गाभा:
१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बाँब स्फोट खटल्याचा आता सर्वोच्च न्यायालयात निकाल देणं सुरु आहे.
तसा हा देशावरचा पहिला आणि सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, २५७ लोकांचा जीव घेऊन गेला.
दाऊद, टायगर वगैरे मुख्य आरोपी पाकिस्तानात सुखरुप आहेत. बाकींच्यांना घेऊन २० वर्ष उलटली तरी खटला सुरुच आहे. बहुतांश पब्लिकला संजुबाबाचं काय होणार याचीच उत्सुकता आहे.
आता २० वषांनंतर काहीही निकाल लागला तरी, जे गेले त्यांना... ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना... जे जखमी झाले त्यांना... ज्यांचं सगळं आयुष्यंच बदलून गेलं त्यांना.. न्याय वगैरे मिळाला असं कसं म्हणता येईल?
उलट एवढ्या भीषण घटनेचा निकाल २० वर्ष रेंगाळला म्हणून असल्या न्याय व्यवस्थेच्या कासव गतीचा धिक्कारच करायची इच्छा होते.
प्रतिक्रिया
21 Mar 2013 - 12:23 pm | श्रीगुरुजी
संजय दत्तची शिक्षा ६ वर्षांवरून ५ वर्षांवर आली. त्याने आधीच जवळपास दीड वर्ष तुरूंगात काढले आहे. त्यामुळे आता त्याला साडेतीन वर्षे तुरूंगात काढावी लागतील. माझ्या मते ही फारच कठोर शिक्षा आहे. त्याने एके-५६ च्या ३ बंदुका जवळ बाळगल्या होत्या, पण त्यांचा वापर केला नव्हता किंवा कोणालाही इजा केली नव्हती. त्याने शस्त्रे जवळ बाळगल्याचे कबूल करून तपासात पूर्ण सहकार्य केले होते व आधीच दीड वर्षे कैद भोगलेली आहे. हे लक्षात घेता त्याला खूप जास्त शिक्षा झाली आहे असे वाटते.
कृपाशंकर कडे मागील वर्षी विनापरवाना पिस्तुले व काडतूसे सापडली होती. त्याच्यावर आजतगायत गुन्हासुद्धा दाखल झालेला नाही, मग शिक्षा तर लांबच राहिली.
21 Mar 2013 - 1:10 pm | रामबाण
असं मला वाटतं, नाहीतर त्याला इतकी सहानुभुती मिळाली नसती.
त्याच्याकडे जानेवारीतच म्हणजे या बॉम्ब स्फोटाच्या २ महिने आधी कोणीतरी म्हणजे अंजरवर्ल्डमधील कुविख्यात गँगस्टर्सनी तीन AK-56 सारख्या बंदुका, २५ हँडग्रेनेड्स, एक पिस्तुल वगैरे शस्त्रसाठा आणून दिला. यानेही तो ठेवला. मग काही दिवसांनी एक AK स्वतहासाठी ठेवली बाकी परत करुन टाकली. २० वर्षांपूर्वी हे इतकं सोपं नव्हतं. आपण कोणाशी डिल करतोय याची त्याला कल्पना होती.
ते खूप उशीरा, सुरुवातीला त्यानं निष्पाप वगैरे असल्याचंच सांगितलं होतं.
नशीब.
