आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कुणी ना कुणीतरी फेकूचंद उर्फ थापाडया भेटलेला असतो. मग तो ग्रुपमधला असू शकतो/शकते, ऑफीसमधला किंवा नातेवाईकांमधे पण असू शकतो/शकते.(आपण पण आयुष्यात कधीतरी फेकूगीरी केलेली असतेच. खोटं का बोला!) पण काही लोकांना सतत थापा मारायची सवयच असते. अशा लोकांना आम्ही "बंदुक्या" किंवा "ठ्ठो " असे चिडवायचो.
काही काही थापा मात्र कायम लक्षात रहातात. आमच्या ऑफीसमध्ये असाच एक बंदुक्या होता. आमच्या साहेबाचा पी.ए.! साउथ इंडीयन होता. आपण त्याचे नाव अय्यर होते असे समजू. (खरे नाव देत नाही.)
एक दिवस ऑफीसमधे अय्यरने मला विचारले, "क्या रे, कल दांडी मारा ऑफीसको? साब पुछ र्हा था ."
"हां क्या? अरे कल एक रीलेटीव्हको अॅटॅक आया. इसलीए हॉस्पीटलमे गया था." मी.
"ओके. अभी कैसा है वो?" अय्यर.
"अभी ठीक है." मी.
"(पुचूक..) परसो हमारे इधर ब्भी ऐसाच हुवा." अय्यर त्याच्या खर्जातल्या आवाजात सांगू लागला, "नेबरको अॅटॅक आया. उसका वाइफ चिल्लाते घरपे आया. मै घरपेच था. जाके देखा तो हाल्लत एकदम खराब! इमर्जन्सी था. सोचा अॅम्ब्युलंस बुलायेगा तो टाईम लगेगा आनेको. (पुचूक..) तब तक तो इसका जान चल्ला जायगा."
"फीर क्या किया?" मी.
"फिर क्या करता? निच्चे देखा तो उसका सुमो खडा था. भाब्बी को बोला चाबी दे. चाबी लिया, नेबरको दो हातमे बच्चे के माफीक उठाया और सिद्दा सुमो मे डाला...." अय्यर.
"My God! सुमो चलाया किसने? तेरेको तो फोर व्हीलर चलानेको आता नही." मी.
"पुचूक..! (हे साउथ इंडीयन बोलताना सारखे सारखे ओठातून पुचूक आवाज का करतात समजत नाही). वोच तो बोल रहा हुं. जिंदगीमे कब्भी स्टीअरींग हाथमे लिया नही था. लेकीन गाडी चलानेका कैसा वो सूना था. भगवान का नाम लिया, स्टीअरींग के सामने बैठा और चाबी घुमाया. ठर्रर करके जैसा गाडी चालू हो गया, वैसा फर्स्ट गियर डाला और हल्लु हल्लु क्लच छोडा. आस्तेसे अॅक्सलेटर दबाया, फिर आस्ते आस्ते फर्स्ट-सेकंड, फर्स्ट-सेकंड डालके स्टीअरींग युं युं घुमाके बराब्बर टाइमपे हास्पीटल मे पहुंचा. साला मेरेको टेन्शन! थोडाब्भी लेट होता तो पेशंट का खटीया खडा होता." अय्यर.
ही शंभर टक्के थाप होती. ज्याने आयुष्यात कधी चारचाकी चालवली नाही, त्याने एक इमर्जन्सी असलेला पेशंट गाडीत घालून पुण्याच्या रस्त्यांवरून सुमो चालवून हॉस्पीटलमधे पोहचवला. आणि चुकून एक शतांश जरी हे खरे असेल, तर जर का त्या पेशंटला कळले असते की अय्यर गाडी चालवतोय, तर त्याला गाडीतच आणखी एक अॅटॅक आला असता. पण एनीवे, अय्यरला थापा मारायची सवयच होती.
तुमच्याजवळही असे काही फेकुगीरीचे किस्से असतील तर शेअर करा. एक गंमत म्हणून..! कृ. राजकारण्यांच्या थापा नकोत :-)
प्रतिक्रिया
7 Aug 2014 - 8:03 pm | स्पंदना
आमचा येक्क सरदारजी नेबर...मेरेपास विंडोज का एकदम लेटेस्ट वर्शन रहेताय. विंडोज ९६ ९७. :))
8 Aug 2014 - 10:05 am | सौंदाळा
माझा एक मित्र नववीत असताना कार शिकला होता आणि म्हणे "एकदा कार घेऊन पुण्याहुन मुंबईला गेलो होतो, जाताना वडीलांनी चालवली आणि येताना लोणावळ्यापासुन मला दिली. लोणावळ्यात पाऊस चालु झाला जोरदार तेव्हा मी अशी गाडी पळवली की गाडीची मागची काच पुर्ण ओली आणि पुढची पुर्ण कोरडी *fool* हे असे तळेगावपर्यंत चालु होते. तिकडे थांबलो म्हणुन पुढची काच भिजली नाहीतर तशीच आणली असती पुण्यापर्यंत" *lol*
11 Aug 2014 - 10:33 am | चौथा कोनाडा
फेकुचंदचा किस्सा वाचून मस्त टाईमपास झाला.
