साहित्यिक ख़ज़ीना

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 Jan 2014 - 7:47 am

कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला.

http://www.belvalkarhousing.com/

या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे.

लहानपणी चिवड़ा लाडूचे बोकाणे भरत भरत वाचलेले साहित्य परत वाचावयास मिळते आहे. पुनर्वाचनाचा अत्यंत उच्च आनंद अनुभविण्यास मिळत आहे. आपणा सर्वाना तो लाभावा म्हणून , सर्वांबरोबर शेअर करावासा वाटला म्हणून हा धागाप्रपंच.

मला जेवढे माहीत पडले, त्यावरून -

श्रीयुत शरदचंद्र बेलवलकर यानी "विनामूल्य साहित्य उपलब्ध करून देण्याचा" हा प्रकल्प "बेलवलकर ग्रुप तर्फे" राबविला आहे. या साइटवर त्यांचे या प्रकल्पासंदर्भात धोरण वाचण्यात आले ते पुढीलप्रमाणे - Aise Akshare is an endevour of Belvalkar Housing to regenerate and promote interest in Marathi literature. The Marathi language has a rich literary history, and this is our humble effort to promote the rich Marathi culture.

वाङ्मयबातमी

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

7 Jan 2014 - 8:01 am | चित्रगुप्त

खजिन्याची किल्ली दिलीत, पण कुलूप उघडून आतल्या खजिन्यापर्यंत कसे पोचायचे?
दुवा उघडल्यावर मराठी साहित्य कुठे आहे, हे समजले नाही. तरी कळवावे.

चित्रगुप्त जी , त्या दुवयावर क्लिक केल्यावर जे पान उघड़ते त्या पानावर उजवीकडे , खालती पहा. ऐसी अक्षरे शब्द दिसतील.

जोशी 'ले''s picture

7 Jan 2014 - 8:15 am | जोशी 'ले'

खुप धन्यवाद...

माझ्या माहीतीप्रमाणे, २०१३ मध्ये या मासिकाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मला तरी, थोर साहीत्यिकांचे साहीत्य समाजाला विनामूल्य उपलब्ध करुन देण्याची कल्पकता प्रचंड कौतुकास्पद अन सुसंस्कृत वाटली. सध्या माझं तेच चाललं आहे. अंक डाऊन्लोड करणे व एन्जोय करणे.

कवितानागेश's picture

7 Jan 2014 - 9:56 am | कवितानागेश

मस्तच आहे. :)

मुक्त विहारि's picture

7 Jan 2014 - 10:45 am | मुक्त विहारि

वाचत आहे.

स्पा's picture

7 Jan 2014 - 10:54 am | स्पा

बराच माल आहे ;)

चला ट्रेन मध्ये भरपूर वाचायची सोय झाली

प्रचेतस's picture

7 Jan 2014 - 12:48 pm | प्रचेतस

आणि त्यातले निवडक विचार तुमच्या वॉलवर वाचायची पण सोय झाली. :P

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2014 - 1:06 pm | अत्रुप्त आत्मा

@ आणि त्यातले निवडक विचार तुमच्या वॉलवर वाचायची पण सोय झाली >>> =)) दे मारा! =))

किसन शिंदे's picture

7 Jan 2014 - 4:07 pm | किसन शिंदे

याची खरं तर काहीच गरज नव्हती इथे. :)

स्पा's picture

7 Jan 2014 - 4:17 pm | स्पा

यालाच वल्लीच्या सातवाहन कालीन काड्या असे म्हणतात

प्रचेतस's picture

7 Jan 2014 - 4:22 pm | प्रचेतस

छ्या....आजकाल प्रामाणिकपणे प्रतिसाद द्यायची पण सोय राहिली नाही.

प्यारे१'s picture

7 Jan 2014 - 4:24 pm | प्यारे१

:)

चूक. सातवाहन काळात काडीला "शलाका" किंवा "काट्टिका" असे म्हणायचे. नाणेघाटातील शिलालेख ज्या रूममध्ये आहे त्याच्या शेजारीच एक पुसला गेलेला शिलालेख आहे त्यात त्याचा उल्लेख असल्याचे एका पानशेतच्या पुरात वाहून गेलेल्या गाथासप्तशतीच्या पोथीत असल्याचं एका आता डिलीट केलेल्या पीडीएफमध्ये वाचल्याचं आठवतंय. बहुतेक ती गाथा अशी होती:

"पिया जस्स मधुर केसरवर्णवरत्तिका बहुसो करस्स काट्टिका |
लवणसिंचितो आतमना वल्लि ख्यातो दु-दु-रठ्ठिका ||"

केसरवर्णवरत्तिका= यालाच पुढे जिलबी असेही म्हटल्या गेले.

