्ये. जागा विकुन प्रचंड पैसा आला हाताशी. जाग विकली तशी गुरेही विकली. एवढा पैसा आल्यावर त्याचे नियोजन करायचे सोडुन साहेबांनी २ ह्मर विकत घेतल्या. ज्या गोठ्यात पुर्वी म्हशी बांधायचा तिथेच मग २ काळ्या कुळकुळीत हमर बांधायला सुरुवात केली. कालांतराने सगळा पैसा उडवला. कसा उडवला देव जाणे. मग हमरही विकल्या. सध्या स्कोर्पियो आहे. ती ट्रॅव्हलच्या धंद्याला लावली आहे.

टवाळ कार्टा's picture

25 Sep 2014 - 3:40 pm | टवाळ कार्टा

=))

नानासाहेब नेफळे's picture

25 Sep 2014 - 3:37 pm | नानासाहेब नेफळे

टायपो मिस्टेक. तश्तरी असे वाचून घ्यावे.

टवाळ कार्टा's picture

24 Sep 2014 - 1:20 pm | टवाळ कार्टा

गर्व आहे तुमच्यावर

आजकाल भलताच फेमस झालाय हा शब्द...लहानपणी आईने चिउताई आणि कावळ्याची गोष्ट नाही सांगितली का??? का तुम्ही इंग्लिश मिडीयमवाले???

सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा!

नानासाहेब नेफळे's picture

24 Sep 2014 - 1:58 pm | नानासाहेब नेफळे

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर करुन पत्रिकावगैरे थोतांडी तत्वज्ञानाने गोरगरिब समाजाला नाडणार्या पोटार्थी लोकांचा बंदोबस्त या देदिप्यमान कामगिरीने होईल अशी अपेक्षा बाळगुया.

काळा पहाड's picture

24 Sep 2014 - 3:21 pm | काळा पहाड

नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला कुणी जबरदस्तीनं सांगितलंय का ज्योतिषाकडे जा म्हणून? ज्योतिषानं कडक मंगळ सांगितलाय म्हणून त्या गोरगरीब समाजातलं कुणी आत्महत्या केलेलं मी काही ऐकलं नाही. पण गोरगरीब शेतकर्‍यांचे पैसे खावून सिंचनाचे पैसे हडप करून त्यांना आत्महत्या करायला लावणार्‍या दरोडेखोर लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे खरं.

विटेकर's picture

24 Sep 2014 - 4:47 pm | विटेकर

काप ,
कडक प्रतिसाद !
काड्या घालू लोकांचा असाच प्रतिवाद करायला हवा.

नानासाहेब नेफळे's picture

24 Sep 2014 - 6:45 pm | नानासाहेब नेफळे

शेतकर्यांचे पैसे, सिंचन घोटाळा

अहो आचार्य ,तुमचे लॉजिकच लावले तर सिंचन घोटाळा करणार्याला निवडुण द्यायला कुणी सांगितलं होतं? जनतेने त्याला दिले निवडुण, त्याचा दोष जन्तेचा... सिंचनघोटाळा करणार्याचा नाही!

काळा पहाड's picture

24 Sep 2014 - 7:03 pm | काळा पहाड

दादांच्या धरणात अंघोळ केलेली दिसतेय! सिंचन घोटाळा करण्यासाठी निवडून दिलेलं नाही, कामं करण्यासाठी निवडून दिलंय. ज्योतिषाकडं जाणारे ज्योतिष ऐकण्यासाठीच जातात. ज्योतिषि करप्शन करत नाही, तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. माझा ज्योतिषावर विश्वास नाही आणि मी जात पण नाही पण तो सांगतो ते विश्वास ठेवायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावू नका. आता एखादा सिनेमा वाईट निघाला तर तुम्ही त्या दिग्दर्शकानं घोटाळा केला असं म्हणता का? की पैसे मागता परत? सिंचन घोटाळा करणार्रे सांगतात की मी चांगलं गव्हर्न्मेंट देईन आणि भ्रस्टाचार करतात. हा फरक आहे. घुसतंय का गुढघ्यात काही?

मृत्युन्जय's picture

24 Sep 2014 - 10:09 pm | मृत्युन्जय

त्यांचे लॉजिक कशाला लावताय. तुमचे स्वतःचेच लावा की. तुम्हाला नाही का?