शालेय जीवनात, आमच्या वर्गातील असाच एक फेकुचंद ज्याचे वडील नेहमी त्यांच्या कापडाच्या दुकानात दिसायचे पण हा फेकु त्यांच्या नावाने बरयाच थापा मारायचा. आज काय म्हणे तर वडील इंदिरा गांधीना भेटायला गेलेत, मागच्या आठवड्यात काय म्हणे तर वडील धर्मेंद्र बरोबर फॉरेन गेले होते. वडील मात्र कायम कापडाच्या दुकानी ! त्याच्या या बाता ऐकून आमाला ज्याम हसु यायचे ! मग आमच्या इमर्जन्सीला असल्याच काही थापा आम्ही ट्विस्ट करून वापरायचो !
हा . . . हा . . . हा हा हा . . . !
11 Aug 2014 - 10:55 am | योगी९००
तसे बरेच फेकूचंद पाहिलेत पण एका मुळे आमचा (म्हणजे मी जेथे नोकरी करत होतो त्या कंपनीचा) फायदाच झाला होता.
एका मोठ्या पार्टीबरोबर आमचे डील चालू होते. त्यांनी आमचे products and services यांचे एक छान analysis केले होते. तेथील एका फेकूचंदने ते analysis स्वतः बनवले नव्हते तरी स्वतःला credit घेत होता. ह्या analysis चे मी थोडे कौतूक केले आणि मला पण हे ईमेल कर म्ह्णून सांगितले. त्या मुर्खाने ती फाईल काही न विचार करता मला ईमेल केली. त्या आमच्या product च्या analysis बरोबर आम्हाला त्यांचे budget, competition and their prices असे बरेच काही कळले. (एक्सेल च्या वेगवेगळ्या sheets वर ती माहिती होती). फाईलच्या प्रॉपर्टीमध्ये हे analysis कोणी केले हे पण समजले...!!
नंतर ह्या माहितीच्या आधारे आम्ही हे deal "योग्य" त्या भावाने आमच्या पदरात पाडून घेतले...
11 Aug 2014 - 11:17 am | बबन ताम्बे
सॉल्लीड! एकसो एक भारी किस्से आहेत. :-)
11 Aug 2014 - 11:18 am | विटेकर
आमाला वाटले सं क्षी चा धागा अहे की काय ?
अंमळ निराशा !
11 Aug 2014 - 9:17 pm | प्यारे१
+१११
आणि न सांगता नाव बदललं की काय असाही समज झाला. आमचे सर अशी चीटिंग करणार नाहीत बरं. ;)
12 Aug 2014 - 11:51 am | बबन ताम्बे
अंमळ निराशा ? आमचं लिखाण आवडत नाही की काय? :-)
14 Aug 2014 - 2:57 pm | विटेकर
नाय वो , तुमचे लेखन आवडतेच हो ,पण सरांच्या लेखणीची धार तुमच्याच काय अर्वाचीन मराठी सारस्वतात असे लिहिणारा कुण्णी कुण्णी नाही !
जाऊ दे, गुळाची गोडी सांगून कळत नाही , तो चाखूनच पहावा लागतो.
बाकी तुमच्या गुळातही गोडवा आहे हे नमूद करतो.
18 Aug 2014 - 11:25 am | बबन ताम्बे
थँक यु !! :-)
14 Aug 2014 - 3:00 pm | विटेकर
मी नॉन मिपाकर पब्लिकला सान्गतो .. माझा लेख प्रकाशित केलाय मिपावर आणि प्रतिसादान्चा धो धो पाऊस पडतोय... आत्तपर्यन्त ५०० झाले सुद्धा !
( पण, खरच माझे हे स्वप्न आहे !)
14 Aug 2014 - 11:55 pm | चौथा कोनाडा
फेकुचंद अय्यरचे अजून किस्से येवू द्या.
!!स्वातंत्र्य दिन चीरायू होवो !!
15 Aug 2014 - 7:02 am | कापूसकोन्ड्या
मी पुर्वी मिपा वर खुप लेखन करत असे. खुप मागणी होती . माझ्या युध्यावरच्या कथा, आय टी, प्रवासवर्णने, विनोद, कविता आणि मी पाक कृती पण लिहीत असे. एका प्रतिसाद कर्त्याने तर माझ्या मिपा वरील पाक कृती चे पुस्तक काढले.आणि खुप कमाई केली. पण त्याला सोडून दिले. म्हणले जाउदे मिळवतोय चार पैसे तर मिळवूदेत बापडा. (तसा मी मोठ्या मनाचाच आहे)
प्रतिसाद तर भरभरून येत असत. शेवटी सम्पादकानी विनन्ती करून मला लेखनाची थोडी विश्रांती घेण्यास भाग पाडले.
अनेक सभासदाना माझा हेवा वाटतो पण लोकप्रियताच इतकी आहे की काय सांगू. असो. स्वतःची तारीफ करणे योग्य नव्हे.
