(सहज..)

Primary tabs

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
1 Jan 2015 - 7:55 pm

आत्मुदांची मापी मागून :)

पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887

------------------------------------------------------------------------

adagal

कोळ्यांनी विणले जाळे
वाळवीने करामत केली.
मी कचरा केला नाही
अन्,तरीही अडगळ झाली.

विटलेला रंग कचर्याचा गंध
ना घुशींना प्रतिबंध.
कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा
लाभला उंदरांस स्वच्छंद!

मी आशा का ठेवावी?
की कबुतरांना शी न व्हावी!
वैतागून संध्याकाळची
का प्रीती (कबुतरांची) मी ती पहावी???

हेच रडगाणे आहे
त्या कोपर्याच्या सफाईसाठी
बाबा कधीही घरी असता
झाडू देती सहजी (त्यांच्या) हाती.

भेटतो मलाही दिसामाजी
तो व्हेक्यूम क्लिनर पहाता पहाता
बायकोचा शब्दसागर
सफाईचे उपदेश देता

या जगी नवर्यांच्या नशिबी
सफाई करणे निश्चित आहे.
या "पाशवी" परंपरेचा
मी सुध्धा पीडित आहे.

==============
.
पीडीत..

काहीच्या काही कविताभयानकहास्यबिभत्सकविताविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Jan 2015 - 8:06 pm | प्रचेतस

चान चान

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान +++१११

समांतरः-
आजचा सुविचारः-वहित लिहिण्या आधी,स्लेट्पाटीवर खरडावे!

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2015 - 10:21 pm | टवाळ कार्टा

दू...दू...दू....

आजचा प्रश्न - मिपावर कंपूबाजांच्या कवीतांचे विडंबन करावे का? :D

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2015 - 10:19 pm | टवाळ कार्टा

दू...दू...दू

सतिश गावडे's picture

1 Jan 2015 - 10:37 pm | सतिश गावडे

दुत्त दुत्त टगोबा... विडंबन जमलंय...

कंजूस's picture

1 Jan 2015 - 9:43 pm | कंजूस

घरुरुरुऽऽऽम

खटपट्या's picture

1 Jan 2015 - 9:58 pm | खटपट्या

चांगलंय !!!!

मुक्त विहारि's picture

1 Jan 2015 - 10:14 pm | मुक्त विहारि

प्रगती आहे...

"आता आधी कविता की आधी विडंबन" असा एखादा काथ्या कुटावा काय?

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2015 - 10:22 pm | टवाळ कार्टा

आजकाल कवीता कोणाची आहे ते पण बघावे लागते काय?

वेल्लाभट's picture

2 Jan 2015 - 5:45 pm | वेल्लाभट

+११११

पैसा's picture

1 Jan 2015 - 10:39 pm | पैसा

तुला बायको आहे तर! मग आणखी साबा कशाला शोधतो आहेस! ;)

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2015 - 10:58 pm | टवाळ कार्टा

ओ तै...असे जालीय भास करून घेउ नका :P
मिपावर जे लोक लिहितात ते सगळेच खरे मानले तर ... :P

सतिश गावडे's picture

1 Jan 2015 - 11:34 pm | सतिश गावडे

तुला बायको आहे तर!

तरीच तू थट्टी फस ला घरी होता. आणि मुविंच्या चौदा फेबच्या सत्संगाला नाही म्हणतोय. :D

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 10:36 am | टवाळ कार्टा

थट्टी फस ला घरी होतो त्याचे कारण वेग्ळे होते...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jan 2015 - 8:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मि.पा.भ.प. तसेचं जिलबी संप्रदायाचे सद्ध्याचे काळजीवाहु पीठाधीपती (तांब्या संस्थान) श्री.श्री. टवाळेश्वर महाराजांस मि.पा.चे जिलबीबहाद्दर कार्टं म्हणुन पदवी देण्यात यावी अशी मागणी मी मालक आणि संपादक मंडळास करत आहे =))

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 10:35 am | टवाळ कार्टा

सद्ध्याचे काळजीवाहु

ह्यांस सहमती ;)

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 10:36 am | टवाळ कार्टा

=))

स्पंदना's picture

2 Jan 2015 - 11:11 am | स्पंदना

काऽऽही म्हणा, पण अगदी फोटो सकट इडंबन.

बॅटमॅन's picture

2 Jan 2015 - 11:42 am | बॅटमॅन

हाण तेजायला =)) विडंबक संप्रदायात अजून एका महंताची भर पडली हे पाहून आणंद झाला.

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 11:52 am | टवाळ कार्टा

चायला सम्जत नै की विडंबन जमते आहे की नाही
दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत :)

माई मोड ऑन-"अरे,टवाळ कार्ट्या विडबंन सुरेख आहे रे.पण आमचे 'हे' म्हणतात तु चांगल्या कवितेची वाट लावलीस.यामुळे दोन्ही टोकाच्या प्रतिक्रीया येत आहेत."-माई मोड ऑफ *wink*

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 1:38 pm | टवाळ कार्टा

@माईंचे हे
मग कवींना म्हणावं कवीतेखाली "विडंबन करण्यास सक्त मनाई" अशी पाटी लावावी...समजेल तरी आम्हास