वावर

माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
20 Nov 2014 - 1:43 pm

या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५
या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी.

वावरकथालेखअनुभव

त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 12:34 am

सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

धोरणवावरसमाजजीवनमानतंत्रराहणीविचारमत

रिवर्स अपर्थेड

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
14 Nov 2014 - 9:18 pm

मी ब्राम्हण नाही, परंतु सध्याचे आरक्षणावरूनचे वातावरण अवतीभवती बघितले कि खालील विचार माझ्या मनात येतात.
सध्याचे आरक्षण (लेटेस्ट आरक्षण सहित) जर मान्य करावे, तर ब्राम्हण समाजाला सुद्धा २% आरक्षण शिक्षण व नोकरीत द्यावे/मिळावे हि माझी प्रामाणिक कळकळ आहे.

पवारावलंबी

गणेशा's picture
गणेशा in काथ्याकूट
12 Nov 2014 - 6:39 pm

सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही .
राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ?
काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ?
राम : का हो उठू ?
काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो.
राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो ..
दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो .
काक : .ऑ ?

माझी बायको

आंबट चिंच's picture
आंबट चिंच in काथ्याकूट
30 Oct 2014 - 4:05 pm

ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये.

द्या मला एक झाडु आणुनी
घर लक्ख करेन मी
बायको ती येई कामावरुनी

द्या मला एक फुंकणी आणुनी
जेवण असे फक्कड करेन
बायकोचा दास मी गुणी

द्या मला एक पान आणुनी
लवंग काथ केवडा घालुनी
विडा बायकोला देईन दशगुणी

द्या मला एक पावा आणुनी
गाइन सुरेल गाणी
बायको जाईल झोपुनी

काही प्रसंग

सुज्ञ's picture
सुज्ञ in जनातलं, मनातलं
29 Oct 2014 - 2:12 pm

काही प्रसंग.
वेळ: तुमच्या मनात येईल ती …
स्थळ: तुम्हाला वाटते तेच.

प्रसंग पहिला

सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात.

वावरसंस्कृतीविरंगुळा

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

खोंड's picture
खोंड in जनातलं, मनातलं
24 Oct 2014 - 12:31 pm

"५ कटिंग दे रे…. "
माझ्या कडून ऑर्डर गेली …
"जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं …
दोघे सिगरेटी घेऊन आले….
"च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता
"काय झालं रे " मी
सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला
सगळे सावंत कडे डोळे लाऊन
"सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … "
"अर्रर्र …. " एका सुरात
"कस काय … "

धोरणमांडणीवावरसंस्कृतीसमाजजीवनमानराहणीशिक्षणप्रकटनविचारअनुभवमत

वेगळा विदर्भ

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in काथ्याकूट
16 Oct 2014 - 10:37 am

काही वर्षांपूर्वी आमचा माणगांव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील बर्‍यापैकी मोठा तालुका होता. मात्र प्रशासकीय तसेच लोकांच्या सोयीसाठी या तालुक्याचे विभाजन करुन तालुक्याच्या पश्चिम भागाचा वेगळा तळा तालुका बनवण्यात आला. तेव्हा कुणीही मांणगांव तालुका तोडत आहेत असे कधी कानावर पडले नाही.

गेले दोनेक वर्ष रायगड जिल्ह्याचे विभाजन करुन माणगांवपासून दक्षिणेकडील तालुक्यांच्या दक्षिण रायगड जिल्हा बनणार आहे असे कानावर येत आहे. या नविन जिल्ह्याचे मुख्यालय माणगांव असेल असेही ऐकायला येते. मात्र रायगड तोडला जात आहे अशी भाषा कधी कानावर पडली नाही.

हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
15 Oct 2014 - 2:49 pm

आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले.

तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे.

दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं.

आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......