अरे तुझ वय काय?
अरे तुझ वय काय?
एम आय डी सी भोसरी ला असताना सकाळी १०-१०.३०च्या सुमारास आम्हि ७-८ मित्र चहा साठी एका जवळच्या उपहार जमायचो..
चहा पाणी..व्यवसाय चर्चा व गाव गप्पा असे मिटिंग चे स्वरुप असायचे..
अनेक विषय चघळायला असायचे..
त्यात आमचा एक क्ष नावाचा मित्र होता..त्याला जर एखादा विषय वा विधान पटले नाहि कि त्याची एक ठराविक म्हण होति ति तो वापरायचा..
अरे तुझ वय काय? शिक्षण काय.?.पगार काय?उंची काय ? अन लेका बोलतोय काय?
असे म्हटले कि दंगा सुरु व्हायचा अन कसे बरोबर हे पटवण्या साठी लुटुपुटीची चर्चा व्हायची..व वादळ चहाच्या पेल्यात विरुन जायचे..