गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५०
मागिल भाग..
आणि हे सुशिक्षित महाराज प्रकरण म्हणजे खरच पुन्हा त्या अज्ञाता'ची (सुरवातीच्या हो! ) आठवण करवून देत होतं. मी मनात म्हटलं..'मरे ना का त्याचा ड्रेस कसाही असला तरी..आपल्याला थोडच त्याचं अनुग्रहीत व्हायचय..आणि वैजूही आज ह्याचं ऐकेल सगळं..पण ती ही कुणाची अनुग्रहीत होणार्यातली नव्हेच..त्यामुळे भ्या कशाला?'
पुढे चालू...
====================
आणि तो सुरु जाहला.
तो:- हम्म्म.. हात जोडा.
आंम्ही:- __/\__ (नमस्कारावस्थेत गेलो.. म्हटलं बघू तरी काय घडतय!)