21 Mar 2013 - 12:35 pm | तिमा
त्या संजयला, ज्याला लोकं प्रेमाने संजूबाबा असं म्हणतात , ५ वर्षांची शिक्षा झाली आहे. म्हणजे प्रत्यक्षांत त्याला साडेतीन वर्षे तुरुंगात जावे लागेल. ह्या माणसाला त्याच्या घरी शस्त्रं आणि बाकी सामुग्री उतरवली तेंव्हा काहीतरी कट शिजतो आहे हे तरी नक्की कळले असेल. त्याने जर लगेच पोलिसांना कळवले असते तर पुढचा अनर्थ कदाचित टळला असता. पण त्याने अज्ञानाने किंवा जाणूनबुजून काहीच केले नाही त्याबद्दल सुद्धा तो देशद्रोही आहे असे म्हणता येईल. त्या मानाने त्याला फारच कमी शिक्षा झाली आहे. वडीलांचे काँग्रेसमधले स्थान, हिंदुहृदयसम्राटांनी केलेली मदत याच्या जोरावर तो सुटला आहे, हेच जर एखाद्या सामान्य माणसाने केले असते तर तो गेली २० वर्षे तुरुंगातच असता. त्याऐवजी इथल्या दिलदार(?) प्रजेने त्याला माफ करुन त्याचे फालतू सिनेमे डोक्यावर घेतले. परदु:ख शीतल असते असे म्हणतात. पण ज्यांचे आप्त या स्फोटांमधे गेले त्यांच्या दृष्टीने विचार करुन पहा.
निकाल ऐकल्यावर अन्याय झाल्याचीच भावना मनांत आली.
22 Mar 2013 - 8:47 pm | मराठी_माणूस
पुर्ण सहमत.
त्याला अजुन कडक शिक्षा व्हायला हवी होती
21 Mar 2013 - 1:15 pm | रामबाण
स्फोटात वापरलेलं RDX ज्यांनी कोकणात समुद्रकिनारी उतरवलं त्यातल्या अनेकांना कल्पनाही नव्हती आपण काय करतोय त्याची नेहेमीप्रमाणेच स्मगलिंगचा माल असेल असं वाटलेलं. त्यांनाही सजा झालीच.
21 Mar 2013 - 5:11 pm | मदनबाण
तिमा यांच्याशी सहमत !ज्या शिवसेनेने संजय दत्तच्या "खलनायक" चित्रपटाचे पोस्टर्स फाडले आणि या चित्रपटाचे खेळ बंद पाडले त्याच शिवसेनेच्या सुप्रिमो बाळा साहेब ठाकरेंना संजय दत्त चे वडिल सुनिल दत्त जाउन भेटले,आणि शिवसेनेचा विरोध मावळला.
याच संजुबाबाने २००९ साली वक्तव्य केले होते की माझी आई मुसलमान होती म्हणुन ३.५ वर्ष जेलमधे ठेवुन टॉर्चर केले गेले होते.
काही दुवे :-
What Sanjay Dutt told the cops in 1993
Non-bailable warrant against Sanjay Dutt
जाता जाता :--- Justice delayed is justice denied असे कुठे तरी वाचल्या सारखे वाटते.
22 Mar 2013 - 6:39 pm | बंडा मामा
बाळासाहेबांनी तेव्हाच संजूला बाहेर काढायला नको होते. त्यांचे सिनेमाप्रेम नडले. संजूला सोडवण्यासाठी केलेल्या कसरतींमधे आणखी २५ एक लोक सुटले होते असे वाचले तेव्हा बाळासाहेबांचा आदर थोडा कमी झाला होता. हिंदूहृदय सम्राटांनी हिंदूंचे बळी घेणार्या लोकांना असे सोडू दिले ते पटले नव्हते.
21 Mar 2013 - 5:41 pm | मैत्र
Bipasha Basu :Saddenned n shocked with the news about Sanjay Dutt's Jail sentence.Strength to him n his family.
arshad warsi : I am numb, I don't know what to say. Sanjay Dutt is not a criminal. This is too harsh a decision.
Mahesh Bhatt : Heart Broken: Just heard that Sanjay Dutt has to go to jail for 5 years. I expected mercy! Alas it did not happen.
Jewellery designer Farah Ali Khan: "Sanjay Dutt is a very good Man who doesn't deserve this sentence. God give him the strength. Prayers and more with his family."
.. (वरच्या इंग्रजी बद्दल क्षमस्व..)
आणि बरेच काही इथे
http://zeenews.india.com/entertainment/celebrity/sanjay-dutt-is-not-a-cr...
21 Mar 2013 - 5:54 pm | हारुन शेख
न्यायव्यवस्थेने आपले काम चोख बजावले आहे. यानिमित्ताने श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणीही लवकरच व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
22 Mar 2013 - 12:23 pm | मैत्र
http://www.ndtv.com/article/india/1993-bombay-blasts-press-council-chief...
