तंत्र

निर्णय आणि नकारात्मकता....

वारा's picture
वारा in जनातलं, मनातलं
17 Sep 2014 - 12:43 pm

दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो?

जीवनमानतंत्रराहणीमौजमजाअनुभवमतप्रश्नोत्तरेविरंगुळा

परिघ परिक्रमा

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
5 Sep 2014 - 12:41 pm

बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं.

वावरसमाजजीवनमानतंत्रराहणीविचारलेखमत

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
4 Sep 2014 - 2:07 pm
हे ठिकाणधोरणमांडणीवावरजीवनमानतंत्रमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

व्यक्त : कारण आणि परिणाम

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
3 Sep 2014 - 9:42 pm

माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का?

वावरजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारलेखमत

आळस

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
2 Sep 2014 - 11:23 pm

मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा.

मांडणीवावरजीवनमानतंत्रराहणीविचारलेखमत

नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Aug 2014 - 9:08 pm

नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
19 Aug 2014 - 2:30 pm

नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.

या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ठिकाणकलाजीवनमानतंत्रमौजमजाछायाचित्रणप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

दाक्षिणात्य भाषातील शब्दांची देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
17 Aug 2014 - 10:15 am

दाक्षिणात्य भाषातील काही शब्दांचे देवनागरी-मराठी लेखन उच्चारण इत्यादी क्वचीत कठीण भासू शकते त्या बद्दल आवश्यकतेनुसार चर्चा करून माहिती घेता यावी या साठी हा धागा काढत आहे.

मराठी विकिपीडियावरील भारतीय अक्षरांतरण हा (आयपीए लेखांतर्गत) विभाग लेखन विषयक मदतीसाठी उपलब्ध आहे.

भारतीय स्वतंत्रता वाटचाल... एक शोध

सस्नेह's picture
सस्नेह in काथ्याकूट
14 Aug 2014 - 11:57 am

उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा.
मिळवले :
१. तंत्रज्ञान प्रगती
यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

फेर्‍यात अडकलेला...

ऋतुराज चित्रे's picture
ऋतुराज चित्रे in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 5:17 pm

माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो.

तंत्रसल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदत