युनिव्हर्सल पिक्चर्स स्टुडियोचे 'बॅक टू द फ्युचर' सेरिजचे भन्नाट चित्रपट मध्य ८० च्या दशकात आले होते. कि ज्याची संकल्पना काळाची/चौथी-मितीवर बेतलेली होती. मोटाररुपी टाइम मशीनमध्ये चित्रपट आपल्याला थेट भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे घेवून धावायचा. भविष्यामधील जग कसे असेल? याची चुणूक पाहत असतानाच कथा पुन्हा एकदा त्यावेळच्या 'चालू वर्तमानात' यायची. प्रेक्षकांना मनात माहिती असायचं की, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने चित्रपटात समोर यायचंकी ते नुसते पाहत न राहता त्याचाच एक भाग बनून अनुभवायचे. हे आज आठवण्याचं कारण कि त्या चित्रपटातील भविष्यकाळ, आज आपल्यासाठी वर्तमान आहे. (वर्ष २०१५).
त्या चित्रपटातील भविष्यानुसार असणारी ग्याजेटस टेक्नोलोजी, घटना आज आपल्या अवतीभवती आढळतात का ?
काही पूर्णपणे आढळतात (उदा. वायरलेस-विडीओ-गेम्स, ट्याब्लेट्स, विडीओ-कॉन्फरंसिंग, भिंतीवरचे मोठ्या स्क्रीनचे टी वी, ऑटो लेसिंग शुज (नाईके ने परवाच जाहीर केलय ) , आपल डिजिटल उपकरणांच्या आहारी जाणं वै वै) ,
काही अंशतः आढळतात ( फ्लाइंग कार्स, होवरबोर्ड, डीहायड्रेटेड फूड वै वै),
काही तर अजिबात आढळतात नाही (प्रिन्सेस डायना जिवंत असण, अमेरिकेत महिला राष्ट्राध्यक्ष असण, गळ्यात दोन टाय वै वै ).
तुम्हाला आज काय वाटते त्या चित्रपटातील २०१५ ची टेक्नोलोजी बद्दल ? चित्रपटाबद्दल ?….
प्रतिक्रिया
21 Jan 2015 - 10:16 am | मना सज्जना
कल्पनेचा आविष्कार चान्गला आहे
21 Jan 2015 - 11:06 am | पिवळा डांबिस
पहिला भाग नाही पण त्याच्या एका सिक्वेलमध्ये (#२ की ३ हे आता आठवत नाही) पण पाऊस पडत असतो आणि तो डॉक्टर इतके वाजले म्हणजे पाऊस बंद होणार म्हणून सांगतो. आणि बरोबर तितके वाजले की पाऊस बंद होतो.
हे हवामानविषयक तंत्रज्ञान इथेतरी प्रत्यक्षात आलेलं आहे.
पाऊसच काय पण इथे दक्षिण कॅलिफोर्नियात सॅन्टा अॅना नांवाचे सोसाट्याचे वारे दरवर्षी वहातात. पण जर हवामानतज्ञांनी सांगितलं असेल की ते बुवा दुपारी ३.०० वाजता थांबतील तर तुम्ही जर ३.१५ ला बाहेर गेलात तर वारा थांबलेला असतो.
अवांतरः मागे प्रेसिडेन्ट ओबामा भारतभेटीला गेले असतांना भारतीय शेतकर्याला मान्सूनची हालचाल आधीच कळावी म्हणून हे तंत्रज्ञान भारतीय हवामान तज्ञांना द्यावं अशी आम्ही काही जणांनी व्हाईट हाऊसला विनंती केली होती. त्याचं पुढे काय झालं ते माहिती नाही पण भारतीय शेतकर्यांसाठी ते एक अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान आहे, भारत सरकारने ते मिळवायला हवं....
27 Jan 2015 - 11:48 am | अगम्य
hovercraft प्रमाणे चालणारे/उडणारे skateboards दाखवले होते . skateboards मध्ये तर काही प्रगती झली नाही ह्या ३० वर्षात.
27 Jan 2015 - 3:34 pm | हाडक्या
आता तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो, असे उडणारे स्केटबोर्ड बर्यापैकी प्रत्यक्षात आलेत. हा पहा व्हिडो आणि ह्या कंपनीनी ते तयार केलेत. अजून तसे प्रायोगिक तत्वावर आहेत पण काहीतरी प्रगती आहे.
28 Jan 2015 - 9:59 pm | अगम्य
लिंक साठी धन्यवाद. प्रयोगात प्रगती आहे. परंतु सिनेमात दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्ष वापरात यायला आणखी बराच अवधी आहे असे दिसते. असो. भविष्याचा अचूक वेध घेणे सोपे नाही.
29 Jan 2015 - 11:52 am | साधा मुलगा
Back to the future हि माझी Sci-fi चित्रपट मालिकेतली एक आवडती मालिका आहे. या मालिकेच्या यशाचे श्रेय अर्थातच या मालिकेचे निर्माता स्टीवन स्पीलबर्ग यांना द्यावे लागेल.
हे चित्रपट साधारण १९८५ पासून बनवले गेलेले होते. त्यामुळे पुढच्या ३० वर्षात आपण एवढी प्रगती करू शकू असे त्यांना वाटत असावे. अगदी काही बाबतीत जरा जास्त अपेक्षा ठेवल्या गेल्या , जसे कि उडत्या गाड्या,
कचर्यापासून इंधन वगैरे. कदाचित शास्त्रज्ञांनी त्यावेळी याविषयीचे संशोधन सुरु केले असेल आणि ३० वर्षांनी त्याला यश मिळाले असेल असा त्यामागचा विचार असावा.
तरीही काही बाबतीत आपण प्रगती केली आहे असे म्हणावे लागेल. चित्रपटात दाखवलेले TV आणि त्याच्या Screens यापेक्षा आपण चांगल्या स्क्रीन वापरतो, आणि बरीच उपकरणे digital झाली आहेत.
याच स्पिलबेर्ग चा Minority Report नावाचा चित्रपट आहे ज्यात भविष्याचे चित्रण केलेले आहे ते बर्यापैकी logical वाटते.
पण १९८५-९० या काळाच्या मानाने हा चित्रपट अतिशय उत्कृष्ठ बनवला होता.
अवांतर:
तिसर्या भागाच्या अखेरीस डॉक्टरने दिलेला लाखमोलाचा संदेश,
"Your future hasn't been written yet.No one's has. Your future is whatever you make it. So make it a good one."