वावर

अभिजात भाषा सप्ताह कधी ?

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
22 Jul 2014 - 3:24 pm

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे. याउलट, प्रत्येक राज्याच्या भाषिक परंपरेनुसार त्या त्या राज्यांमध्ये अभिजात भाषा सप्ताह पाळणे योग्य ठरेल,' असे त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

सत्याचा "बुरखा"फाश

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 7:59 am

नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल.

वावरविचार

सेलिब्रेटी येती घरा

अम्रुता आफले's picture
अम्रुता आफले in काथ्याकूट
9 Jul 2014 - 2:57 pm

नमस्कार मंडळी ,

हा उतारा लिहायचं कारण म्हणजे परवा आमच्या घरी एक मराठी नावाजलेले कवी आले होते आणि तो अनुभव मला लिहावासा वाटला .

तुम्ही मिपा विश्रांती अवस्थेत असताना काय करता ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Jun 2014 - 12:49 pm

गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.

ध्वनी प्रदुषण

फटू's picture
फटू in काथ्याकूट
26 Jun 2014 - 12:10 am

आपला कान काचेचा असता तर केव्हाच फुटला असता. याचे कारण आपण घरात टीव्ही रेडीयो स्पीकर मोठ्या आवाजात लावतो. याचा आपल्याला कायमचा त्रास होऊ शकतो. जर आपल्याला ऐकायचे असेल तर दुसर्‍यांना त्रास होऊ नये एव्हढ्या लहान आवाजात लावावेत.

आपण गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असल्यावर वाजवतो तसेच कारण नसताना पुढे सिग्नल लाल असतो आणि आपण हॉर्न वाजवतो. त्याचा लोकांना त्रास होतो.

लग्नाची वरात, दिवाळी, मिरवणूकीत आपण फटाके फोडतो, डीजे लावतो. त्याचा आपल्या कानांना त्रास होतो. आपल्या कानाचा पडदा नाजुक असल्यामुळे त्याला ईजा होऊ शकते आणि माणुस कायमचा बहिरा होऊ शकतो.

आय टी आणि आम्ही

nasatiuthathev's picture
nasatiuthathev in जनातलं, मनातलं
23 May 2014 - 7:36 pm

आय टी आणि आम्ही

शेवटचे वर्ष संपत असत ... Placement नामक पर्व सुरु होत असत .... ह्या पर्वात सगळ्या जणांना उडी घ्यायची असते किंबहुना तशी धडपड तरी ते करीत असतात .... कंपनी'ज येतात .... आपल्यातले (आमच्यातले ???) काही जण select होतात .... आम्ही मात्र अजूनही त्या कॉलेजच्या बेफिकीरीतच असतो ...

अरे होईल रे .... कंपनी कुठे पळून चालल्या आहेत का ...... अरे आपल्याला ती कंपनी च नको होती यार ... असे संवाद कट्ट्यावर ऐकायला/ऐकवायला सुरुवात होते ....
select झालेल्या मुलांचा आता एक वेगळा ग्रुप तयार झालेला असतो .... ते कॉलेज student न राहता आता प्रोफेशनल झालेले असतात ...

वावरप्रकटन

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

विश्वनाथ मेहेंदळे's picture
विश्वनाथ मेहेंदळे in जनातलं, मनातलं
23 May 2014 - 1:01 am

मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत.

येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे.

तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा.

समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

हे ठिकाणवावरसंस्कृतीकलानाट्यसंगीतइतिहासवाङ्मयकविताविनोदराहणीप्रवासदेशांतरज्योतिषफलज्योतिषराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटप्रकटनसद्भावनाअनुभवमाहितीवादविरंगुळा

पहिला पाऊस...

nasatiuthathev's picture
nasatiuthathev in जनातलं, मनातलं
20 May 2014 - 12:08 pm

पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ?????
वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो .

वावरप्रकटन

तुमच्यातले सकारात्मक गुण काय आहेत

अम्रुता आफले's picture
अम्रुता आफले in काथ्याकूट
15 May 2014 - 5:32 pm

मला अनेकवेळा असा प्रश्न पडतो असे काय आपल्याकडे दिवे लावण्यासारखे गुण आहेत जे दुसर्यांकडे नाहीत .

कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत.

आणि दुसरा म्हणजे मी काश्यातही मास्तर नाही पण मी सगळा जमवून घेऊ शकते …

हे एकदम सर्वसाधारण गुण आहेत माझ्यात ,आणि मी हेच कुणीही विचारला तरी सांगते कारण मला माझ्यातले गुण माहित आहेत आणि मला काहीही चढवून सांगायचं नसत.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
12 May 2014 - 5:47 pm

लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

वावरसंस्कृतीमौजमजाआस्वादअनुभवविरंगुळा