बातमी

"वल्लीं" बरोबर....घारापुरी कट्टा....दि. १ मार्च किंवा ८ मार्च..२०१४

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
9 Feb 2014 - 11:50 am

प्रिय मिपाकरांनो,

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, कालचा आमचा फोर्ट कट्टा छान पार पडला.काय काय बघीतले आणि कोण-कोण आले होते, ह्याचा व्रुत्तांत येईलच.फिरता-बोलता-पहाता आणि खाता कट्टा असल्याने, पुढील कट्टा पण लगेच ठरला.

वल्लींना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते "घारापुरी" लेणी दाखवायला तयार झाले.मार्च मधली १ली तारीख किंवा ८वी तारीख. साल २०१४....

काही अपरिहार्य कारणा मुळे तारीख नक्की करता येत नाही आहे पण वार मात्र नक्की आहे, आणि तो म्हणजे "शनिवार".

मौजमजाबातमी

काळा घोडा फेस्टिवल कट्टा .... ८/२/२०१४

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Feb 2014 - 2:21 pm

प्रिय मिपाकरांनो,

कसे आहात?

रविवारचे जेवण कसे झाले?

वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच.

कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली.

तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे.

वार : शनिवार
दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४
वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल.
भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस

संस्कृतीकलासमाजजीवनमानतंत्रमौजमजाबातमी

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 9:18 pm

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 3:27 pm

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. पुण्यात होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.

मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.

काही मुद्दे..

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाचित्रपटविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture
टॉपगिअर्ड फिलोसॉफर in काथ्याकूट
16 Jan 2014 - 3:24 pm

आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-ma...

विचीत्र आणि दु:खद वर्तन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Jan 2014 - 11:17 am

ठाण्यात प्लेग्रूप (बालगट) शाळेच्या बसची एका कुत्र्यास धडक बसली म्हणे. त्या नंतर कुत्र्यास धडक बसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी म्हणे शाळेच्या बसची मोडतोड केली म्हणे.

देवाचा हात दिसला !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
10 Jan 2014 - 11:35 pm

२३ जुलै १९९९ साली नासाने अवकाशात पाठवलेली भारतिय वंशाच्या सुब्रम्हण्यम चंद्रशेखर या शात्रज्ञाचे नाव दिलेली "चंद्र एक्स रे वेधशाळा" तिच्यापूर्वीच्या वेधशाळांपेक्षा १०० पट जास्त अंधूक असणार्‍या तारकापूंजांची छायाचित्रे घेऊ शकते. या वेधशाळेने सर्वप्रथम शोध लावलेल्या "देवाच्या हाता"ची (hand of God) अधिकाधिक स्पष्ट छायाचित्रे आता मिळू लागली आहेत.

देवाच्या हाताचे हे नविन छायाचित्र न्युस्टार (Nuclear Spectroscopic Telescope Array (NuSTAR)) या नासाच्याच अजून एका दुर्बीणीने पकडले आहे...

विज्ञानबातमी

गेटींग (पेड) न्यूज, गेटींग पेड (न्यूज) लेख कसा वाचला (कसे वाचता) ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Jan 2014 - 10:45 am

फर्स्टपोस्टडॉटकॉमवर पेड न्यूज या विषयावरील लेखाचा हा दुवा तो लेख आणि वाचकांच्या प्रतिक्रीया दोन्ही वाचनीय वाटल्या.

काथ्याकूटाचा विषय आहे :

गेटींग (पेड) न्यूज, गेटींग पेड (न्यूज) लेख कसा वाचला (कसे वाचता) ?

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

विद्युत् बालक's picture
विद्युत् बालक in काथ्याकूट
7 Jan 2014 - 11:15 pm

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

२०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे .

ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील .

आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे .

साहित्यिक ख़ज़ीना

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 Jan 2014 - 7:47 am

कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला.

http://www.belvalkarhousing.com/

या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे.

वाङ्मयबातमी