आय टी आणि आम्ही

nasatiuthathev's picture
nasatiuthathev in जनातलं, मनातलं
23 May 2014 - 7:36 pm

आय टी आणि आम्ही

शेवटचे वर्ष संपत असत ... Placement नामक पर्व सुरु होत असत .... ह्या पर्वात सगळ्या जणांना उडी घ्यायची असते किंबहुना तशी धडपड तरी ते करीत असतात .... कंपनी'ज येतात .... आपल्यातले (आमच्यातले ???) काही जण select होतात .... आम्ही मात्र अजूनही त्या कॉलेजच्या बेफिकीरीतच असतो ...

अरे होईल रे .... कंपनी कुठे पळून चालल्या आहेत का ...... अरे आपल्याला ती कंपनी च नको होती यार ... असे संवाद कट्ट्यावर ऐकायला/ऐकवायला सुरुवात होते ....
select झालेल्या मुलांचा आता एक वेगळा ग्रुप तयार झालेला असतो .... ते कॉलेज student न राहता आता प्रोफेशनल झालेले असतात ...

त्यांच्या वागण्यातली सहजता जाऊन त्यात एक वेगळा भाव दिसू लागतो ... हा ग्रुप पुढे वाढत जातो ...

मग एकदाची आपलीही lotery लागते आपणही कुठल्या तरी कंपन्याच्या Criteria त बसतो .... मग अचानक आपणही जबाबदार बनतो इंटरव्ह्यू राउंड पर्यंत पोचतो तिथनं बाहेर .... कधी HR तर कधी Apti . पण बाहेरचा रस्ता ह्या न त्या कारणाने ठरलेला ....

त्या वेळी ते अपयश न वाटता .... च्यायला जगात काही हीच कम्पनी आहे आहे का असला बेफिकीरीपणा सुरूच कारण त्या वेळेला कॉलेज सुरु असते ...
अशातच फेअरवेल होत select झालेल्यांना प्रेझेंट्स मिळतात ... यात आपण पण असतो तर ??? ही सल मनात कुठे तरी बोचत राहते .... त्या फेअरवेलच्या दुखापेक्षा हे दुखः खूप मोठे असते .... अशातच कॉलेज संपते ....

मग काय रिझल्ट येइ तो.... रिझल्ट येऊ देत ह्या वाक्यावर भरवसा ... रिझल्ट नंतर काहीच होत नाही म्हणून शेवटी डिग्री बरोबर एक्स्ट्रा लागताच आजकाल म्हणून पुणे - मुंबई ला क्लास ....

३ - ४ महिने तसेच गेल्यानंतर आजूबाजूचे लोक ( Detective) विचारायला लागतात ... तुमचा मुलगा/मुलगी इंजिनीअर झाला ना ??? असतो कुठे सध्या ???
मग आई-वडील .... कशी IT फिल्ड मध्ये मंदी आहे ... अमेरिकेच्या धोरणांमुळे कसे प्रोजेक्ट मिळत नाहीयेत हे सगळे त्यांना ऐकवतात .... बरोबर परवाच कॉग्निझंट ला इंटरव्ह्यू दिलाय हे पण सांगतात .... येईल पुढच्या शनिवारी रिझल्ट असा खोटा दिलासा ....

रोज सकाळी उठल्या बरोबर मेल , जॉब साईट चेक करून नंतर पटकन आवरून Walk-Ins असेल तिथे पोचायचे ...
त्या चकचकीत एसी ऑफिस मध्ये प्रवेश करताना आता हीच ती कंपनी म्हणून आत्मविश्वासाने सोपस्कार पार पडायचे ...
आम्ही तुम्हाला कळवू ह्या गोड आशेवर त्यांनी दिलेला फिल्टर चा चहा ढोसून आपण परतीकडे ...
बाहेर पडल्यावर एखाद्या चहाच्या टपरीवरचा ग्रुप बघून आपणही तेच स्वप्न रंगवायचे ....

शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडतो ... एखाद्या कंपनीच्या HR ची आणि आपली मन जुळतात ... आणि आपण हि एका IT कंपनीचे भाग असतो ...
घरी दरी आनंद होतो ... मग त्या स्ट्रगल चे पण गोडवे गायला सुरवात होते .... आंपणही "अच्छे दिन आ गये " ह्या आविर्भावात असतो पण ह्या पुढच्या प्रवासात तर खरा स्ट्रगल असतो ....

आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???

क्रमश:

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

23 May 2014 - 8:58 pm | आदूबाळ

३९४ शब्दांच्या लेखात १५८ टिंबं.

४०.१०%

सुनील's picture

24 May 2014 - 7:59 am | सुनील

टिंबांचे नॉर्मलायझेशन करायला हवे!

तुमचा अभिषेक's picture

24 May 2014 - 11:48 pm | तुमचा अभिषेक

स्वानुभवावरून सांगतोय हा, मी नया असतानाचे माझे जुने काही लेख शोधले तर त्यातही अशी टिंबांची रांगोळी कुठेकुठे पेरलेली दिसेल.
मलाही आधी वाटायचे की काहीतरी तरल आणि रोमँटीक लिहिताना टिंबे टाकली की शोभा वाढते, पण कालांतराने स्वताचेच जुने लेख वाचताना खटकायला लागल्यावर फटक्यात सोडली ती सवय.

असो, खूप झाले टिंब पुराण .. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत .. लिहा, आम्ही सिविल ईंजिनीअर पण कुठेतरी कायतरी नक्की रिलेट होत जाणार हे नक्की :)

३ - ४ महिने तसेच गेल्यानंतर आजूबाजूचे लोक ( Detective) विचारायला लागतात ... तुमचा मुलगा/मुलगी इंजिनीअर झाला ना ??? असतो कुठे सध्या ???

+१११...१० वर्षांपूर्वी माझ्याबद्दल पण शेजार्‍यांचा व खासकरुन नातेवाईकांचा भोचकपणा आठवला. *aggressive*

बाकी म्हणाल तर थोड्याफार फरकानं सेम स्टोरी.

मित्रहो's picture

23 May 2014 - 10:18 pm | मित्रहो

बहुतेकांचा अनुभव हा जवळ जवऴ सारखाच असतो. फार जुने अनुभव आठवले. तेच इंटरव्यू, तेच अप्लाय अप्लाय नो रिप्लाय, त्या उगाचच घेतलेल्या टेस्ट ज्याचा पुढ जाउन काही संबंध नसतो. मला आठवते बऱ्याचदा जागा मेनफ्रेमची राहायची इंटरव्यूत मात्र उगाचच लिंक लीस्ट विचारणार. इंटरव्यू कसा द्यावा याचे कित्येक सल्ले कुण्या नवीन नवरीला मिळत नसेल तितके सल्ले देतात. एक मात्र खरे या आयटी मुळे देशातल्या कित्येकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला माझा सुद्धा नाहीतर मॅनिफॅक्चरींग मधे कोणी विचारीत नव्हते.

मित्रहो
www.mitraho.wordpress.com

भृशुंडी's picture

23 May 2014 - 10:55 pm | भृशुंडी

टिंबं मोजण्यासाठी कोड लिहा.. हा एक इंटरव्ह्यू प्रश्न

शुचि's picture

24 May 2014 - 12:21 am | शुचि

:)

हुप्प्या's picture

24 May 2014 - 12:50 am | हुप्प्या

३ ते ५ टिंबे अथवा पूर्णविराम वाक्यात कधी वापरले जातात? अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत. बहुधा हा संकेत जुना झाला असावा. वरील लेखात पूर्णविराम द्यायचा तिथे अनेक टिंबे दिसतात. लेखकाला विनंती आहे की हा प्रकार समजावून सांगा. तीच गोष्ट प्रश्नचिन्हांची. एका प्रश्नचिन्हाने काम होत नाही म्हणून तीन किंवा त्याहून जास्त प्रश्नचिन्हे वापरली गेली आहेत असे दिसते. तर ह्या अनेक प्रश्नचिन्हांचे काय प्रयोजन? त्यामुळे नक्की काय जास्तीची अभिव्यक्ती होते हे लेखकाने कृपया सांगावे. मला खरोखर जाणून घ्यायला आवडेल. त्यातून काहीतरी नवे शिकायला मिळेल ही आशा.

अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत.

काहीतरी अपूर्ण म्हणजे ते गाळलेल्या जागा भरा तसं का?