जस्टिस काटजू यांनी संजय दत्तला माफी मिळावी असं महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहिलं आहे! घटनेच्या १६१ कलमान्वये हे करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. संजय दत्त बॉंबस्फोट व इतर कटात सहभागी नव्हता आणि त्याने पुरेशी शिक्षा व त्रास भोगला आहे त्यामुळे आता त्याला माफी मिळावी. सुनिल दत्त व संजय दत्त हे मानवतावादी होते. ते सीमेवरच्या जवानांना अनेकदा प्रत्यक्ष भेटले आणि इतर सामाजिक कामे केली.
या सगळ्याचा विचार करून संजय दत्तची राहिलेली शिक्षा माफ करावी
जस्टीस काटजू अजून चीफ जस्टिस पदावरून मनाने उतरलेले नाहीत आणि अजून त्याच पद्धतीने विधाने करतात हे गेल्या अनेक घटनांमधून दिसले आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर उलट प्रतिक्रिया देऊन आतामात्र कमाल केली आहे.
22 Mar 2013 - 4:29 pm | बॅटमॅन
काटजू मूर्खागमनी विधाने देतोय एकदम. सठिया गया है बुढ्ढा, आउर कुछ नै.
22 Mar 2013 - 7:50 pm | मदनबाण
काटजूंची "प्रसिद्धी" मिळवायची हौस दिसतेय !;)
25 Mar 2013 - 4:45 pm | ऋषिकेश
कार्टून - मंजूल साभार:डीएनए
22 Mar 2013 - 7:50 pm | सव्यसाची
न्यायाधीश काटजू यांनी दिलेल्या कारणांपैकी शेवटचे कारण तर "लगे रहो मुन्नाभाई" या चित्रपटासंबंधी आहे. महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचे काम केले आहे असे म्हणणे आहे.
कठीण आहे..!!
22 Mar 2013 - 8:04 pm | मदनबाण
मला वाटलेच होते हा "गांधीगिरीचा" इंपॅक्ट असावा. ;)
बाकी गुन्हेगाराने अहिंसेचा प्रचार केल्यास त्याच्या गुन्हाची तिव्रता आणि गुन्हाचे परिणाम कमी होउ शकतात असे जर काटजूंना वाटत असेल तर हा व्यक्ती पूर्वन्यायाधीश होता यावर विश्वास ठेवणे देखील कठीण होउन जाईल...
तसेही या महाशयांना काहीही विधाने करण्याची सवय आहे,त्यातलेच एक म्हणजे डिसेंबर २०१२ ला यांनी विधान केले होते की ९० टक्के हिंदुस्थानी मूर्ख आहेत.
22 Mar 2013 - 10:23 pm | सव्यसाची
देव आनंद गेले तेव्हा मिडियाने पहिल्या पानावर त्याची बातमी दिली म्हणून त्यांना राग आला होता. कारण काय तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे होत असताना याला तुम्ही कसे काय इतके महत्व देऊ शकता?
आता खास संजय दत्तला (बाकी कोणत्याच गुन्हेगारासाठी नाही!) माफीची मागणी केली आहे.
असो!
23 Mar 2013 - 1:21 pm | सुबोध खरे
न्यायमूर्ती काटजू कधीच सर्वोच्च न्यालालायाचे मुख्य न्यायमूर्ती नव्हते
22 Mar 2013 - 1:42 pm | तिमा
संजयच्या घरीच शस्त्रे उतरली होती आणि त्याचे डॉन लोकांशी संभाषणही व्हायचे. असे असताना काहीतरी भयंकर कट शिजतोय एवढे तरी त्याला नक्कीच कळले असणार. तरी तो गप्प का राहिला ? इतक्या निरपराध लोकांचे बळी तो वाचवू शकला असता. अशा माणसाला दया का दाखवावी ?
सगळे जण या बाबाला वाचवायला एवढे आतुर का आहेत?
