आप (आम आदमी पार्टी) ने सरकार बनवायचे मनावर घेतले आहे. पण कुणाही मंत्र्याला सरकारी बंगले देऊ नका असे सांगितले आहे. ह्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी महाराष्ट्रातील मंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी काय दिवे लावत आहेत हे शोधले. तेव्हा उर्मट शिरोमणी, अर्वाच्यभाषाप्रभू अजितरावजीदादा पवार हे मंत्री सर्वात खर्चिक आहेत असे निष्पन्न झाले. एका वर्षात ३७ लाख खर्च. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर ३३ लाख खर्च. अर्थात हे सरकारने दिलेले आकडे आहेत. कुण्या खाजगी कंत्राटदाराने खास कृपादृष्टी करुन "वरचा" खर्च केला असेल तर ते पकडले जाणे कठिण!
ह्या उधळपट्टीला मोठी प्रसिद्धी मिळताच हे मस्तवाल मगरुर मूग गिळून पत्रकारांना सामोरे गेले आणि बंगल्यावरील जास्तीचा खर्च झाला असेल तर त्याची भरपाई देऊ असे म्हणाले. महाराष्ट्राची जनता धन्य जाहली!
http://www.abpmajha.newsbullet.in/mumbai/103/39048
केजरीवालांचे बंगला नाकारण्याचे कृत्य (ज्याला अनेक बुजुर्ग मिपाकर आचरटपणा म्हणणे शक्य आहे) घडले नसते तर ही सरकारी उधळपट्टी उघडकीस आली असती का?
ह्याने सरकारी तिजोरीवर कितीसा भार पडणार आहे हे आणि असे प्रश्न उपस्थित होतीलच. पण ही वृथा गळती ही हिमनगाचे निव्वळ टोक आहे. उर्मटेश्वरांनी इतका खर्च केला की मग त्याने हुरुप येऊन त्यांच्या सचीवाने तेच केले, उपसचिवानेही तेच, बाकी राष्ट्रवादीचे पुढच्या फळीचे नेतेही ह्यांचाच आदर्श घेणार. वगैरे. मुळात गरीबांचे कैवारी, गरीब शेतकरी मित्र वगैरे टाहो फोडणारे असा आततायी खर्च का करतात?
आपल्या खर्चांवर आता लोकांचा डोळा आहे आणि निदान निवडणुका होईपर्यंत तरी असे खजिल करणारे खर्च उघडकीस येऊ नयेत असा प्रयत्न होईल.
आपने अप्रत्यक्षपणे ह्या गोष्टीची सुरवात करुन दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक.
प्रतिक्रिया
26 Dec 2013 - 10:29 pm | यसवायजी
सुरुवात चांगली झालीय. पुढील भाग प्रतीक्षेत.
26 Dec 2013 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै बेस ! कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे.
26 Dec 2013 - 10:37 pm | खटपट्या
केजरीवाल नि बंगला नाकारला यात काहीच आचरटपणा नाही आहे.
27 Dec 2013 - 12:36 am | देव मासा
आजितजादा पवार सोन्याचा विटा बसवतिल घराला, नवल नहि वाटायचे.बाकि दिल्लित हात देउन अवलक्षन नाहि झाले म्हनजे मिळवलान बगा, हिंदि सिनेमात सारेच काहि खोटे नाहि दाखवत, नायक सत्तेवर आल्यावर ,विलन कासा खोड्या काढायला सुरवात करतो आगदी तसे,खिंड सोडा फटी आन फटीत पकडायला बघतील आता या नवीन सरकारला *diablo* ]:-> }:-> ]:> }:> >:-] >:] (6) :diablo: *DIABLO*
27 Dec 2013 - 11:29 am | जेपी
आपने अप्रत्यक्षपणे ह्या गोष्टीची सुरवात करुन दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक
+१27 Dec 2013 - 11:39 am | खटपट्या
परिणाम दिसायला लागला. खालील लिंक पहा
http://indiatoday.intoday.in/story/afraid-of-kejriwal-govt-officials-des...
27 Dec 2013 - 11:56 am | मारकुटे
अनेक वरकरणी समतोल लेखन करणारे पण आतुन भाजपाचे किंवा कॉग्रेसचे समर्थक पत्रकार, विचारवंत, प्राध्यापक इत्यादी बिरुदे लावणारे खाजगीत आपला शिव्या घालतात आणि आपली वरकमाई, मान आता कमी होणार म्हणुन आपच्या नावाने बोटे मोडत असतात.
27 Dec 2013 - 12:02 pm | सुनील
ही मंडळी खाजगीत काय करतात हे तुम्हाला कसे समजले? ;)
27 Dec 2013 - 12:09 pm | मारकुटे
आमचे सर्व स्तरावर मित्र मैत्रिणी आहेत. दारुच्या बाटल्या रिचवल्या की सर्व खाजगी बाबी बाहेर येतात.
तुमच्यासारख्या जाणकाराला हे समजावून सांगाव लागणं हे दुर्देव
27 Dec 2013 - 12:05 pm | मदनबाण
ह्म्म्म...
