तुमच्यातले सकारात्मक गुण काय आहेत

अम्रुता आफले's picture
अम्रुता आफले in काथ्याकूट
15 May 2014 - 5:32 pm
गाभा: 

मला अनेकवेळा असा प्रश्न पडतो असे काय आपल्याकडे दिवे लावण्यासारखे गुण आहेत जे दुसर्यांकडे नाहीत .

कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत.

आणि दुसरा म्हणजे मी काश्यातही मास्तर नाही पण मी सगळा जमवून घेऊ शकते …

हे एकदम सर्वसाधारण गुण आहेत माझ्यात ,आणि मी हेच कुणीही विचारला तरी सांगते कारण मला माझ्यातले गुण माहित आहेत आणि मला काहीही चढवून सांगायचं नसत.

तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?

प्रतिक्रिया

माझ्यातला चांगला गुण मंजे नवमिपाकरांच्या धाग्यावर पयला प्रतिसाद देऊन त्यानां प्रोत्साहन देतो.

बाकी

मीच पयला.

बादवे जेपी, तुम्हाला मिपाच्या इतिहासातला पयला प्रतिसाद देणारे आद्य-मीपयला-पुरुष कोणे ते माहीत आहे का?

आदूदादु मीपाच्या इतिहासातील माहित नाही पण, मी आल्यापासुनच्या इतिहासात मुवी आद्यपुरुष आहेत .

याव्यतिरीक्त कुणी असल्यास इतिहास कळवा.

आत्मशून्य's picture

15 May 2014 - 11:25 pm | आत्मशून्य

महापुरुष असावेत. ही रो़क ओन वेरी हायर स्केल, अमेजिंग फीट.

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2014 - 6:03 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्यातला सकारात्मक गुण विशेष आवडला कारण तसे करणे मला स्वतःला जमत नाही. हापिसातले काम बरेचदा घरी करतो.

माझ्या मते माझ्यातला एक सकारात्मक गुण म्हणजे असेल त्या परिस्थितीचा स्विकार करणे व त्याबरोबर जुळवून घेणे. बहुतांश लोकांप्रमाणे मलाही बदल नकोसे वाटतात पण एकदा बदल झालाच तर उगाच आभासी जगात राहत नाही. जे आहे ते आहे, पहिले नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे अन मगच त्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार करणे.

हा विचार करता करता स्वतःतील अनेक नकारात्मक गुणही आठवले जसे आरंभशूरता, काही अपवाद सोडल्यास चिकाटी चा अभाव इत्यादी. लिहिण्यासारखे बरेच आहे पण सध्या आटोपते घेतो.

बॅटमॅन's picture

15 May 2014 - 6:06 pm | बॅटमॅन

सकारात्मक गुण?

नको नको, आत्मस्तुती बुरी बला है ;)

(कचकून सकारात्मक असलेला) बट्टमण्ण.

प्रकाश घाटपांडे's picture

15 May 2014 - 7:54 pm | प्रकाश घाटपांडे

ब्याटॅ आपन आयडिया करु परस्परं प्रशंसति करु म्हंजे आत्मस्तुतीचा बोल लागनार नाई. ल्वॉक स्वगत काही बॉल्ल तरी बी आत्मस्तुती म्हंत्यात.

बॅटमॅन's picture

15 May 2014 - 9:40 pm | बॅटमॅन

अगदी अगदी, पकाकाका. मग टेन्शन इल्ले!

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Jun 2014 - 12:56 pm | llपुण्याचे पेशवेll

असे म्हणूनही तुम्ही एकमेकांचे गुणवर्णन केलेले दिसत नाही. असो मी सुरु करतो.
घाटपांडे काका -
१. जसे बोलतात तसेच वागतात (बहुतांशी)
२. अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे करत असले तरी सश्रद्धांबाबत रुक्ष नाहीत.
३. घरी गेलो तर विविध पेये आणि चकणा आनंदाने खाऊ घालतात.

विटेकर's picture

15 May 2014 - 6:27 pm | विटेकर

गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत

सकळ अवगुणामधें अवगुण| आपले अवगुण वाटती गुण |मोठें पाप करंटपण| चुकेना कीं ||१९-८-८||

अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत

+१ अवगुण भरपूर आहेत.

प्यारे१'s picture

15 May 2014 - 7:22 pm | प्यारे१

+२ अवगुण भरपूर आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2014 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला तर वरचे सगळे "अवं, गुण भरपूर आहेत." असं म्हणतायत असं कां वाटतंय ;)

बादवे, असं वाटणं हा गुण की अवगुण ?

