कसं जमतं तुला (डुआयडी काढणं)

Primary tabs

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
29 Dec 2014 - 11:03 pm

आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29862

मूळ कवीची क्षमा मागून

--------------------------------------------------------

कसं जमतं तुला, डुआयडी काढणं?
किती सहज, हे तुझ असं वावरणं?
प्रतिसाद द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीतरी लेखांवर प्रतिसादांच्या जिल्ब्या पाडणं

(संपादकांच्या) गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय तुला?
लिहिताना तटस्थ प्रतिसाद कंटाळला जीव आमचा
(तरीही) तुच थट्टेचा, सगळ्यांसाठी विषय ठरला?

गप्प बसता मी (, तू) आणखीच व्हावं वाचाळ
(आपल्याच डुआयडीची) बाजू घेण्याच्या मिषानं तू यावं परत
लिहिताना प्रतिसाद, बिंग उघडं पडावं
जे हवच होतं आम्हाला, तुझं तु समजून फ़ुटावं

काहीच्या काही कविताभयानकबिभत्सविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

29 Dec 2014 - 11:22 pm | काळा पहाड

कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
पाणिपुरी की spdp, तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण

गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भूक घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?

फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना शेंगदाण्याचं पाकीट उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2014 - 11:25 pm | टवाळ कार्टा

भौ...नवीन धागा काडा की...तुमची "क्विता" पण मस्तय :)

काळा पहाड's picture

29 Dec 2014 - 11:28 pm | काळा पहाड

नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच वाईट वाटेल.

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2014 - 11:35 pm | टवाळ कार्टा

उलट मिपावर लवकर "रुळतील" ;)

सुचेता's picture

30 Dec 2014 - 12:55 pm | सुचेता

नाही हो वाईट काय त्यात उलट विडंबण याव यात ही मजा च आहे.

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 12:58 pm | टवाळ कार्टा

:)

पैसा's picture

29 Dec 2014 - 11:24 pm | पैसा

काही आयडींची आठवण झाली अन ड्वाले पाणावले!

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2014 - 11:26 pm | टवाळ कार्टा

नावे सुध्धा लिहा की मग ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Dec 2014 - 11:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमचेही ड्वाले ओलावु दे की वो

(माहितीच्या अधिकारात डुआयडी लिस्ट मागवणारा) =))

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 12:05 am | टवाळ कार्टा

अग्गागा =))

पैसा's picture

30 Dec 2014 - 10:09 am | पैसा

एक शून्यात विलीन झालेला आयडी, एक आपले कोणते अवतार आहेत हे सांगणारा आयडी आणि अजून एक ट्रोलांचा बादशहा आयडी ही हल्लीचीच उदाहरणे आहेत की!

एकदोन राष्ट्रकाकू पण !! ;)

पैसा's picture

30 Dec 2014 - 1:20 pm | पैसा

नाना अवतार घेणारे ट्रोल पण एरवी नॉर्मल असतात. त्यांनी मला दिवाळी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांचं उत्तर देण्यापूर्वीच तो अवतार समाप्त झाला ही मला वाईट वाटणारी गोष्ट आहे.

मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला ब्लाईंड डॅटवर बोलावतात आणि मग काकूच्या अवतारात काका आहे असे कळले की फार्रच वाईट वाटते लोकांना!

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 1:23 pm | टवाळ कार्टा

डॅटवर >> =))

>>मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला ब्लाईंड डॅटवर बोलावतात आणि मग काकूच्या अवतारात काका आहे असे कळले की फार्रच वाईट वाटते लोकांना!

मिपावर सगळ्या काकवा, माम्या, मावश्या किंवा आज्या असल्याने टच वूड अजून तरी ब्लाईंड डेट वैगरे काही घडलेलं नाही. ;)

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 2:44 pm | टवाळ कार्टा

म्हणजे तु प्रत्येक नवीन आयडीला चेक करतोस ;)

सूड's picture

30 Dec 2014 - 3:20 pm | सूड

गप्रांव मेल्या !!

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 3:41 pm | टवाळ कार्टा

"वशाड मेलो" सुटले वाटते =))

पैसा's picture

30 Dec 2014 - 4:37 pm | पैसा

ब्लाईंड डेटचा किस्सा राष्ट्रकाकूंनाच विचारा कसा!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2014 - 4:39 pm | अत्रुप्त आत्मा

@ब्लाईंड डेटचा किस्सा >>

1

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 4:51 pm | टवाळ कार्टा

बुवांना माहिती आहे वाटते :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Dec 2014 - 3:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

परवाचं राष्ट्रकाकु माझ्या धाग्यावर दंगा घालुन गेल्यात. पण डुआयडी नाही तो. =))

ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा मोठा शॉक लागला असेल नै का रे टवाळा!!! =))

टवाळ कार्टा's picture

30 Dec 2014 - 3:42 pm | टवाळ कार्टा

ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा मोठा शॉक लागला असेल नै का रे टवाळा!!!

कोणाला शॉक?

मुक्त विहारि's picture

29 Dec 2014 - 11:28 pm | मुक्त विहारि

येवू द्या अजुन.

पाउलवाटेवर रोडरोलर फिरवणं कसं जमतं रे तुम्हाला ?

मितान's picture

30 Dec 2014 - 10:29 am | मितान

वा वा !
मस्त आहेत दोन्ही कविता ! मजा आली :)

पैसाताईशी सहमत ;)

नित्य नुतन's picture

30 Dec 2014 - 10:47 am | नित्य नुतन

*lol*
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही मस्त

बॅटमॅन's picture

30 Dec 2014 - 11:33 am | बॅटमॅन

डुआयडी काढून...मूळ आयडी का लपविता????????? ;)

आदिजोशी's picture

2 Jan 2015 - 12:27 pm | आदिजोशी

टवाळ कार्टा हा कोणाचा डुआयडी आहे?

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 1:40 pm | टवाळ कार्टा

आयला आजकाल स्वतःच्या आयडीने लिहायची सुध्धा सोय राहीली नाही...

स्वगत - आता १ तरी डुआयडी घ्यावाच का?

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 3:28 pm | मुक्त विहारि

किमान ४ तरी हवेतच ५ असतील फारच उत्तम.

म्हणजे ५वा आय.डी. फार कमी वेळा वापरायचा.

पहिला आय.डी. प्रहार करायला.

कुणी उलटा प्रतिसाद दिलाच तर, पहिल्या आणि दुसर्‍या आय.डी.ने एकत्र मिळून प्रहार करायचा.

तिसरा आय.डी. फार महत्वाचा, हा शक्यतो स्त्रीलिंगी आय.डी. बनवायचा.

पहिल्या-दुसर्‍या आय.डी.च्या पाठिंब्यासाठी.

चौथा आय.डी. सामोपचारासाठी.

कधीतरी हे ४ही आय.डी. उडतात मग अशावेळी हा ५वा आय.डी. कामाला येतो.निदान सदस्यत्व तरी टिकून राहते.

आणि कुणी शोधाशोध केलीच तर लक्षांत येते की अरे हा ५वा आय.डी. तर फारच जूना आहे.वयाचा फारदा होतो तो असा.

असे ५ आय.डी. असतील तरच काहीतरी निभाव लागू शकतो.

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 3:31 pm | टवाळ कार्टा

आयला...लैच आभ्यास हाय तुमचा...का हा पण बाबांचा सल्ला??? ;)

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 3:42 pm | मुक्त विहारि

आमचा अभ्यास शून्य....