अर्थ असा: " जिलब्यांची आवड असलेला आणि बहुत काड्या करणारा वल्ली आत्म्याकडून लवणवर्षावाने सिंचित होत असून दु-दु-राष्ट्रिक अशा संज्ञेने ख्यात आहे."

स्पा's picture

7 Jan 2014 - 5:27 pm | स्पा

=))

=))

किञ्चितसा बदल करून मांडल्या गेली आहे. :)

पिया जस्स मधुर केसरवण्णवरत्तिका बहुसो करस्स काट्टिका |
लवणसिञ्चितो आतमना वल्लि ख्यातो दु-दु-रठ्ठिका ||

यातही काडी सारलीच का शेवटी =)) वल्लीचे नाव आता सातवाहन + रोमन फ्याशनमध्ये 'वल्लियस काट्टिकस' ठेवावे काय =))

बदलांबद्दल +१.

शुचि's picture

7 Jan 2014 - 10:57 am | शुचि

:) Thanks to all of you too.

खटपट्या's picture

7 Jan 2014 - 11:07 am | खटपट्या

खूप खूप धन्यवाद शुचितै !!!

डाऊन लोड चालू केले आहे.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2014 - 11:07 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद शुची.

नक्कीच पाहतो. आणि निवडक साहित्य उतरवूनही घेतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2014 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद ! मोठ्या खजिन्याची वाट दाखवलित !!

खटपट्या's picture

7 Jan 2014 - 12:29 pm | खटपट्या

एक अंक सोडून सर्व डाऊन लोड झाले आहेत

vrushali n's picture

7 Jan 2014 - 1:54 pm | vrushali n

आभार..

मी देखील प्रतिसादान्बद्दल , सर्वांची आभारी आहे.

पैसा's picture

7 Jan 2014 - 3:07 pm | पैसा

मस्त साईट आहे!

मारकुटे's picture

7 Jan 2014 - 3:11 pm | मारकुटे

>>या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले

या नियतकालिकाची सध्याची स्थिती काय आहे? नेट वर पाहिले असता याच नावाची एक तद्दन रद्दड साईट सापडली.

अभ्या..'s picture

7 Jan 2014 - 3:37 pm | अभ्या..

छान लिंक शुचितै.
अवांतरः आलीस, मस्त. :)

किसन शिंदे's picture

7 Jan 2014 - 4:06 pm | किसन शिंदे

लिंकबद्दल मंडळ आभारी आहे शुचिमामी. :)

खटपट्या's picture

7 Jan 2014 - 10:05 pm | खटपट्या

मामी ??

प्यारे१'s picture

7 Jan 2014 - 4:15 pm | प्यारे१

आवडेश!
>>>सुर्हुदाच्या ... सुहृदाच्या?

शुचि's picture

7 Jan 2014 - 5:04 pm | शुचि

kavitakosh.org var type Karun liheelay to shabd. I couldn't get "हृ"

आदूबाळ's picture

7 Jan 2014 - 5:08 pm | आदूबाळ

शुचीताय, धन्यवाद्स!

मला ईमेल द्या लिंक पाठवतो असं कायसं दिसतं आहे. सगळ्यांना हेच दिसतंय का डायरेक डालो मारता येतंय?

शुचि's picture

7 Jan 2014 - 5:16 pm | शुचि

I forgot to mention - Name/email is needed.

शुचि's picture

7 Jan 2014 - 5:17 pm | शुचि

I mean mandatory.

आदूबाळ's picture

7 Jan 2014 - 5:26 pm | आदूबाळ

अच्छा! धनवा...

यांना कॉपीराईट वगैरेचं टेन्शन नाही का?

चाणक्य's picture

10 Jan 2014 - 6:20 am | चाणक्य

आजच उतरवून बघतो. धन्यवाद या माहितीबद्द्ल