गृहखात्याची खराब इमेज
महाराष्ट्रातील राजकारणी लोक नवनव्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या घडवत आहेत. नुकतेच विधानसभेच्या पवित्र स्थळी राजकारण्यांनी कायदा हातात घेऊन एका पोलिस अधिकार्याला बुकलून काढले. दुर्दैवाने तिथे सीसीटीव्ही क्यामेरे असल्यामुळे ह्या प्रकरणाचा हा सूर्य आणि हा जयद्रथ असा निकाल लागेल असे वाटले.
पण आपले लाज कोळून प्यालेले राजकारणी तिथेही पळवाट काढणार असे दिसते.