*pardon* *sorry2* पुढच्या लेखात नक्कीच हा बदल बघायला मिळेल .
पण अनेक टिंबे दिली की काही तरी अपूर्ण आहे असे मानत असत. आहे हा संकेत मी अजूनही मानतो म्हणून तसे लिहिलंय. ;)

नया हु मै

दादा कोंडके's picture

24 May 2014 - 3:24 pm | दादा कोंडके

माझं शिक्षण झाल्यावर सगळेजण ब्यारन, शकुंतला देवीची पारायणं करून खिशात ग्लुको बिस्किट घेउन आयटी कंपन्यांचे ओपनहाउस वैग्रे द्यायला जायचे तेंव्हा हट्टानी, वेगळं पण मनासारखं काहितरी करायचं म्हणून आम्ही छोट्या-छोट्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये रिझ्युमे द्यायला भोसरी पासून हडपसर पर्यंत ते पर्वती पासून रांजणगाव पर्यंत जोडे झिजवत होतो. :)

मुक्त विहारि's picture

24 May 2014 - 3:28 pm | मुक्त विहारि

पुभाप्र...

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यामुळे उपरोलिखित IT चा अनुभव नाही पण ह्याच मनोवस्थेचे चुलत भावंड म्हणून आखाती नोकरीच्या मुलाखती दिल्या होत्या. १९७५ ते ८५ ह्या काळात आखाती नोकर्‍यांचा सुकाळ आणि वाढतं आकर्षण होतं. जे जे मित्र आखातात नोकरीला गेले होते त्यांच्या नशिबाचा हेवा वाटायचा. पण डाऴ न शिजल्याने शेवटी नाद सोडून दिला असतानाच अचानक जुन्या साहेबांनी (जे तेंव्हा मस्कतात होते) 'आखाती नोकरीत रस आहे का?' अशी विचारना केली. आणि मनांत विचार आला 'अच्छे दिन आने वाले है।' ८१ साली त्यांची ऑफर स्विकारून मस्कतात आलो. इथेही भयंकर स्पर्धा, प्रतिकुल हवामान, आप्तस्वकियांपासून दूर, आपल्या संस्कृतीपासून दूर, परक्या देशात राहताना काही प्रमाणात मानसिक त्रास वगैरे झाला. पण कधी निराशा आली नाही. हे आपण स्वतःहून स्विकारलेलं क्षेत्र आहे आणि इथेच आपल्याला प्रगती साधायची आहे ह्या विचारांनी पाय घट्ट रोवून उभा राहीलो. असो.

हे आपण स्वतःहून स्विकारलेलं क्षेत्र आहे आणि इथेच आपल्याला प्रगती साधायची आहे ह्या विचारांनी पाय घट्ट रोवून उभा राहीलो.

लाखमोलाची बात पेठकरकाका.

आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???

हो ना . काही महाभाग सरळ तोंडावर बोलतात . तुम्ही काय मस्त AC ऑफिस मध्ये बसता दिवसभर वगेरे …
तिथल्या कामाची ह्यांना काही कल्पना असते का . शारीरिक कष्ट कमी आहेत पण मानसिक कष्ट खूप असतात . त्यानेच शरीर आणि मन थकून जातं

शिर्षक आणि आतला मजकूर यातला संबंध या लेखात तरी कळत नाही दादा.

क्रमशः म्हणताय, तर पुढच्या भागात जरा शिर्षकाचं कारण कळेल अशी आशा आहे. बाकी आपण स्वत:च जेव्हा आय टी इंडस्ट्रीचा भाग आहात, तेव्हा "आय टी आणि आम्ही" याबद्द्ल काय लिहिणार हे फारच उत्सुकता वाढवणारे आहे.

आपल्याला चकचकीत ऑफिसेस , पार्ट्या , वीकेंड दिसतात पण नोकरीनंतरचा तो स्ट्रगल ती घुसमट ..... त्याचे काय ???

सुरुवातीला स्ट्रगल सगळेच करतात. घुसमटही सगळ्यांचीच होते. ती करताना त्या चकचकीत A/C कार्यालयामध्ये बसणं मात्र सगळ्यांच्या नशिबी नसतं. वीकेंड पार्टी हे काय आहे, हे पण आय टी बाहेर अनेकांना माहित नाहिये. तुमचं वेगळेपण आहे ते तिथे.

