गाभा:
साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. असा हा अमूल्य ठेवा घरोघरी असावा म्हणुनच “साहित्य चिंतन” तर्फे साने गुरूजीं लिखित ‘श्यामची आई’ विनामुल्य उपलब्ध करून दिले जात आहे आहे. सर्व इच्छुक मंडळींनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा. .
अधिक माहितीसाठी - इथे क्लिक करा
नोंदणी करण्यासाठी - इथे क्लिक करा
* उपक्रम केवळ भारतातच उपलब्ध
प्रतिक्रिया
3 Jan 2014 - 1:34 pm | गवि
माहितीकरिता धन्यवाद.
बाय द वे. श्यामची आई हे पुस्तक गूगल प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी पूर्ण मोफत उपलब्ध आहे.
हेच एक पुस्तक नव्हे तर साने गुरुजींची बालकथांची बहुतांश पुस्तकं तिथे मोफत डाऊनलोडसाठी ठेवली गेली आहेत. मोबाईलवर उतरवून कायमची संग्रही ठेवता / वाचता येतील.
3 Jan 2014 - 1:47 pm | यशोधन वाळिंबे
Android साठी विनामुल्य कॉपी इथे मिळेल.
आणी त्याखाली इतर पुस्तकेही दिसतील. .