विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मी
जवळपास तीन महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच. साहजिकच आत्मीय (?) सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे? मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला, धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पाठवीले याची.