वाडीचे सावंत's picture

24 Sep 2014 - 9:26 pm | वाडीचे सावंत

सडेतोड उत्तर ..

सवंगडी's picture

24 Sep 2014 - 2:01 pm | सवंगडी

'काय चाललंय'वर सध्या एक पुणेरी प्रतिक्रिया फिरते आहे.
कि, "मंगलयानाचा ६४ कोटी कि.मी.चा प्रवास ४५० कोटी रुपयात झाला, आणि पुण्यात अजून १७ रु. प्रती किलोमीटर ने रिक्षा चालते.
इस्रो वाल्यांनी जरा इकडे पण संशोधन करा म्हणव."

सवंगडी's picture

24 Sep 2014 - 2:05 pm | सवंगडी

"मंगल यान मंगळावर बुधवारी कस काय पोहोचलं ?" -
--आलिया भट ची प्रतिक्रिया.

खटपट्या's picture

25 Sep 2014 - 12:55 am | खटपट्या

हो आणि तेही पित्रुपक्षात !!

रच्याकने - मंगळयान मंगळावर उतरलेले नाही तर मंगळाच्या ओर्बिट (मराठी शव्द ?) मध्ये स्थिर झालेय..

मृत्युन्जय's picture

24 Sep 2014 - 2:54 pm | मृत्युन्जय

भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार.

व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असलेला एक संदेश डकवतो आहे:

****
पुण्यातील बहुचर्चित बीआरटी प्रोजेक्ट आणि मंगलयान मोहिम यासाठी लागलेला खर्च हा एक समान (४५० कोटी आहे). बीआरटीचे यश (???) हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच इस्रोचे जरा जास्तच कौतुक करावेसे वाटते आहे. :)
****

बीआरटीच्या नावाखाली पैसे लाटलेले असल्यास, गोरगरिब समाजाला नाडणार्या आणि जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करणार्‍या पैसेखाऊ माठ राजकारण्यांना आणि संबंधित अधिकार्‍यांना यामुळे कडक चपराक बसेल अशी अपेक्षा बाळगुया.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत... फायदे-तोटे काय (आणि कोणाचे) झालेत हे "क्ष्क्ष्क्ष"लाच ठाऊक.

४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत & Counting .......

चौकटराजा's picture

24 Sep 2014 - 2:55 pm | चौकटराजा

आमच्या पिढीला मी फार भाग्यवान समजतो. ( जे १९५० च्या सुमारास जन्माला आले ते ) १९६९ च्या वर्षात मानव चंद्रावर पोहोचला हे ऑनलाईन अनुभवले. आता ही उपलब्धी. मला वाटते. राजकारण्याची दुषित न केलेले हे एकमेव क्षेत्र असावे. भारतात चांगल्या नागरिकांची वानवा नाही. नाठाळाचे कमरेत लाथ घालण्याची आमची हिंमत नाही . ती आसच नाही हे दुर्दैव. ( ३ कोटी खटले निकालाविना पडून ).भारतीय शास्त्रज्ञानी क्रायोजेनिक नंतर हे आव्हान स्विकारले व पूर्ण केले.
अभिवादन त्याना ! फक्त आता मोदी सरकारने भूमीच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे. आकाशातून भारतीय शेती पहावत नाही.

काळा पहाड's picture

24 Sep 2014 - 3:24 pm | काळा पहाड

ते पण मोदीनीच करायचं का? जाणता राजा आणि त्यांच्या अधिकृत आणि अनधिकृत संघटना कशाला आहेत?

चौकटराजा's picture

25 Sep 2014 - 10:13 am | चौकटराजा

आता जाणता राजा व त्यांच्या संघटना शेवा निवृत्त होनार ! दिवाळी काटेवाडीच्या अंगणात !

शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! !!

अवांतर : चला आता पर-राष्ट्रीय भेटी गाठी झाल्या , यान पण पोचले ..आता जरा ते स्वच्छ भारत अंतर्गत संडासांच पण बघा ..धन्यवाद !

वेल्लाभट's picture

24 Sep 2014 - 3:41 pm | वेल्लाभट

ते २ ऑक्टोबरला आहे. तेंव्हापासून. स्वच्छ भारत !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. "पहिल्या प्रयत्नात मंगळाची सफल सफर" ही अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन सारख्या सधन / प्रगत देशांना न जमलेली गोष्ट साध्य करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक कधिच न मोडला जाणारा विक्रम स्थापन केला आहे. जगात आज भारताची मान खचितच उंचावलेली आहे !!!

