सुनिता

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
22 Jan 2013 - 9:45 pm

ही १९८७ च्या हिवाळ्यातील गोष्ट आहे.हि १०० % सत्य घटना चक्षुरवै सत्यं आहे
मी कमांड हॉस्पिटल पुणे मधल्या अति दक्षता विभागात २४ तासाच्या आपत्कालीन कामाला(emergency) होतो. साधारण रात्री ११ वाजता बाह्य रुग्ण विभागातून(casualty) एक बेशुद्ध रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात आणले.त्याच कोणताही आगापिछा माहित नव्हता. वय साधारण २३-२४ असेल .अंगावर पँट शर्ट आणि स्वेटर. त्यापैकी स्वेटर वर अर्धवट वाळलेल्या ओकारीचे डाग.तोंडाला घाणेरडा वास येत असलेला.त्याची नाडी बघितली तेंव्हा ती मंद चालली होती (मिनिटाला ४८-५०).त्याचा श्वास पण मंद पणे चालला होता अंग थंड पडलेले(थंडीने आणि विषबाधेने दोन्ही) डोळ्याच्या बाहुल्या एकदम बारीक झाल्या होत्या. श्वासाला अगदी घाणेरडा वास येत होता. ज्या वार्ड बॉय ने आणले त्याला विचारले तर तो म्हणाला कि कोणीतरी ओ पी डी च्या बाहेर त्याला रिक्षाने आणून टाकले. त्याच्या बरोबर कोणी नाही. नाव आणि पत्ता माहिती नाही.
अर्थात त्याची नाडी आणि डोळ्याच्या बाहुल्या आणि एकंदर श्वासाच्या वासावरून कीटक नाशक प्यायल्याचे काळात होते.ताबडतोब त्याला सलाईन लावले गेले. त्यातून त्याला प्रतिविष (atropine) देणे सुरु केले. तोंडातून नळी घालून पोटात(जठरात) असलेले सर्व द्रव बाहेर काढले आणि ते केमिकल अनालिसिस साठी बाजूला काढून ठेवले. त्याला सलाईन मधून १४० ampoules atropine प्रतिविष दिले गेले.जोवर त्याच्या बाहुल्या प्रसारण पावत नाहीत तोवर त्याला हे प्रतिविष द्यावे लागते. तेंव्हा साधारण २ तासांनी त्याने डोळे उघडले. अजून अर्ध्या तासाने तो बोलण्याच्या परिस्थितीत आला. आता हा आर्मी चा माणूस नव्हता तर सिविलिअन होता तेंव्हा ती पोलिस केस होती म्हणून माझ्या मित्राने त्याला काय झाले ते विचारले. यावर तो म्हणाला कि माझे एका मुलीवर प्रेम होते पण माझे आई बाप माझे तिच्याशी लग्न करून देत नव्हते म्हणून मी बेगोन प्यायलो.
आता हि वारंवार घडणारी घटना असल्याने आम्ही हसण्यावारी नेले आणि त्याची पूर्ण तपासणी करण्यासाठी (त्याला कुठलीही शारीरिक इजा झालेली नाही हे पाहण्यासाठी) त्याचा शर्ट आणि बनियन काढला तर त्याच्या छातीवर डावीकडे हृदयाच्या जागेवर "सुनिता" गोंदलेले होते.
आमच्या सिनियर मेट्रनने त्याला हसत हसत विचारले काय रे हीच ना ती?
त्यावर तो म्हणाला कि नाही, ती वेगळी होती.
रात्री दीड वाजता अतिदक्षता विभागात हास्याचा कल्लोळ झाला.
आज सुद्धा कोणतीही महिला मला "सुनिता"नाव सांगते तेंव्हा मला हसू येते.
सुबोध खरे

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

22 Jan 2013 - 9:53 pm | आनन्दिता

प्रत्येक वेळी खरर्र खुरर्र प्रेम करतात आजकाल लोक!! वा वा मजा आली वाचुन.

सुनील's picture

22 Jan 2013 - 10:19 pm | सुनील

नाही, ती वेगळी होती

वेगळी आहे म्हणलाय तो. ;)
याच्या आधीची होती असे नाही.
एकाच वेळी प्रत्येकीवर खरर्र खुरर्र प्रेम करतात आजकाल लोक. :)

सुनील's picture

23 Jan 2013 - 12:51 am | सुनील

वेगळी आहे म्हणलाय तो

आहे नव्हे, होती ;)

रेवती's picture

23 Jan 2013 - 1:13 am | रेवती

ही ही ही.

अभ्या..'s picture

23 Jan 2013 - 1:13 am | अभ्या..

त्यावर तो म्हणाला कि "नाही". ती वेगळी होती.
ती वेगळी होती. हा खरे साहेबांनी वर्णन केलेला भूतकाळ पण असू शकतो ना? ;)
त्यावर तो म्हणाला कि "नाही, ती वेगळी होती."
हे असे असले तर सुनीलसाह्यबांशी सहमत.

दादा कोंडके's picture

23 Jan 2013 - 1:15 am | दादा कोंडके

खत्राच. मागं चेपु वर एक फोटो पाहिला होता. त्यात एकाने पुर्वी 'रोजी' लिहिलेला टॅटूवर टॅटूनेच आडवी रेघ मारून 'शिट हॅपन्स' लिहिलेलं होतं. :)

शुचि's picture

23 Jan 2013 - 1:17 am | शुचि

हाहा

गुड वन. या निमित्त्याने "आयला क्या सुरत थी ..." हे मुन्नाभाईच गाण आठवल.

तशी प्रेम करण संपत नाही. जोवर मन आहे तोवर हे प्रकरण सुरुच रहात.

इष्टुर फाकडा's picture

23 Jan 2013 - 3:42 am | इष्टुर फाकडा

हा हा हा भारी किस्सा :)

यश पालकर's picture

23 Jan 2013 - 3:45 am | यश पालकर

सैफ अली चा नातलग होता वाट्त :)

अमोल खरे's picture

23 Jan 2013 - 10:15 am | अमोल खरे

सही किस्सा. :)

अन्या दातार's picture

23 Jan 2013 - 1:17 pm | अन्या दातार

आता तात्पर्य सांग पाहू!

मुक्त विहारि's picture

23 Jan 2013 - 10:27 am | मुक्त विहारि

आवडला..

तर्री's picture

23 Jan 2013 - 12:56 pm | तर्री

लेखन आवडले.

त्याची "सध्याची" जी होती तिने याला त्या दिवशी शर्ट काढलेल्या अवस्थेत पहिल्यांदाच पाहिलं इतका बोध निश्चित झाला मला या कथेतून..

अभ्या..'s picture

23 Jan 2013 - 6:28 pm | अभ्या..

____/\____

पैसा's picture

23 Jan 2013 - 6:25 pm | पैसा

लै भारी किस्सा!