काही प्रसंग.
वेळ: तुमच्या मनात येईल ती …
स्थळ: तुम्हाला वाटते तेच.
प्रसंग पहिला
सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात.
एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं
दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं. पण मला तर बाई आगदी सुरवातीला त्यांनी गाइलेला बिहाग प्रचंड आवडला पण मनाला भिडला अगदी
तिथेच दोन रांगा पुढे काही साधारण नुकत्याच इंजिनियर होऊ घातलेल्या चार दोन तरुणी आणि त्यांच्या पुढे पाठीमागे घोळणारे तरुण . त्यातील एक अमुक पंडितजींच्या तमुक शिष्याकडे तबला शिकतो त्यामुळे त्याला काही जास्त कळतं असा सर्वांचा समज आहे. तो तरुण मधूनच मांडीवर तबला वजवतो.
तरुण: बोहोत खूब . मालिनी ताई आज खूपच सुरेख गाईल्या. सुरुवातीचा नंद किती कंटाळवाणा होता पण.
एक तरुणी: (कौतुकमिश्रित चेहेर्याने त्याच्याकडे पाहत) हो ना . मलाही ना किती आवडला त्यांच गाणं. आपलं मत कायम एक असतं.
तिसरा : अरे चला चला बटाटेवडे संपतील.ते आधी महात्वाचे चला चला इथेच घेऊन येऊ .
ए हो रे परत असे पुढच्या वर्षीच खायला मिळतील.
थोडक्यात असले 'महोत्सव' इथेच घडतात . व भरपूर श्रोतेहि मिळतात.
................................................................................................
प्रसंग दुसरा
किती सुंदर होत्या हो कविता . ती 'सये ग सये तुझ्हेच तुला कळेना कसे' हि कविता नवीन होती नाही.
हो ना. दमलेल्या आज्जी च्या गोष्टीची पण. मला तर नं कायम रडू येतं. तू आज रडत नव्हतीस ते ?
नाही गं मी आज अंतर्मुख झ्हाले ती कविता ऐकून. तुला माहित्ये एक मुलगा तर चक्क हसत होता त्यावेळी.
शी. असे आरसिक लोकच वाट लावणार आपल्या भाषेची. डोळ्यात आसवं आलीच पाहिजेत गं. ते जुने कवी कसले दुर्बोध लिहायचे ग . हा कसा लिहितो सरळ, सोपं आयुष्यावरच.'असल्या कवींना ' समजून घेणारे आपणच गं
हो गं हो
................................................................................................
प्रसंग तिसरा
मग कसं वाटलं ?
कसं वाटलं ? काय साला भेनXX. साला यार तु तंदूर खायला नेतो म्हणून गल्ली बोळातून फिरवतो आणि तंदूर देतो ती पण असली ? यार तू नदी म्हणून नाला दाखवतो चौपाटी बरी त्यापेक्षा.
नाही पण अरे आम्हीही तंदुरी खातो. आम्हीही असले खातो आणि आम्हीही सर्व गोष्टी करून बसलो आहोत हे इथे दाखवावेच लागते नाहीतर तोही आजकाल फाउल धरतात. आम्ही जे करतो तेच खरे असते आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इथे बकालपणा नाही. इथे ती लोकल ची गर्दी नाही .तुम्ही फक्त नवे ठेवा. तुम्हाला काय समजते
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला .
पक्या : ते समजावण्याच्या पलीकडे गेलेत.
....................................................................................................
प्रसंग चवथा
चला चला दुकान बंद व्हायच्या आत मिठाई आणू .
अरे पण गरज त्याला का तुला . १०० दुकानं आहेत
नाही एखाद्या फालतू गोष्टीचा उदो उदो कसा होईल मग
तर असे अनेक प्रसंग … ज्वलंत प्रसंग … जिवंत प्रसंग… याच स्थळी … नक्की भेट द्या. !!
प्रतिक्रिया
29 Oct 2014 - 2:37 pm | कपिलमुनी
तोच पदार्थ वेगळ्या भांड्यामध्ये
29 Oct 2014 - 2:55 pm | सुनील
... नव्या कपात जुनाच 'अमृततुल्य'!
29 Oct 2014 - 11:30 pm | रामपुरी
... नव्या प्याकिंग मध्ये 'चितळ्यांचे' श्रीखंड! (तेच ते जे सहज पिता येणार नाही इतपत दाट असते)
30 Oct 2014 - 6:17 am | अत्रुप्त आत्मा
भांडे का बदलता??? =))
29 Oct 2014 - 2:41 pm | जेपी
सहमत.
जरा जमत असेल तर पुण्याच्या बाहेर पडा.
29 Oct 2014 - 3:03 pm | एस
बेरोजगार भत्त्यासारख्या काही योजना इथे सापडू शकतील. गरजूंनी अवश्य भेट द्या.
