बातमी
अभिनेता फारुख शेख काळाच्या पडद्या आड....
एक धक्कादायक बातमी आपल्या सहज अभिनयाने प्रत्येक प्रसंग सुंदर करणारे फारुख शेख काळाच्या पडद्या आड गेले. र्हदयविकाराने त्यांचे दुबईत निधन झाले.
त्यांची प्रथम ओळख सई पराम्जपेंच्या "चश्मेबद्दूर" या चित्रपटाने झाली त्यापूर्वी त्यानी चित्रपट केले होते मात्र त्याना खरी ओळख या मुळे मिळाली. "किसीसे ना कहना, नूरी , बाजार , उमरावजान या चित्रपटांमधून त्यानी आपली वेगळी ओळख प्रस्थापीत केली. कथा सारख्या चित्रपटातील त्यांची वेगळी भूमिका देखील प्रेक्षकाना तितकीच भावली
दीप्ति नवल आणि फारुख शेख ही जोडी पडद्यावर असेल तर लोकाना सुंदर अभिनयाची आणि निखळ निर्व्याज करमणूकीची खात्री असायची.
राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलीटीकल विच हंटींग
आज मोदींच्या विरोधात पुन्हा चालू केला गेलेला खटला झकीया जाफरी आणि त्यांच्या बोलवित्या धनी मोदी विरोधक टिस्टा सेटलवाड (आणि पार्टी) परत एकदा हरल्या... अर्थात त्यांनी परत जाहीर केले आहे की आम्ही हा लढा चालूच ठेवू. जे झकीया जाफरींच्या बरोबर वैयक्तीक आयुष्यात झाले ते दुर्दैवी होते, अक्षम्य कृत्य होते. पण त्यांच्या आणि तशाच इतरांच्या भावनांशी खेळ करत जे काही टिस्टा सेटलवाड आणि त्यांच्या समाजवादी/डाव्या/स्युडोसेक्यूलर्सनी गेले १०+ वर्षे चालवले ते त्याहूनही अक्षम्य आहे असे वाटते.
आपचा चाप!
आप (आम आदमी पार्टी) ने सरकार बनवायचे मनावर घेतले आहे. पण कुणाही मंत्र्याला सरकारी बंगले देऊ नका असे सांगितले आहे. ह्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी महाराष्ट्रातील मंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी काय दिवे लावत आहेत हे शोधले. तेव्हा उर्मट शिरोमणी, अर्वाच्यभाषाप्रभू अजितरावजीदादा पवार हे मंत्री सर्वात खर्चिक आहेत असे निष्पन्न झाले. एका वर्षात ३७ लाख खर्च. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर ३३ लाख खर्च. अर्थात हे सरकारने दिलेले आकडे आहेत. कुण्या खाजगी कंत्राटदाराने खास कृपादृष्टी करुन "वरचा" खर्च केला असेल तर ते पकडले जाणे कठिण!
अनाहिता ठाणे कट्टा
नमस्कार,
आजच्या ठळक बातम्या ………
'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल
.
'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.
'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
संशयास्पदरीत्या चहा प्यायल्याबद्दल अटक...............
कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले.
मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते. त्यात संशय घेण्यासारखे आणि चुकीचे काय आहे,' असा सवालही न्यायालयाने केला".
शरीरसंबंधांना नकार हे क्रौर्य ????
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3NLG
(बातमी जुनीच आहे. कुणी तरी धागा काढेल असं वाटलं होतं म्हणून महत्वाचा असूनही मागे पडला विषय).
दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन
रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.
'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल
संदर्भः
http://www.misalpav.com/node/26057
निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व.
आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार.
सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे:
वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले.