'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)
स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे
- शरद जोशी
लोकसत्ता (Published: Wednesday, February 6, 2013)
शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे व समस्या समजून घेण्याचे ठरविले..