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2014 - 7:45 pm | प्रसाद गोडबोले

गुण माहीत नाहीत .. अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला आहे..ते भरपूर आहेत

गुण पाहता जवापाडे | अवगुण पर्वती येवढे !! - संत पशाराम

>>अवगुण पर्वती येवढे !!

पर्वती? कुठे गेले सगळे पुणेकर, बघा हा काय म्हणतोय. ;)

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2014 - 9:18 pm | प्रसाद गोडबोले

अरेरे , सुडा काय रे ही तुझी अरसिकता ?

किती सुंदर उपमा दिलीय संतांनी

अवगुण पर्वती येवढे !!

अर्थात ... आमचे अवगुण आधी खुप मोठ्ठे वाटायचे पण आता चारी बाजुनी इतरांच्या अवगुणांनी अतिक्रमण केल्याने आता त्यांच्या पुढे आमचे अवगुण नाममात्र दिसण्या इतपत राहिलेत !! *new_russian*

अहाहा ... :) *yahoo*

>>किती सुंदर उपमा दिलीय संतांनी

गिर्जाकाका, हे बरंय हां!! असो, काडी लावायचा प्रयत्न केला पण जमलंसं दिसत नाहीय. ;)

बाबा पाटील's picture

16 May 2014 - 12:02 am | बाबा पाटील

अबबो,म्हणजी गोडबोले उर्फ एकडचे ना तिकडचे गिर्जा काका ? च्यामारी आम्हाला म्हायतीच नव्हती....

प्रसाद१९७१'s picture

15 May 2014 - 7:55 pm | प्रसाद१९७१

कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. >>>>>>>
- हे गुण आहेत का अवगुण?
- तुम्ही ऑफिस मधे फक्त काम करता असे तुमचे मत आहे का ऑफिस चे सुद्धा तसेच मत आहे.
- तुमचे ऑफिस चे काम घरी करता येण्या सारखे असते का? ( उदा : बँकेचा कॅशियर कसा घरी काम करु शकेल ? )
- आई, सुन वगैरे भुमिकेत शिरता म्हणजे काय करता? सुन म्हणुन सासु ला छळता?

चुकुन हा आयडी अमॄत फळे असा वाचला ! म्हंटल हे कुठलं नविन फळ ? पक्षी:- आयडी. ;)

असो...
अपुन तो ये गुन-अवगुन के बारे मे ज्यादा सोचता-वोचता तो हय नही, अपुन जैसा है वैसाइच अच्छा लगता हय...फोकट मे ये सोचने-वोचने का लफडा पालेगा कोन ?

आदूबाळ's picture

15 May 2014 - 9:46 pm | आदूबाळ

नै हो.

हे बेन आफले त्यांचे भाव आहेत...
a

पैसा's picture

15 May 2014 - 9:24 pm | पैसा
तुमचा अभिषेक's picture

15 May 2014 - 9:36 pm | तुमचा अभिषेक

प्रत्येकात काही ना काही असतेच, माझ्यात जे आहे त्याचा मी प्रचंड अभिमान बाळगतो हाच माझा सकारात्मक गुण म्हणता येईल.
मी स्वतावर प्रचंड प्रेम करतो, तसेच जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही तितकेच प्रेम करतो. जे माझ्यावर प्रेम नाही करत त्यांचा ना राग करतो ना कीव करतो, ते माझ्या हिशोबातच नसतात.
मला स्वताबद्दल बोलायला खूप आवडते, अर्थात चांगलेच. आणि ते चांगलेच बोलता यावे यासाठी आयुष्यात चांगल्याच गोष्टी करतो.
मला प्रत्येक गोष्टीत वाद घालायला आवडतो, माझे तेच खरे करायचा नेहमी हट्ट असतो मात्र समोरच्याने ते ऐकावेच अशी अपेक्षा नसते.
प्रत्येकाचा एक स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसते, त्यामुळे कोणाला बदलण्याऐवजी त्याच्याशी अ‍ॅडजस्ट होणे केव्हाही चांगले हे मी लहान वयातच ओळखलेय.
सारेच जग आदर्श झाले तर लाईफ फार बोरींग होईल म्हणून मी माझ्यातील उपजत दुर्गुण देखील तितकेच प्रेमाने जपत इतरांना कमीत कमी त्रास होईल हे बघतो.
स्वताबद्दल सकारात्मक लिहिणे हा आवडीचा विषय असल्याने इथे रोज येऊन काही ना काही लिहू शकतो, पण तुर्तास थांबतो कारण हा प्रतिसाद आहे लेख नाही ;)

