[ओ. हेन्री यांच्या 'द रोमान्स ऑफ द बिझी ब्रोकर' वर आधारित]
हार्वे मॅक्सवेल एक यशस्वी शेअर ब्रोकर होते. पीचर त्याच्या कार्यालयात स्वीय स्वचिवाचे काम करत होता. तो गुरूवारचा दिवस होता. सकाळी साडेनउला मॅक्सवेल नेहेमीप्रमाणे घाईघाईने आपल्या स्टेनोबरोबर ऑफिसमधे आले. स्टेनोचा बदललेला आविर्भाव बघून एरवी मख्ख असणार्या पीचरच्या चेहर्यावर एक क्षण आश्चर्याचे भाव नकळत उमटले. एका क्षणार्धात "गुड मॉर्निंग, पीचर" म्हणत मॅक्सवेल चित्त्याच्या चपळाईने आपल्या टेबलाकडे झेपावले. ग्राहकांची पत्रे आणि तारा यांचा एक मोठा ढीगच त्यांची वाट बघत होता. स्टेनो आपला रिवाज सोडून अजूनही मालकिणीच्या रूबाबात वावरत होती. तिच्या आगाऊपणाकदे लक्ष द्यायला पीचरकडेही नेमका त्या दिवशी वेळ नव्हता. तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.
ही स्टेनो एका वर्षापूर्वी कामावर रुजू झालेली होती. तिच्या वागण्यात एक प्रकारचा भारदस्तपणा होता. ती लावण्यवती होती. तिच्या सौंदर्यात सहजपणे नजरेत भरणारी खानदानी शान होती. पाहताक्षणी ती ठरावीक साच्यातल्या स्टेनोग्राफर पोरींसारखी नाही हे कळून येत असे. पीचर कामात आकंठ बुडालेला असला तरी तिची बदललेली वागणूक मात्र त्याच्या वारंवार लक्षात येत होती. कार्यालयात आल्याबरोबर नेहेमीप्रमाणे आपल्या केबिनमधे न जाता मॅक्सवेलच्या चेंबरमधे ती रेंगाळली. मॅक्सवेलना आपलं अस्तित्व जाणवावं इतकी लगटही तिने दोनचारवेळा केली. पण त्या वेळी मॅक्सवेल मात्र 'माणसातले' राहिलेले नव्हते. एखाद्या स्वयंचलित यंत्रासारख्या त्यांच्या हालचाली शिताफीने होत होत्या. आजूबाजूच्या जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध राहिलेला नव्हता.
तब्बल पाचव्या वेळी तिने लगट केल्यावर मॅक्सवेल खेकसले, "ही काय कटकट आहे? काही महत्वाचं काम आहे?". त्यावर "काही नाही, चालू दे!" म्हणत स्टेनो सोफिया तिच्या केबिनमधे गेली. "पीचर", एखाद्या वरिष्ठ अधिकार्याच्या स्वरात तिने पीचरला प्रश्न विचारला, "नव्या स्टेनोला रुजू करून घेण्याबद्दल साहेब काल काही बोलले होते का?". पीचरला तिची बोलण्याची पद्धत खटकली, पण नवीन स्टेनो घ्यायचीच आहे तर उगाच वाद नको असा विचार करत तो शांतपणे म्हणाला, "होय. काही जणी दहा वाजता मुलाखतीसाठी येणार आहेत. पण अजूनतरी च्युईंग गम चघळणारं आणि चित्रविचीत्र केशभूषा केलेलं एकही 'ध्यान' आलेलं नाही!". पीचरच्या बोलण्यातला बोचरेपणा तिला चांगलाच झोंबला, पण त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न दर्शवता ती शांतपणे म्हणाली, "तर मग ते 'ध्यान' येईपर्यंत मी नेहेमीप्रमाणे आपले काम करते". बरोबर दहाच्या सुमारास तीन विचीत्र केशभूषा केलेल्या आणि दोन च्युईंग गम चघळणार्या टिपीकल स्टेनो दिसणार्या पोरी मुलाखतीसाठी कार्यालयात दाखल झाल्या.
