एक फार जुना किस्सा आठवला. कंपनीतल्या साऱ्यांनी देवदास बघायचे ठरविले. मला बघण्यात फारसा रस नव्हता पण सारे तयार झाले म्हणून मी पण तयार झालो. मला मुळात देवदास हा प्रकारच आवडत नाही. अरे पिण्यासाठी ब्रेक अपच व्हायची काय गरज आहे? पारो गेली तर चंद्रमुखी मिळाली या खुषीत पण पिता आले असते. बर त्यावेळ पर्यंत स्वदेस किंवा चक दे इंडीया बघण्यात आले नव्हते. तेंव्हा शाहरुखला चांगले म्हणून त्याच्यासाठी पिक्चर बघावा असे काही नव्हते. संजय लीला भनसाळी म्हणजे मला तरी दहा रुपयाचे आमलेट आणि शंभर रुपयाचे केच अप असा प्रकार वाटतो. तरी साऱ्या मित्रांसाठी मी तयार झालो पण आमची एक मैत्रीण मात्र शेवटपर्यत तयार झाली नाही.
तिच्यासोबतचा संवाद हा असा
“शी!!! देवदास किती बोर. नको जा तुम्ही, मी नाही येनार.”
“ए चल ना काय उगाच नखरे करतेस. आम्ही तुझ्यासोबत तो साइन्स बघितला होताच ना, तो काय कमी बोर होता. आम्हाला एक वाक्य कळले नाही, कुठे सुरु झाला आणि कुठे संपला काही पत्ता लागला नाही.”
“तरी पण देवदास, तो शाहरुख. नको रे बाबा. अरे खरच रे मला हिंदी पिक्चर फार बोर होतात.”
“ए च्यायला, तू जरा जास्तच भाव खातेस. सारे सोबत आहे म्हणून तुलाही चल म्हटले.”
“नको यार. सॉरी”
“नक्की. फायनल”
“हो फायनल. खरे सांगू. मला न माझा साहील सोबत नसला ना तर फार बोर होते रे.”
“मग तुझ्या त्या साहीलला पण सोबत घेउन चल ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय.”
“साहील सोबत असल्यावर मी तुमच्या सोबत का येउ?”
-मित्रहो
www.mitrho.wordpress.com
माझे मिपावरील लिखाण
प्रतिक्रिया
13 Jun 2014 - 10:41 pm | खटपट्या
साइन्स बघताना साहील होता का ?
13 Jun 2014 - 10:51 pm | भृशुंडी
अ) साहिल नसेल तर सदर स्त्री चित्रपटाला जात नाही असे तिचे विधान पहाता वाटते की साहिल होता
ब) साहिल असेल तर सदरहू स्त्री बाकी कुणाबरोबर चित्रपटाला जात नाही हे तिचे विधान बघता वाटते की साहिल नव्हता.
निष्कर्ष- तिची दोन्ही विधाने जर खरी असतील तर, साइन्स चित्रपटाच्यावेळी साहिल तिच्या आयुष्यात आला नव्हता.
13 Jun 2014 - 11:07 pm | मित्रहो
सगळे बहाणे होते, हे आम्हालाही माहीती होते. त्यावेळेला कोणच्याच डोक्यात हा प्रश्न डोक्यात आला नाही.
साइन्स बघायला साहील नव्हता.
मित्रहो
www.mitraho.wordpress.com
14 Jun 2014 - 1:26 am | मराठे
अरेरे .. असं उत्तर मिळावं आणि तेसुद्धा 'देवदास' बघायला जाताना.. आयर्नी आयर्नी म्हणतात ती हीच!
14 Jun 2014 - 1:06 pm | मित्रहो
त्याचा फायदा असा झाला की मी देवदास बघितला नाही. मलाही काऱण सापडले. अजून काही गळाले.
आजतागायात देवदास बघितला नाही टिव्हीवर आला तरीही.
मित्रहो
www.mitraho.wordpress.com
14 Jun 2014 - 1:55 am | आदूबाळ
मलाच काही कळलं नाहीये का?
14 Jun 2014 - 5:42 pm | तुमचा अभिषेक
या देवदासचीच आमचीही एक आठवण आहे. शाहरुख मला फार्रफार आवडत असला तरी भन्सालीच्या देवदासमध्ये तो काही सहन होणार नाही याची खात्री असल्याने थिएटरात जाण्याचा प्रश्नच नव्हता. काही कौंटुंबवत्सल मित्रांना मात्र त्यात ऐश्वर्या आणि माधुरीची अभिनय व नृत्यातील जुगलबंदी बघण्यात फार रस होता. म्हणून मग त्याच वेळी एका मित्राचे घर रिकामे सापडले तर त्याच्या घराचा अड्डा बनवून पिक्चर बघण्याचा प्रोग्राम ठरला. जेवणखान उरकून साधारण १० ते १२ एखादा हिंदी चित्रपट, त्यानंतर एखादा ईंग्लिश चित्रपट, त्यानंतर एखादी निळी चित्रफीत असा हा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी हिंदी चित्रपटाचा मान देवदासने पटकावला. सुरुवात व्हायला काही कारणाने उशीर झाल्याने ११ वाजले, आणि त्यानंतर मेला संपता संपत नव्हता. कुटुंबवत्सल शौकीन लोक साधे गाणेही फॉर्वर्ड करू देत नव्हते आणि आंबटशौकीनांची चुळबुळ वाढतच होती. अखेरीस डोला रे डोला गाणे झाले आणि एक पिसाळून उठला, सीडी बाहेर काढली आणि म्हणाला, बस्स झाली संपली जुगलबंदी आता दुसरी जुगलबंदी बघूया.. बस पुढचे मला काही माहीत नाही मी डोक्यावर चादर ओढून झोपून गेलो, ते त्यानंतरचा देवदास आजवर बघणे नाही झाले.
14 Jun 2014 - 7:07 pm | मित्रहो
प्रत्येकाच्या आठवणी वेगवेगळ्या कुणाच्या गोड, कुणाच्या तिखट तर कुणाच्या आंबट.
-मित्रहो
www.mitraho.wordpress.com
15 Jun 2014 - 7:09 pm | टवाळ कार्टा
अरसिक ;)