ही बातमी सुद्धा वाचा :- Meira Kumar gets to keep father's bungalow for 25 years
या मीरा बाईचे काही समजत नाही,चेहरा सुद्धा कुठल्या साच्यात तयार झाला आहे ते देखील कळत नाही.कुठलाही प्रसंग असो ह्यांची प्रतिक्रिया अगदी साचेबद्धच ! दिल्लीत लहान मुलीवर { निर्भया }अत्याचार झाल्यावर सुद्धा मी यांची प्रतिक्रिया पाहिली होती... तेव्हाही साचेबद्धपणे प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत काडीचाही बदल झालेला दिसला नाही.
मला वाटतं यांचे तिर्थरुप यांनी टॅक्स भरला नव्हता, जेव्हा विचारणा झाली तेव्हा विसरलो असे सांगुन मोकळे झाले होते...तुम्ही-आम्ही असे सांगितले तर कोणी ऐकुन तरी घेइल का ?
27 Dec 2013 - 7:01 pm | अनिरुद्ध प
आप ने सुरुवात तर चांगली केली आहे आता पुढे कसे निभावतात ते बघु.
27 Dec 2013 - 8:14 pm | जेपी
आज झी न्युज च '
ऑपरेशन सरकार 'हे स्टिंग किती जणांनी पाहिल . पाहिल्यास लक्ष्यात येईल केजीरीवाल यांची वाट किती अवघड आहे .
:-(
28 Dec 2013 - 11:57 pm | हतोळकरांचा प्रसाद
मला वाटते केजरीवालांनी ह्या गोष्टी (बंगला नाकारणे, लाल दिवा नाकारणे इ. ) करणे हे अपेक्षितच होते नाही का? कारण आपण वेगळे आहोत ह्या एकमेव गोष्टीवर आआपचे राजकारण आधारित आहे . त्यांनी ते न केले असते तरच नवल होते. मुद्दा हा आहे कि इथून पुढे काही महिन्यात काय प्रगती होते ते दिशादर्शक ठरेल. आणि बंगल्यांच्या खर्चाचा म्हणाल तर हि काही पहिली वेळ नाही जेव्हा महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चाची चर्चा/चौकशी झाली आहे. त्यामुळे हि सुरुवात आहे वगैरे म्हणणे थोडे उतावीळपणाचे होईल.
२४ तासात ७०० लिटर्स पाणी देऊ म्हणणारे केजरीवाल शपथविधीनंतर लगेचच आमच्याकडे जादूची कांडी नाही असे म्हणत पाण्याचा आणि विजेचा निर्णय पुढच्या आठवड्यावर ढकलतात तेव्हा सामान्य माणसाच्या (हिंदीमधला आम आदमी) मनात धस्स झाले असेल. कारण हेच कारण सर्व राजकीय पक्ष गेली ६६ वर्षे सत्तास्थापानेनंतर सांगत आली आहेत.
जिभेवर तयार केलेली साम्राज्ये लवकर विरतात असे म्हणतात, आआप चे ते होऊ नये हीच सदिच्छा!
29 Dec 2013 - 12:18 am | arunjoshi123
आम्ही दिल्लीतच राहतो. शेवटच्या दिवशी स्टींग करून आपने काँग्रेस व भाजपने वाटायला काढलेल्या दारुच्या बाटल्यांचा फारच परिणाम झाला. जिथे जिथे लोक स्वतःची दारू पितात त्या सर्व अतिउच्चभ्रू भागात आप निवडून आली. जिथे लोक पक्षाचे पितात तिथे भाजपा आली. टीव्ही वर अशा बाटल्या दाखवून आणि पोलिसांकडे त्याच्या तक्रारी करून सगळ्या चॅनेलांवर बाटल्याच बाटल्या दाखवण्यात येत होत्या. एक दिवसापूर्वी भाजपला मत देणार म्हणणारे सारे शेवटच्या दिवशी आता फक्त आपला मत म्हणून डेस्परेटली त्याविरुद्ध गेले. पण आपने सगळ्यात मोठा चमत्कार केला तो म्हणजे काँग्रेसला कंप्लीट धुतले. दिल्ली इतर भारतापेक्षा वेगळी आहे. डोळे झाकून भाजपला मत देणारी भाजप व्होटबँक इथे आहेत. काँग्रेसला मात्र भाजप द्वेषातून मते मिळत. ती आपने सगळी खाल्ली.
आपला यश येवो न येवो, पुढच्या निवडणूकीत सपेशल पडो न पडो, पण साला प्रत्येक पार्टीत ४-५ अरविंदांचं स्फुल्लिंग जर आपने पाडलं तर भारताचं कल्याण (उपरोधाने नव्हे) होईल. So it is just not important whether AAP succeeds, what is important is what it brings to Indian polity.
29 Dec 2013 - 12:31 am | विद्युत् बालक
आपाची खरा चेहरा कळेलच लवकर !
जेव्हा आप हे दिल्लीतील सरकार चालवेल तेव्हा त्यांची लोकप्रियता रसातळाला जाईल असे निवडणुकी पूर्वी म्हणायचे आता त्याचा प्रत्यय येईल
बाकी केजरीवाल यांच्या साधेपणाचे गुणगान करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याच ढुंगणा शेजारी असलेल्या गोव्याच्या मुख्यामान्त्रांचा साधेपणा व हुशारी दिसत नाही हे विशेष आहे .