22 Mar 2013 - 4:44 pm | शिद
वृत्तपत्रांच्या बातमीनुसार बॉलीवूडला १५० कोटींचे टेन्शन आहे म्हणुन बहुतेक...आणखी कुठले उद्योग व लागेबंधे असतील ते वेगळे.
22 Mar 2013 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
१५० कोटींचे टेन्शन आहे म्हणुन बहुतेक...>>> हेच...हेच ते कारण +++++१११११
22 Mar 2013 - 8:04 pm | उपास
बॉलीवूडचे १५० कोटी बुडणार असतील तर बुडूं देत. ह्या केसचा निकाल लागेल कधितरी हे बॉलीवूडवाले विसरले, तेव्हा संजूबाबाला पिक्चर मध्ये घेऊन धोका पत्करायला आम्ही सांगितले का, भोगा कर्माची फ्ळं. उलट संजुबाबाला कधीच शिक्षा होणार नाही ह्या फाजील मस्तीत राहिल्याने बॉलीवूड वाल्यांना धक्का बसल्याचे त्यांच्या सगळ्याच प्रतिक्रीयांमध्ये जाणवते.
आता निळूभाऊ नियती/ कर्म ह्या वर एक अग्रलेख पाडतीलच नवाकाळ् मध्ये! मज्जा!!
23 Mar 2013 - 1:13 am | विकास
हा लेख/चर्चाप्रस्ताव आत्ता पाहीला..वर आलेल्या विविध प्रतिसादांबद्दल
23 Mar 2013 - 3:30 pm | पिंपातला उंदीर
सुनील दत्त यानी बाळासाहेबांच्या उपकाराची परतफेड म्हणून एक लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे मोहन रावले निवडून गेले. शरद पवार आपल्या पक्षाचे असून पण आपल्याला मदत याप्रसंगी करत नाहीत म्हणून सुनील दत्त यानी शेवट पर्यंत पवारांचा राग केला.
23 Mar 2013 - 7:39 pm | बंडा मामा
ह्यातुन तुम्ही बाळासाहेबांची काही चूक नाही असे सुचवत असाल तर असहमत आहे. सत्तेत असल्याचा फायदा घेऊन खाजगीतल्या मित्राच्या मुलाला गंभीर गुन्हे दाखल झालेल्या केस मधून सोडवणे (त्याहुन वाइट २५ एक आणखी लोकांना जाऊ देणे) हे समर्थनीय नाही.
25 Mar 2013 - 9:21 pm | विकास
बाळासाहेबांची चूक नाही असे दाखवण्याचा हेतू अजिबात नव्हता... खाली मी इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील काही भाग चिकटवत आहे:
बाळासाहेबांचा मुद्दा हा संजय दत्तला निर्दोष सोडण्यासाठी नव्हता तर त्याला टाडाच्या अंतर्गत खटला न चालवता तुरूंगात खितपत ठेवण्यात होता, जो त्यांचामुद्दा हा साध्वी प्रज्ञासिंग यांच्या बाबततीत देखील होता आणि इतरांचा आहे. तरी देखील, तुम्हाला आवडो अथवा तुम्ही नुसता बोटे मोडत द्वेषकरत नावडो, बाळासाहेब हे अनेकांचे दैवत होते, अनेक जण त्यांना राजकारणी नेतॄत्व देखील मानायचे. अशा नेत्याने असे व्यक्तीगत मैत्रितून कुणाची कितीही योग्य कारण असले, तरी सुटका करायला लावू नये असे मला वाटते. त्यामुळे एक नेतृत्व म्हणून अशी मागणी चूक वाटते...
27 Mar 2013 - 8:13 pm | बंडा मामा
विषय संपला.
ह्याची काही गरज नव्हती. मी बाळासाहेबांचा बोटे मोडत द्वेष करतो असे माझ्या लिखाणात कुठेही आलेले नाही. तेव्हा वरील वाक्ये अनावश्यक वाटली.
27 Mar 2013 - 8:34 pm | विकास
ह्याची काही गरज नव्हती.
माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मी "इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील" काही भाग चिकटवला होता. त्याचा अर्थ ते तुम्हाला उद्देशून होते असा नाही. त्या शिवाय मला काही कल्पना नाही कुणाला बाळासाहेबांबद्दल काय वाटते ते... त्यामुळे मी, "आवडो-नावडो" म्हणताना सगळ्याच पॉसिबिलीटीज लिहीलेल्या होत्या, त्यामुळे केवळ एकच स्वतःसाठी धरण्याची काही गरज नव्हती. असो.
27 Mar 2013 - 8:36 pm | बंडा मामा
ठीक आहे! नो प्रॉब्लेम.
23 Mar 2013 - 1:11 pm | NiluMP
प्रथम अजमल कसाब, नंतर अफजल गुरू आणि आता 93 खटल्याचा निकाल तुम्हाला नाही वाटत ही 2014 निवडूणकेची नांदी आहे.
23 Mar 2013 - 2:13 pm | निनाद मुक्काम प...
बॉलीवूड वर संक्रांत कोसळली आहे ,
आताच काळ वीट प्रकरणांतील आरोपींना दोषी म्हणून कोर्टाने निकाल दिला आहे,
.
23 Mar 2013 - 3:18 pm | तिमा
काळवीट प्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत जायला अजून दहा वर्षे लागतील. त्यानंतर ६ वर्षांची शिक्षा कमी होईल. शेवटी सगळे राजकीय पक्ष त्यांच्या वतीने माफी द्या असे म्हणतील. आणि माफी मिळेलही, लोकांचे मनोरंजन केले या मुद्यावर!
शेवटी कायदा हा फक्त सर्वसामान्य माणसासाठीच असतो.
23 Mar 2013 - 7:40 pm | बंडा मामा
बातमी घाईगडबडीत वाचलेली दिसते. सलमानला वगळले आहे.
24 Mar 2013 - 12:06 pm | सुधीर काळे
संजय दत्तजवळ जी हत्यारे सापडली होती ती कांहीं मामुली हत्यारे नव्हती तर AK-56 जातीची ’असॉल्ट रायफल’सारखी हत्यारे त्याच्याजवळ मिळाली. दिल्लीमध्ये काल मध्यरात्री घातलेल्या छाप्यात पकडल्या गेलेल्या आतंकावद्यांकडेही AK-47 सारखीच हत्यारे मिळाली आहेत हेही लक्षात घ्यायला हवे.
केवळ पुराव्याआभावी संजय दत्त मुंबई बॉम्बहल्याच्या कटात नव्हता असा निर्णय टाडा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिला पण या दोन्ही न्यायालयांनी अतीशय खतरनाक जातीची हत्यारे त्याच्याकडे होती या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता अशी हत्यारे स्वत:जवळ असणे हा गुन्हा गंभीर समजून त्याला ५ वर्षांची सजा दिली आहे.
असे असताना बर्याच राजकारणी लोकांना संजय दत्तचा पुळका का आला असावा? मला जे एकच कारण समजते ते असे: उद्या अशीच पाळी त्यांच्यावर आल्यास सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने माफीचा हट्ट धरण्याची व तो "पास" करून घ्यायची सोय करणे हाच एकमेव हेतू त्यामागे मला तरी दिसूतो!
ही न्यायालयाच्या अखत्यारीतील बाब आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण येऊ देता कामा नये असेही मला वाटते!
प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष काटजू यांच्याबद्दल काय सांगावे? त्यांनी अलीकडे "९५ टक्के भारतीय महामूर्ख (idiots) असतात" असे विधान केले होते. असे विधान करणारा "त्या" ९५ टक्क्यातला नसावा अशी माझी खात्री होती. पण त्यांच्या अलीकडच्या "लीला" पहाता ते नक्कीच या ९५ टक्के महामूर्खात मोडतात असेच मला वाटू लागले आहे!
ते कांहींही असो, पण संजय दत्त हा गुन्हेगार आहे व त्याबद्दल कसलीही दया-माया न दाखविता त्याला साडेतीन वर्षे तुरुंगात डांबून सरकारी पाहुणचार घ्यायला लावलाच पाहिजे असे मला वाटते! नाहीं तर लोकशाहीची "लोकशाही म्हणजे राजकारण्यांचे, राजकारण्यांनी राजकारण्यांसाठी स्थापलेले सरकार?" अशी नवी व्याख्या करावी लागेल!
