कट्टयाचा चा दरबार म्हणू दरबारचा कट्टा???
सर्वत्र अगरबत्तीचा मंद दरवळ पसरत होता.स्वयंसेवकांची लगबग चालू होती. मुवी जातीने सारी तयारी व्यवस्थीत झाली का नाही हे पहात होतेच तरी सुद्धा मधून अधून आप्ल्या खास सेवाकर्यांना सांगून आलेल्या पाहुण्यांची आसनव्यवस्था पहायला सांगत होते.आपण लढवलेली शक्कल इतकी यशस्वी होइल या बद्दल ते स्वतः पण साशंक होते परंतु पुरेसी गर्दी झाली आहे हे पाहून "बाबांच्या " मनात आपल्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावेल यात काही शंका नाही असेही वाटत होते.