आपल्या स्ट्रगलबद्दल वाचायला नक्कीच आवडेल्. मात्र तो इतरांपेक्षा वेगळा/उजवा असल्याचं कौतुक वाचकांना करू द्या असं सुचवू इच्छितो.

मी एक मालिका सुरु केली होती, त्यातून काही माहिती मिळू शकेल.

आयटीच्या गोष्टी - नमन
आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

सुबोध खरे's picture

6 Jun 2014 - 6:12 pm | सुबोध खरे

ऑनसाईट (२), ऑनसाईट (३),ऑनसाईट (४) वगैरे पण येउ द्या. नाही तर आमच्या सारख्या निरक्षरांना कसे कळणार कि आय टी मध्ये काय असतं?
लोक जोवर पुढचा भाग येउ द्या लिहितात तोवर लिहा कि.

इतकं सुंदर लिखाण आणि फक्त तीनच भाग? का हो ? जरा अजून काही ज्ञानकण येऊ द्या आमच्या वाट्याला...?

माझ्या मते तर आयटी मधे येताना प्रत्येकाला ५ वर्षाचा दुसरा अनुभव असल्याशिवाय घेऊच नये, म्हणजे त्यांना Struggle वगैरे वाटणार नाही.

Struggle तर सर्वांना च करावे लागते. आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.

कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.

आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.

अंशतः सहमत. असे नेहमीच नसते.
काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(

कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.

पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.

अंशतः सहमत. असे नेहमीच नसते.
काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(

कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.

पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

आयटी मधे ते मस्त पैकी एसी मधे बसुन, कँटीन चे छान खावुन करायला लागते.

अंशतः सहमत. असे नेहमीच नसते.
काही कारणास्तव प्रकल्प जेव्हा हाताबाहेर जातोय तेव्हा कामाचा ताण असह्य होतो तेव्हा एसी वगैरे सारं विसरायला होतं. शनिवार, रविवार, पब्लिक हॉलिडे सारं काही विसरुन जाऊन दिवसाचे तेरा चौदा तास काम करावे लागते काही वेळा. मी स्वतः असे काम केले आहे. :(

कधी चांगली BE ची पदवी घेवुन Site वर उन्हा तानात काम करायला लागले / कामगारांच्या शिव्या आणि धमक्या मिळाल्या की कळेल.

पुन्हा एकदा एसीचा मुद्दा. :)

प्रसाद१९७१'s picture

9 Jun 2014 - 11:27 am | प्रसाद१९७१

@ धन्या - मी पण आयटी मधे च आहे. पण आधी मेकॅनिवल मधे ९ वर्ष काढुन आय्टी मधे आलो आहे. मला कधीही पुर्वी पेक्षा जास्त Stress जाणवला नाही ( आय टी मधे Stress नसतो असे मी म्हणत नाही )

दुसर्‍या Industry मधे काय ताण असतो आणि कशा कशा लोकांशी डील करायला लागते, तिथले मॅनेजर कसे बोलतात ते तुम्ही अनुभव घेतला नाही तर कळणार नाही. Non-IT Customer (तो सुद्धा विषेश करुन भारतीय ), ही काय चीज आहे ते पण अनुभवण्यासारखे आहे.

१२-१४ तास काम सगळ्या Industry मधे केले जाते त्यात विषेश काही नाही. हल्ली तो नॉर्म च झाला आहे.
Weekend ला पण सगळी कडे काम केले जाते.

तुमचं म्हणणं मी नाकारत नाही. माझा आक्षेप आहे तो नॉन आयटीवाल्यांच्या "आयटीमधील नोकरी म्हणजे एसीमधला आराम" या म्हणण्याला. :)

प्रसाद१९७१'s picture

6 Jun 2014 - 6:51 pm | प्रसाद१९७१

वरच्या पोष्ट साठी ता.क.

मी mechanical Engineering मधे ८ वर्ष घासल्या वर आयटी मधे आलो. मला एकही दिवस struggle करतोय असे वाटले नाही. आजुबाजुच्या लोकांच्या अगदी छोट्या गोष्टीं बाबतच्या कुरकुरी ऐकल्या की नक्की असे वाटते की त्यांना बाहेर चा २-४ वर्षाचा अनुभव मिळालाच पाहीजे.

पैसा's picture

13 Jun 2014 - 9:25 pm | पैसा

येऊ द्या लवकर पुढचा भाग.