24 Mar 2013 - 11:33 pm | आशु जोग
बा द वे
तेव्हा संरक्षणमंत्री कोण होते
25 Mar 2013 - 4:10 pm | खबो जाप
त्याला शिक्षा झाली तरी काही फरक पडणार नाही एकतर कसब सारखी बिर्याणी खात दिवस घालवेल ,
किव्हा काही दिवसनी ताब्बेतीचे कारण देवून सुटेल आणि परत सिनेमे करत फिरेल .
काही झाले तरी मूर्ख लोक त्याला डोक्यावर घेणारच.
मी पण आता थोडीफार समाजसेवा कार्याला व त्याची सगळीकडे जाहिरात कार्याला चालू करणार आहे , चुकून भविष्यात कुठे आडकलो तर लोक म्हणतील सोडून द्या बिचारा खूप समाजसेवा करतो :-)
आणि थोडी कलाकारी पण करावी म्हणतो :-)
25 Mar 2013 - 5:48 pm | श्रावण मोडक
हा एक दुवा...
25 Mar 2013 - 6:36 pm | मैत्र
http://www.indianexpress.com/news/sanjay-dutt-did-more-than-just-keep-a-...
संजय दत्तने नेमके काय काय केले.. हे जर पाहिले तर त्या कृतीला बालिशपणा, चूक होणे वगैरे जे समर्थन बॉलीवूड, दिग्विजय, ममता इ. करत आहेत त्यातला मूर्खपणा दिसतो..
संजय दत्त थेट अनिस इब्राहीमबरोबर पण बोलला होता आणि घरात केवळ एक गन नव्हे तर एक पिस्तुल आणि ग्रेनेड्स ठेवून घेतले होते.. स्वत:च्या गार्ड्सना सुद्धा चुकवून.. म्हणजे त्याचा स्वसंरक्षणाचा मुद्दा किती बिनबुडाचा आहे हे
लक्षात येते.
26 Mar 2013 - 6:34 am | सुहास
१९९३ च्या केसमध्ये राजकारण्यांनी मीडियाला हाताशी धरून संजय दत्तच्या नावाने लोकांना जो उल्लू बनवायचा प्रकार चालू केला आहे तो अनाकलनीय आहे. केसचा रिझल्ट लागल्यापासून एकाही मीडियावाल्याने दाऊद किंवा टायगरबाबत काय कारवाई करणार ते सरकारला विचारले नाहीए. कदाचित त्यांनासुध्दा(मीडियावाल्यांना)माहीत असावे की दाऊदला भारतात आणणे किंवा त्याला कराचीमध्ये जाऊन मारणे हे राजकीय इच्छाशक्तीअभावी अशक्य आहे. ज्या अमेरिकेने दाऊदला ग्लोबल टेरेरिस्ट म्हणून आणि तो पाकिस्तानात आहे म्हणून डिक्लेअर केले आहे, तेसुद्धा काहीही करणार नाहीत. पण आपलीच नाणी खोटी आहेत, मग अमेरिकेकडून काय अपेक्षा ठेवायची? म्हणजे बघा ना, १९८० च्या दशकात मुंबई पोलिसांनी दाऊदला पकडण्यासाठी त्याच्या मुंबईतील ऑफिसवर छापा टाकला, तेव्हा पोलिस तिथे पोचायच्या आधी त्याला म्हणे मंत्रालयातून फोन आला आणि तो दुबईला पळून गेला (संदर्भ. डोंगरी टू दुबई, एस. हुसेन झैदी). १९९३ मध्ये दाऊदने जेठमलानींना फोन करून आत्मसमर्पण करण्याची तयारी दाखवली आणि दिल्लीवाल्यांनीपण त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या, पण म्हणे महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांनी आणि काही अधिकार्यांनी त्यात मोडता घातला, आपले हितसंबंध उघड होतील म्हणून (संदर्भ. डोंगरी टू दुबई, एस. हुसेन झैदी). हे असे लोक असतील तर न्यायालयाने जरी न्याय दिला असला तरीही काही उपयोग नाही.