याकरिता इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे !

या सुवर्णघडीला पंतप्रधान मोदींनीही इस्रोच्या नियंत्रणकक्षात आपली उपस्थिती नोंदवली हे पण लक्षणीय / सूचक आहे. त्यातही, अपयश आले असते तर त्यात सहभागी असल्याची त्यांची टीप्पणी शास्त्रज्ञांना वेगळाच संदेश आणि हुरुप देउन गेला असणार.

वरच्या दोन्ही गोष्टींचा बोध इतर शासकीय संशोधन संस्था... विषेशतः डीआरडीओ, इ... घेतील असे वाटते. किंबहुना या गोष्टी त्यांच्यावर अशीच काही कर्तबगारी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते.

आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतिय म्हणून अभिमान वाटावयाची क्वचित मिळणारी संधी दिली हे मात्र खरे ! *good*

तिमा's picture

24 Sep 2014 - 3:32 pm | तिमा

भारतातील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन. भारतात नुसतीच आर्थिक व सामाजिक विषमता नाहीये, तर बौद्धिक विषमता पण आहे हे यावरुन सिद्ध झाले.

इस्रो’च्या या गरुडभरारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधनविश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता देशाच्या विज्ञानकुशलतेचे एक तेजस्वी चित्र पहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाचे पदवीधर होते, या गोष्टीचा स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रप्रगतीवर प्रचंड परिणाम झाला. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक खाती आपल्याकडे ठेवलीच पण एक स्वतंत्र `अवकाश संशोधन विभाग’ निर्माण केला. भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय. सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. इंकोस्पार (INCOSPAR) या संस्थेची सन १९६२ मध्ये स्थापना हे या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल होते. `इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ हे या संस्थेचे पूर्ण नाव. अशा संस्था स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी माणसे निवडणे हे काम पंडित नेहरूंनी जातीने केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि संशोधनासाठी त्यांनी होमी भाभा, सेठना यांच्यासारखे तज्ञ शास्त्रज्ञ आणले तर अवकाश संशोधनासाठी विक्रम साराभाई, डॉ. गोवारीकर यांना बोलावून घेतले. विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.

विलासराव's picture

25 Sep 2014 - 12:31 am | विलासराव

विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.

आमचा जन्मही १९६९ चा, पण हा निव्वळ योगायोग समजावा का? नाही म्हनजे आणखीही एक घटना आहे १९६९लाच गोयंकाजी विपश्यना भारतात घेउन आले.

हां, म्हणजे १९६९ साली इस्रो आणि विपश्यना या दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या.

वेल्लाभट's picture

24 Sep 2014 - 3:47 pm | वेल्लाभट

सकाळी टिव्ही लावून बसलो होतो डीडी न्यूज वर लाईव्ह चित्रण दाखवत होते, इस्रो मधील. पंतप्रधानही आले होते. सॉलिड अभिमान वाटला शास्त्रज्ञांचा, आणि भारत देशाच्या या यशाचा. अशाच भरा-या होत राहोत.

अनन्न्या's picture

24 Sep 2014 - 4:02 pm | अनन्न्या

आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! मोदींची उपस्थिती आणि न वाचता सहज केलेले कौतुकही भावले.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 4:45 pm | प्रभाकर पेठकर

भारतिय शास्त्रज्ञांचे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन.
इस्रो: इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....

इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....
भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय.

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Sep 2014 - 6:06 pm | माम्लेदारचा पन्खा

असणारा भारतासारखा देश क़्वचितच असेल…

एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे दारिद्र्य आणि उपासमारी….कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या !!

सुहास..'s picture

24 Sep 2014 - 7:21 pm | सुहास..

आजचे गाणे ..

मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |
मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |
मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |

रमेश आठवले's picture

25 Sep 2014 - 3:53 am | रमेश आठवले

कुमार गंधर्वांनी स्वत निर्माण केलेल्या मालवती या रागातील त्यांचीच ही बंदिश आठवली.
मंगल दिन आज बना घर आयो
आनंद मन भरा बावरी भई मै तो ----
इथे ऐका
https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw