बॅक टु द फ्युचर
युनिव्हर्सल पिक्चर्स स्टुडियोचे 'बॅक टू द फ्युचर' सेरिजचे भन्नाट चित्रपट मध्य ८० च्या दशकात आले होते. कि ज्याची संकल्पना काळाची/चौथी-मितीवर बेतलेली होती. मोटाररुपी टाइम मशीनमध्ये चित्रपट आपल्याला थेट भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे घेवून धावायचा. भविष्यामधील जग कसे असेल? याची चुणूक पाहत असतानाच कथा पुन्हा एकदा त्यावेळच्या 'चालू वर्तमानात' यायची. प्रेक्षकांना मनात माहिती असायचं की, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने चित्रपटात समोर यायचंकी ते नुसते पाहत न राहता त्याचाच एक भाग बनून अनुभवायचे. हे आज आठवण्याचं कारण कि त्या चित्रपटातील भविष्यकाळ, आज आपल्यासाठी वर्तमान आहे.