वादविवादाच्या आसमंतातील पोकळी
मिपावर मागचे ७-८ महिने फार मस्त गेले. नमो>नी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर केली, आणि त्यांची मोहीम चालू झाली, त्यावर आणि एकंदर गुजरात मॉडेल, वगैरे गोष्टींवर साधक-बाधक चर्चा इथेच झाली. मोदींवर अनेक शतकी, द्विशतकी धागे निघाले, घमासान वादळे झाली. वादविवादाची आवड असलेल्या मराठी माणसाला अगदी मन भरेपर्यंत काथ्याकूट झाले.