मॅक्सवेलना अक्षरशः एका क्षणाची उसंत नव्हती. जवळच्या फोनची घंटी सतत खणखणत होती. ग्राहकांची गर्दी वाढत चाललेली होती. बुकिंग घेणार्या कारकुनांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसत होती. हार्वे मॅक्सवेलचा प्रत्येक क्षण मूल्यवान होता. त्यांच्या ग्राहकांची भरीव गुंतवणूक असणार्या बारा स्टॉकना चांगलाच उठाव आलेला होता. त्यातील वेचक स्टॉकमधे हार्वेंची स्वता:ची गुंतवणूकही होती. ते त्या वेळी करार, कर्ज, उचल, पावत्यांच्या जगातच वावरत होते. पै पैशाच्या या खेळात भाव-भावनांना अजिबात थारा नव्हता. सकाळी उठल्यापासून हार्वे मनाने याच जगातले झालेले होते. त्यांना स्वतःचं असं भान नव्हतं.
मुलाखतीसाठी आलेल्या पहिल्या 'ध्यानाला' बरोबर घेउन पीचर हार्वेंच्या केबिनमधे गेला. "या आपल्याकडे स्टेनोच्या जागेसाठी मुलाखत द्यायला आलेल्या आहेत" पीचरनी परिचय करून दिला. हार्वे जवळजवळ किंचाळलेच, "पीचर, कामाचा ताण असह्य होत असेल, तर जोडीला एखादा मदतनीस घ्या. मी कुणालाही मुलाखतीसाठी बोलावलेले नाही. एक वर्षभर सोफिया चांगले काम करते आहे. तिला बदलण्याची काही गरज नाही. मुलाखतीसाठी आलेल्या सगळ्या उमेदवारांना परत पाठवा आणि माझा वेळ पुन्हा वाया घालवू नका".
"म्हातारबुवांनाच कामाचा ताण झेपत नाही खरे तर. यांचा विसरभोळेपणा त्यामुळे दिवसेंदिवस वाढतच चालला आहे" असे पुटपुटत पीचर लगबगीने कँटिनकडे गेला. एक कप चहा घेउन तो लगेच परत आला. हार्वेंची जेवणाची सुट्टी झालेली होती. ग्राहकांची वर्दळही थोडी कमी झालेली दिसत होती. हार्वेंना थोडी उसंत मिळालेली दिसली. इतक्यात त्यांचं लक्ष सोफियाकडे गेलं आणि ते लगबगीने धावतच तिच्या टेबलकडे गेले. समोर बसलेला पीचर हे सगळे बघतो आहे याची त्यांना जाणीवच नव्हती.
"सोफी, मला फक्त दोनचार मिनीटांची उसंत मिळालेली आहे. बर्याच दिवसांपासून तुला लग्नाबद्दल विचारणार होतो, पण मग त्यासाठी वेळच मिळाला नाही. मी रिकामटेकड्या लोकांसारखा तुझ्या मागेमागे गोंडा घोळत फिरू शकत नाही. त्यामुळे तुला फक्त दोन मिनीटे विचार करण्यासाठी देतो. मला लगेच निर्णय हवा आहे". सोफियानी आश्चर्यानी त्यांच्याकडे पाहिलं. एक क्षण तिचा स्वतःवरच विश्वास बसला नाही. तिला क्षणभर भोवळच आली. मग स्वतःला सावरत हार्वेंच्या गळ्यात हात टाकत ती म्हणाली, "मी तर आधी घाबरूनच गेले होते. पण आता माझ्या लक्षात येते आहे. कामाच्या प्रचंड दडपणाखाली तुमची ही अशी अवस्था झालेली आहे. हार्वे, स्मरणशक्तीला थोडा ताण देउन पहा. ऑफिसमधून घरी परत जातानाच काल रात्री आठ वाजता सेंट फ्रान्सिस चर्चमधे आपलं लग्न झालेलं आहे".
"अभिनंदन साहेब, हार्दिक अभिनंदन सोफिया मॅडम" पीचर स्वतःला सावरत शांतपणे म्हणाला. सकाळपासून घडणार्या अनाकलनीय घडामोडींमागचं कोडं त्या क्षणी उलगडलेलं होतं.
प्रतिक्रिया
21 Jan 2013 - 12:29 pm | स्पंदना
झाल का? आता लग्न झालेल लक्षात नाही तर या बाईंच कस होणार? अन या सगळ्या गदारोळात 'पिचरच" काय होणार?
कथा अपूर्ण वाटते का?
21 Jan 2013 - 12:44 pm | मूकवाचक
ओ. हेन्री यांची ही लघुकथा येथे वाचता येईल -
दुवा: http://www.literaturecollection.com/a/o_henry/43/
21 Jan 2013 - 12:53 pm | सोत्रि
कसली भारी मज्जा ह्या विसरभोळेपणाची!
