"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"

वैभवकुमारन's picture
वैभवकुमारन in जे न देखे रवी...
12 Feb 2014 - 5:35 pm

"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे)

भांड्याला भांडे लागणारच
शब्दाने शब्द वाढणारच
ती त्याचे म्हणणे खोडनारच
तो एक शीवी हासडून बोलणारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||1||
वातावरण शांत होते न होते तेवढ्यात …… …

तीचे ओठात पुटपुटने होणारच
परत ह्याचा पारा चढणारच
मग काचेचा ग्लास कोणी फोडणारच
भरल्या घरात हे असे घडणारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||2||
मग ती थोडी पडती बाजू घेते न घेते तेवढ्यात ......

तो मागचे उकरून काढणारच
नुसता जीव तोडून भांडणारच
आगदी स्वतःच्याच लग्नाची जुनी पत्रीका फाडणाराच
नवऱ्याचा अहंभाव पुढे मांडनारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||3||
मग ती काही न बोलता स्वयंपाकघरात कणीक मळत बसते तेवढ्यात

तिचे मुसमुसून हुंदके होणारच
मग हा चोरून तीच्याकडे पाहणारच
थोडे त्यालाही वाईट वाटणारच
तोही एक आवंढा घोटणाराच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||4||
आता दोघेही शांत , शब्दही शांत… अगदी अनोळख्यासारखे… तेवढ्यात

तो हळूच तिच्याकडे जाणारच
लाडिक मीठीत घेणारच
तीही …. माफी मागणारच
भरल्या घरात हे अस घडणारच

नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||5||

वावर

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Feb 2014 - 5:36 pm | प्रचेतस

चान चान.

आयुर्हित's picture

12 Feb 2014 - 6:11 pm | आयुर्हित

चालु द्या जोरात, फक्त शेवटी प्रेम व साथ द्या एकमेकाला म्हणजे झाले!
उत्तम निरीक्षण व कविता.
धन्यवाद

विवेकपटाईत's picture

12 Feb 2014 - 7:41 pm | विवेकपटाईत

तीही …. माफी मागणारच- *aggressive* >:o >:O >+O >:o >+o :-@ :angry:काही चुकल्या सारख वाटत (लग्नाचा २५ हून जास्त वर्षांचा अनुभव) . बाकी मस्त

दिव्यश्री's picture

15 Feb 2014 - 2:03 pm | दिव्यश्री

तीही …. माफी मागणारच- काही चुकल्या सारख वाटत (लग्नाचा २५ हून जास्त वर्षांचा अनुभव) . >>>

बाकी जोडी तुझी माझी हा कार्यक्रम जरूर पाहावा (महाग्रूंचा असला तरी ) ;) :)

मुक्त विहारि's picture

12 Feb 2014 - 7:50 pm | मुक्त विहारि

छान आहे

ऋषिकेश's picture

13 Feb 2014 - 9:47 am | ऋषिकेश

कै च्या कै कविता! असो'

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2014 - 3:31 pm | मराठी कथालेखक

तुम्ही कविता लिहणारच
आम्ही ती वाचणारच
वाचून प्रतिक्रिया देणारच

अहो कवी भॉ हे "च" खूपच झालेच की हो...

विटेकर's picture

14 Feb 2014 - 4:08 pm | विटेकर

तो एक शीवी हासडून बोलणारच
हीच खरेच कविकल्पनाच आहे...........च !

तुमचा अभिषेक's picture

15 Feb 2014 - 12:31 pm | तुमचा अभिषेक

क्डव्याच्या शेवटी तेवढ्यातच लिहायचा प्रकार छान आहे :)

मॅन्ड्रेक's picture

20 Feb 2014 - 2:37 pm | मॅन्ड्रेक

छान .

कविता वाचून जास्त गम्मत वाटली....
बाकी बायको वगैरे हायली इंफ्लेमेबल विषयात हात न घालणेच बरे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2014 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा

चुर्रर्र...चुर्र्र्रर....चुर्र्र्र्र...! =))