आत्मशून्य's picture

15 May 2014 - 11:30 pm | आत्मशून्य

थ्रीफेज कनेक्शनपासुन आर्थींग, शेताची मोटर तार टाकुन वा न टाकटा अथवा अख्या बिल्डींगचे वायरींग वगैरे अतिश्य क्रिएटीवली, निर्धोक निर्जोखमीपध्दतीने (केवळ हौस म्हणूनच वयाच्या १३व्या वर्श्यापासुन) करु शकतो. मला वाटते दिवे लावण्यासाठी हा माझा गुण पुरेसा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2014 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

@तुमच्यात काय चांगले गुण आहेत …खरच चांगले गुण आहेत असा तुम्हाला वाटत जरूर कलवा ।तुम्चे गुण कुणाचे प्ररणा स्थान बनतील किंवा तुम्हाला तरी विचार करायला भाग पडतील कि खरच मी असा/अशी आहे का ?>>> मी काही दु..दु.. :-/ लोकांचा :-/ छळ सहन करू शकतो!http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

>>मी काही दु..दु..लोकांचा छळ सहन करू शकतो!
उदाहरणार्थ??

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2014 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/detective-smiley-emoticon.gif

चित्रगुप्त's picture

16 May 2014 - 3:05 am | चित्रगुप्त

कलवा--कळवा. प्ररणा--प्रेरणा. तुम्चे--तुमचे. विचारला--विचारले. काश्यातही मास्तर नाही????

धागाकर्तीस आणखी एक सकारात्मक गुण सुचवतो, तो म्हणजे लेखन केल्यावर दोन-चार वेळा नीट वाचून वाक्यरचना निर्दोष करणे आणि प्रत्येक शब्द जसा हवा तसा टाईप झालेला आहे याची खात्री करून घेऊन, त्यानंतर 'पूर्वपरिक्षण' करून, पुन्हा खात्री करून घेऊन, मगच धागा प्रकाशित करणे.
आपले प्रत्येक काम अगदी निर्दोष, उत्तम प्रकारे पार पाडण्याची सवय अंगी बाणली, की ऑफिसचे काय किंवा घरातले काय, सर्वच काम व्यवस्थित होत जाईल, आणि त्याचा लाभ संपूर्ण जीवनात मिळेल.
'जमवून घेणे' ठीक, पण निदान जे सहज शक्य आहे, ते तरी 'निर्दोष-उत्कृष्टतम' करण्याचा ध्यास घेणे, हे जास्त श्रेयस्कर नाही का?

एस's picture

16 May 2014 - 3:27 pm | एस

'पूर्वपरिक्षण' -- 'पूर्वपरीक्षण' :-P

चौकटराजा's picture

30 May 2014 - 3:30 pm | चौकटराजा

माशी पण चुक झाली लेह्ण्यात. पूरवी इथे स्वसंपादनाचई सोय होति ति कूठे गेली ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2014 - 6:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी प्रचंड सकारात्मक आहे. शॉर्ट टेंपर्ड आहे पण तेवढाचं प्रेमळ आहे. सही वाचा. =))

कंजूस's picture

16 May 2014 - 6:04 pm | कंजूस

काटकसर (परंतू याला लोक कंजूषगिरी म्हटतात ).

जेनी...'s picture

16 May 2014 - 7:50 pm | जेनी...

माझ्यातला एक चांगला गुण म्हणजे मी मिपावरच्या सगळ्या पूरुश लोकांन्ना ... काका म्हणते :)
रीस्पेक्ट हं !!! *good*

म्हैस's picture

30 May 2014 - 3:03 pm | म्हैस

@प्रसाद१९७१
एकदम सहमत. ढगाकार्तीने जे म्हणलंय त्यात त्यांचे गुण कुठले , अवगुण कुठले काहीच कळत नाही .
काम घरी करता येणार नसेल तर कसं करणार घरी ? आधी काम तर हवं न करायला . ;-)

शिद's picture

30 May 2014 - 3:17 pm | शिद

ढगाकार्तीने

खिक्क *biggrin*

बाकी चालू द्या.

चौकटराजा's picture

30 May 2014 - 3:22 pm | चौकटराजा

माझ्यातला पॉसीटिव्ह गुण म्हणजे कोणत्याही पॉझेटिव्ह बाजूला दुसरी एक निगेटिव्ह बाजू असते याचे भान ठेवणे.