-(विसरभोळा ह्वावे का असा विचार करणारा) सोकाजी
21 Jan 2013 - 1:13 pm | धमाल मुलगा
सोयीस्कर विसरभोळेपणा जास्त सोयीस्कर ठरावा. नव्हे काय? ;-)
21 Jan 2013 - 1:10 pm | अक्षया
लघुकथा आवडली. :)
21 Jan 2013 - 2:49 pm | प्रचेतस
+१
21 Jan 2013 - 2:50 pm | स्पा
कथा आवडली
अनुवाद मस्त जमलाय
21 Jan 2013 - 2:55 pm | इनिगोय
हरवलेल्या हार्वेंची मस्तच कथा! आणखीही येऊद्यात.
आभार :)
21 Jan 2013 - 6:49 pm | कवितानागेश
मजाय की! :)
21 Jan 2013 - 7:08 pm | शुचि
झकास. खो खो हसतेय.
21 Jan 2013 - 8:21 pm | आदूबाळ
काहीही!
21 Jan 2013 - 8:27 pm | पैसा
माझ्या नवर्यापेक्षा विसरभोळे लोक या जगात (निदान कथेत तरी) आहेत हे पाहून बरं वाटलं!
21 Jan 2013 - 10:30 pm | बॅटमॅन
हाही प्रत्येक नवर्याबद्दलचा प्रत्येक बायकोचा लाडका का काय म्हणतात तशातला गैरसमज असतो की काय ;)
21 Jan 2013 - 10:38 pm | पैसा
कळेल, कळेल एक दिवस!
21 Jan 2013 - 10:49 pm | जेनी...
कै पण हं :-/
ससुबै उगा माझ्या मामंजींचं नाव खराब करतात :-/
ते मुद्दाम विसरायचं ढाँग करतात ...
ससुबै सारखी कामं सांगुन छळतात त्यांना ... मग ते कामच विसरायचं साँग घेतात =))
ह्यांना पण सळोकि पळो करतात :-/
21 Jan 2013 - 10:57 pm | बॅटमॅन
ससुबै वैग्रे वाचून सशाची आठवण झाली ;)
21 Jan 2013 - 10:56 pm | बॅटमॅन
तर तर :D तरी बरं मुक्ता बर्वेछाप अपेक्षा सांगितल्या नाहीत =))
21 Jan 2013 - 11:04 pm | जेनी...
भुराया मुक्ता बर्वे खुप जाडी झालिये न. रे :(
21 Jan 2013 - 11:23 pm | बॅटमॅन
च्यायला....मरूदे ना ती. आणि ते सोड, तू सुद्दलेकन सुधार बगू आदी.... "भौ हौ रा हा या हा" असं स्पेलिंग आहे ते. भुराया नै कै , नैतर तुझ्या नावाचं पण इडंबण कर्तू की नै बग =))
21 Jan 2013 - 11:26 pm | जेनी...
भौराया इतक्या सुण्दर धाग्यावर कितीबे अवाण्तर लिवतोय्स ...
सुदार कि सोताला आता तरी :-/
=))
22 Jan 2013 - 11:57 am | बॅटमॅन
तू आदी सुद्दलेकन सुदार, बाकीचं सग्ळं सुदार्तू ;)
21 Jan 2013 - 8:27 pm | अभ्या..
ओह्ह. अस्सं आहे होय.
छान आहे.
बरे झाले प्रतिसाद द्यायचे लक्षात आले.
21 Jan 2013 - 8:29 pm | अग्निकोल्हा
...
21 Jan 2013 - 8:49 pm | रेवती
अनुवाद आवडला.
21 Jan 2013 - 9:00 pm | दादा कोंडके
अनुवाद ठिक झालाय पण कुठेतरी चुकतय असं वाटतंय. कथेच्या शेवटी कलाटणी दिल्यावर कथेत पडलेली सगळी प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. पण तसं होत नाहिये.
21 Jan 2013 - 9:27 pm | जेनी...
माझे पप्पापण भारी विसरभोळे आहेत ...
रोज एकच प्रश्न न विसरता विचारतात " परत कधी येणार ? " :(
कथा छान भाषांतरित केलीय .... मूवा :)
21 Jan 2013 - 10:16 pm | मुक्त विहारि
छान जमले आहे भाषांतर..
21 Jan 2013 - 10:47 pm | पिंपातला उंदीर
मस्त. पण कुठेतरी काहीतरी कमतरता जाणवत आहे. शब्दात नाही पकडू शकत. माय बॅड : (