29 Oct 2014 - 3:24 pm | आदूबाळ
=)) __/\__
29 Oct 2014 - 3:27 pm | मनीषा
तिसरा प्रसंग नीट उमगला नाही नक्की काय सांगायचे आहे ?
चौथा जमला नाही ... शंभर दुकाने असतील हो पण काका हलवाई सारखी रसमलाई दुसरीकडे मिळतच नाही ना ? मग.. ?
पहिले दोन प्रसंग ओळखीचे वाटले ..
29 Oct 2014 - 3:51 pm | बॅटमॅन
एग्झॅक्टलि काका हलवाईसारखी रसमलाई कुठेच मिळत नाही.
दुसरीकडे कुठेही गेल्यास त्याच्यापेक्षा चांगली किंवा वाईटच मिळते.
31 Oct 2014 - 7:35 pm | स्वप्नज
प्रतिसाद लयच आवडेश....
29 Oct 2014 - 4:04 pm | विजुभाऊ
सर्वश्री ब्याटम्यान यांच्याशी शतशः सहमत
29 Oct 2014 - 4:37 pm | मृत्युन्जय
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला .
पण मला एक कळत नाही मुंबैच्या लोकांची अस्मिता लोकल, घाम आणी गर्दी यांना नावे ठेवल्यावर इतकी का उफाळुन येते? नाही म्हणजे हे समजु शकते की कदाचित एखाद्याला घामट वास आवडत असेल पण सरसकट सगळ्याच मुंबैकरांना आवडत असेल असे वाटत नाही. बर घाम, गर्दी आणी बकालपणा यात काय आहे आवडुन घेण्यासारखे? बर असेलच आवडत तर त्यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे.
असो. मुंबै लय भारी, मुंबै मुळेच मराठी टिकुन आहे, मुंबै सकल गुणांची आणि कलांची रक्षणकर्ती आहे, मुंबैत मिठई खुप छान मिळते आणि तुम्हाला मिठाई हवी असे चौकात उभे राहुन ओरडुन सांगितले तरी चौकातले सगळे दुकानदार शटर वरती टाकुन, जबडा पाडुन, जीभ हलवत गिर्हाइकाची वाट बघत बसतात. तस्मात कंझ्युमर इज किंग हे तत्व फक्त मुंबैत जपले जाते. वोक्के?
29 Oct 2014 - 4:48 pm | बॅटमॅन
कुठे गेले ते मुंबैला एक भिकार म्हटल्यावर सात भिकार म्हणणारे मुंबैकर? पूर्वीची मुंबै राहिली नाही.
की मुंबैचे पुणेरीकरण झालेय??? (भयावह विचार)
29 Oct 2014 - 5:50 pm | नाखु
तु सुद्धा !!!
अरे अशा भा़कड "अस्मिता-गळव्-विरेचन-निर्दालन" कार्य हिरिरीने करणारा आम्चा (खंदा) बॅट्या कुठे नेय्ऊन ठेवलाय!
आम्चा (खंदा) बॅट्या कुठे नेय्ऊन ठेवलाय!!!!
29 Oct 2014 - 5:55 pm | बॅटमॅन
बास का नाखुकाका =))
30 Oct 2014 - 7:37 am | गवि
असा डिफेन्स कोणी सामान्य मुंबईकर करताना अद्यापतरी दिसला नाही. मुंबईत उपरोक्त कसलाही त्रास नाहीये असं मुळात मुंबईकराना वाटत नाही. त्यातून वाटत असलं तरी ते अमुंबईकराला तावातावाने पटवून देण्यात वाफ दवडण्याचे कष्ट घेण्याची शक्यता कमीच.
तेव्हा उपरोक्त वाक्य सत्यकथेतले असेल तर ते अपवादात्मक असावे किंवा नवमुंबईकर असावा.
31 Oct 2014 - 9:45 am | मृत्युन्जय
की मुंबैचे पुणेरीकरण झालेय??? (भयावह विचार)
खुपच भयावह. १००% पुणेरी त्यांना होताच येणार नाही. आणी पुण्या मुंबई मध्येच अडकुन राहिले तर त्यांची अर्धी खोपोली होइल. खुपच भयाण विचार. आधीच मुंबई सहन होत नाही. हे असले काही झाले तर जीव द्यायचीच वेळ येइल.
30 Oct 2014 - 10:35 am | वेल्लाभट
हाहाहाहा
30 Oct 2014 - 6:00 pm | सिरुसेरि
वर उल्लेख केलेले काही प्रसंग हे दादर , विले पार्ले पुर्व , माटुंगा , गिरगाव , सांगली , नागपुर येथे पण घडू शकतात . तेव्हा एकट्या पुण्याला नावे ठेवण्यात येउ नयेत .
20 Oct 2023 - 7:49 pm | अहिरावण
भारीच