निर्णय आणि नकारात्मकता....

वारा's picture
वारा in जनातलं, मनातलं
17 Sep 2014 - 12:43 pm

दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो?
हाच क्रायटेरीया मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा लागु होतो का? उदाहरणार्थ , आपण एका ठरावीक कंपनीत काम का करतो? किंवा एका ठरावीक शहरात का राहतो? आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्शण द्यावे? इंग्लिश कि मराठी? कोणती शाळा असावी ? लोकल की सेंट्रल बोर्ड? गाडी कोणती घ्यावी ? टु व्हीलर की फोर व्हीलर? कंपनी कोणती? मॉडेल कोणते? इत्यादी.
मुद्दा असा आहे की सिलेक्शन मधे नवीन निर्णयातील चांगल्या गोष्टींचा जास्त विचार केला जातो कि, सध्या असलेल्या परीस्थीतीतील वाईट गोष्टींचा जास्त विचार जास्त केला जातो? उदाहरणार्थ समजा माझ्याकडे (माझ्याकडे किंवा कोणाकडेही )टु व्हीलर आहे आणि रेग्युलरली वापरतोय, तर कोणत्या वेळी मी गाडी बदलायचा विचार करेन? जेव्हा मला सद्य गाडीमधे काही त्रास असेल की एखादी नवीन गाडी मला आवडु लागेल?

बर्याचवेळा असे दिसेल की निर्णय हे वर्तमानातील निगेटीव्ह गोष्टींवर जास्त अवलंबुन आहेत. उदाहणार्थ बर्याच साबणांच्या नापसंतीने एखादा साबण आवडतो, बरेच शँपु वापरुन झाल्यावर आपण जसा आपल्याला सुट होईल तो शँपु वापरतो. एखाद्या रिटेल शॉपच्या बॅड एक्स्पेरिंस वर नवीन जागा शोधली जाते. एखाद्या होटेल मधील वाईट सर्वीस आपल्याला दुसर्या जागी वळवते. नवीन निर्णयाच्या चांगल्या गोष्टी जितक्या आकर्शीत करतात त्यापेक्षा जुन्या
परिस्थीतीतील वाईट गोष्टी दुसरीकडे वळवण्यास कारणीभुत होतात. चालु नोकरी/व्यवसायातील वाईट प्रसंगच नवी संधी शोधण्यास प्रव्रुत्त करतात. सध्य राहणीमानातील त्रासच नवीन जागा/घर शोधावयास लावतात.
तर वाचकमित्रहो, तुमच्या आयुश्यातील निर्णय तुम्ही कसे घेता? नकार निर्णयाला ड्राईव्ह करतो की नवीन गोष्टीतील प्रलोभन. आणि प्रलोभने जी भवीष्यात आहेत ती किती खरी ठरतात?

धन्यवाद..
अ‍ॅडव्हान्स मधे आभारी..

जीवनमानतंत्रराहणीमौजमजाअनुभवमतप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

वयाच्या ४० वर्षापर्यंत, नवीन गोष्टीतील प्रलोभन निर्णयाला ड्राईव्ह करते..
आणि नंतर ....नकारात्मक अनुभव !

काउबॉय's picture

17 Sep 2014 - 2:31 pm | काउबॉय

ऐसे वाटिते

पेट थेरपी's picture

18 Sep 2014 - 10:18 am | पेट थेरपी

सर्व जग हे एक म्याट्रिक्ष असून मशीनांनी चालविलेले मायाजाल आहे आपण निर्णय घेत नाही. ते आपल्याकडून घेववले जातात.

काळा पहाड's picture

18 Sep 2014 - 10:42 am | काळा पहाड

हमी घाटी लोगांचे दुकानमंदी जात नई. माल जुना असते किंवा सर्विस भेटत नई किंवा आटवड्यात चारच दिवस दुकान उगडते किंवा उद्दटासारका बोलते किंवा सगल्यात म्हत्वाचा मंजे तेला माल इकायला इंट्रेस्ट्च नस्ते. मग जाते हमी मारवाड्यांच्या दुकानात. आणि काय सांगायचं ते म्हंतो मी..