असो.
--सुहास
26 Mar 2013 - 7:55 am | सूर्याजीपंत
बाकी सगळं ठीक आहे. तसाही त्याच्या सुटकेची मागणी करणाऱ्या बिनडोक लोकांना मी काही फार महत्व देत नाही. माझी मागणी अशी आहे कि काटजुंकडून माजी न्यायमूर्ती हा किताब काढून घ्यावा आणि त्यांना माजी न्यायमूर्ती असल्याचे जे फायदे मिळतात ते बंद करावेत. जी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत नाही, ती माजी न्यायमूर्ती म्हणून कशाला मिरवते काय माहित. बर झालं कि या खटल्यात काटजू न्यायमूर्ती नव्हते.
28 Mar 2013 - 9:45 pm | सुधीर काळे
आज संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर आला आणि हात जोडून म्हणाला "मी इतके म्हणू शकतो की दयेसाठी मी कसलाही अर्ज केलेला नाहीं।" तो पुढे म्हणाला "इथे दयेसाठी पात्र असलेले आणखीही अनेक लोक आहेत. मी हात जोडून मीडियाला आणि माझ्या देशवासियांना सांगू इच्छितो कीं आता मीलाजर दयेचा अर्ज करत नाहीं आहे मग या विषयावर चर्चा कशाला?" हे बोलत असताना त्याचे आपल्या भावनांवरील नियंत्रण सुटले व तो रडू लागला. तो पुढे म्हणाला "माझ्या मनात सर्वोच्च न्यायालयाबद्दल सर्वात जास्त आदर आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करेल. सर्वोच्च न्यायालयाने मला २८ दिवसांचा अवधी दिला आहे. तो संपताच मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन करेन, मी आता पार कोसळून गेलो आहे आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वात कठीण प्रसंगातून जात आहे. मी मीडिया आणि समाजाला विनंती करतो कीं हे कांहीं दिवस त्यांनी मला सुखाने जगू द्यावे."
हे सर्व जेंव्हां "जस्टिस" काटजूंना सांगण्यात आले तेंव्हां ते वदले की असे असले तरी ते राज्यपालांकडे संजयच्या क्षमायाचनेसाठी शिफारस करतीलच. हे ऐकून मला माझ्या जवानीतल्या एका शेराची आठवण झाली:
गुल गयी, गुलशन गयी, गयी होठोंकी लाली
अब तो उसका पीछा छोड, वो हो गयी बच्चेवाली।
आता जर संजय दत्त स्वतःच म्हणतो आहे कीं तो दयेसाठी विनंती करणार नाहीं. मग ही फुटकळ "आशिक मंडळी" कशाला संजयच्या मागे लागली आहेत?
29 Mar 2013 - 1:04 am | दादा कोंडके
हे एव्हडं साधं असू शकत नाही. संजूबाबाने या एका आठवड्यात सगळ्या कायदेशीर शक्यता समजावून घेतल्या असतील. त्याने विनंती केल्यामुळे सुटण्याची शक्यता किती आहे?, त्याने विनंती केली नाहीतर सगळे त्याचं ऐकून गप्प बसतील का?, की उलट त्याच्या बद्द्ल सॉफ्ट कॉर्नर वाटून त्याच्या सुटकेसाठी जास्तच पाठींबा देतील, त्याने सुटकेसाठी स्वतः प्रयत्न केले आणि शिक्षा झालीच तर त्याचे हे तीन्-चार चित्रपट चालतील का? तो बाहेर आल्यावर त्याचं करीअर संपुष्टात आलं असेल का? त्याच्या शिक्षेसाठी दोन्ही बाजूने जनमत(यात मिडीआ आणी राजकारणीही आले) कसं आहे? असे अनेक पर्याय तपासून मिडिआसमोर हे नाटक केलं असण्याची शक्यताच जास्त आहे.