15 Aug 2014 - 12:15 pm | नितिन थत्ते
मिपावर माझा एकच आयडी आहे.
18 Aug 2014 - 12:14 pm | बबन ताम्बे
ऑफीसमध्ये अजून एक फेकूचन्द होता.मुली आणि बायका, याबाबतीत थापा मारण्यात त्याचा हातखंडा होता. त्याचा ब-याच वर्षांपूर्वीचा (अंदाजे २० वर्षांपूर्वीचा) किस्सा आम्ही अजुनही चघळतो.
एकदा त्याने मला विचारले, "काय रे, काल बायकोला घेऊन आमच्या एरीयात फिरताना दिसला? घरी यायचे का नाही?"
"अरे वेळच नव्हता. हीला गायनॅकॉलॉजिस्ट कडे घेऊन जायचे होते. तुमच्या घराजवळ त्या डॉ. .... आहेत ना, त्यांच्याकडे अपॉईंटमेंट होती." मी.
"हो का?" फेकूचंद,"ती डॉक्टर ना? आपली लाईन हे बरं का !"
"हो का! " मी. (च्यायचा थापाडया. मी मनात...)
"मी एकदा मिसेसला तिच्याकडे घेऊन गेलो होतो. मिसेसचं चेकींग केल्यावर ती मला म्हणाली तुमचे पण चेकींग करायची गरज हे. हां मंग? आपण पण आपल्या एरीयात हँडसम हे.एक दिवस मी गेलो. मला तिने टेबलावर झोपायला सांगीतले आणि चेकींग सुरू केले. मी पण पेटलो, किसिंग बिसिंग केले. मग ती म्हटली आता बास. बाहेर पेशंट बसलेत."
मी त्याला लगेच झापला. "अरे दळभद्री. थापा मारताना जरा तरी विचार करून थापा मार. ती गायनॅकॉलॉजिस्ट. आणि तुझं चेकींग ? कशाचा कशाशी काही संबंध तरी आहे का? वा रे हॅंडसम! एक डॉक्टर तुला बघताक्षणी लगेच तुझ्या गळ्यात पडायला लागली ! पारच भोट समजतो आम्हाला?"
पण कसचं काय? वर निर्लज्जपणे तो हसत होता.
20 Aug 2014 - 8:48 pm | चौथा कोनाडा
""ती डॉक्टर ना? आपली लाईन हे बरं का !""
जबरी किस्सा ! या थापाड्याला फेकुरत्न हा किताब द्यायला हवा !
21 Aug 2014 - 4:53 pm | बबन ताम्बे
आमचा हा फेकुचंद त्यावेळी चाळीशीत होता.
आम्ही पाच सहा जण सकाळी चहा नाश्ता घेत होतो.एक दिवस ऑफेसमध्ये त्याने पुडी सोडली. फेकुचंदने सुरुवात केली."आयला काल जबरी वाचलो राव."
आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे नजरा वळवल्या. आम्हाला वाटले काय अॅक्सीडंट वगैरे झाला की काय. कुणी तरी विचारले काय झाले म्हणून.
"काल मित्राच्या मुलाला मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मी नव्ह्तो जात पण मित्राने खूप आग्रह केला म्हणून गेलो. पाहुण्यांच्या समोर मित्र, मी आणि मित्राचा मुलगा बसलो होतो. मुलीच्या वडीलांनी मलाच प्रश्न विचारायला सुरवात केली. मित्राला शंका आली आणि त्याने मुलीच्या वडीलांना बाजूला घेऊन सांगितले की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नवरा मुलगा तो कडेला बसलाय तो आहे. मुलीच्या वडीलांनी आश्चर्याने विचारले की तो तुमचा मुलगा आहे होय. मग माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले की तो तुमच्या बाजूला बसलेला यंग आणि हँडसम मुलगा कोण आहे? आम्ही त्यालाच नवरा मुलगा समजलो. मग मित्राने खुलासा केला की अहो तो माझा मित्र आहे म्हणून आणि त्याचे लग्न झालेले आहे. "
फेकूचंद्ची पुडी संपल्याबरोबर आम्ही सगळे "ठ्ठो" जोरात ओरडलो आणि प्रचंड हसलो.
21 Aug 2014 - 4:55 pm | प्यारे१
क्या यारो,
पॉयझन लगाकु बिलांकेट हाल गया क्या ये सलिम फेकु?
21 Aug 2014 - 5:03 pm | बबन ताम्बे
मेरेकु कुच समझा नै आप क्या बात कर रहेलै.
21 Aug 2014 - 5:12 pm | प्यारे१
https://www.youtube.com/watch?v=JvkbAoUxahQ
21 Aug 2014 - 5:49 pm | बबन ताम्बे
जबरी :-) सलीम फेकू.
22 Aug 2014 - 8:09 am | टवाळ कार्टा
अर्रे ये पिएस्पिओ नही जानता
22 Aug 2014 - 11:58 am | कापूसकोन्ड्या
असेच कुठेतरी वाचलेले