माझा मंडपेश्वर अनुभव
काल दहिसर बोरिवलीदरम्यानच्या मंडपेश्वर लेणींमध्ये जाऊन आलो. भारतीय इतिहास संकलन समितीच्या बोरीवली शाखेनं आखलेला कार्यक्रम होता. तन्ना सरांचा मेसेज आला आणि लगोलग तो दहा-बाराजणांना पुढे पाठवला. रविवारचा सुटीचा सोयीचा दिवस आणि मंडपेश्वरबाबत डाॅ. सूरज पंडित (Dr. Suraj A. Pandit ) यांच्याकडून मोफत माहिती. ब-याच जणांनी हो-नाही म्हणत, काही जणांनी 'मंडपेश्वरात काय पाहायचं' असा पवित्रा घेत, शेवटी माझ्यासोबत एकटा ( Manas Barve ) मानस बर्वेच आला. तोही वेळेच्या आधी. मीच आरामात उठून चेंगटासारखं आटपत आलो. येताना न विसरता कॅमेरा सोबत घेतला.