चिमणी
अर्धी बोबडी चिमणी हाक
डोळ्यांमधली चिमणी झाक
अधुनमधुन फेंदारलेले
नकटे नकटे चिमणे नाक.......
चिमणे तोंड, चिमणे केस
चिमणे हात, चिमणा वेश
काही कारण नसतानाही
रागवण्याचा चिमणा आवेश
तुझे मन चिमणे चिमणे
असेच फुलवत राहेन मी
दोघेही राहु अगदि असेच....
चिमणी तु, चिमणा मी.....