आस्वाद

पुस्तक परिचयः डॉ. आई तेंडुलकर

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
9 May 2015 - 4:59 pm

संदर्भः मूळ इंग्रजी पुस्तकः डॉ. आई गणेश तेंडुलकर, लेखिकाः लक्ष्मी तेंडुलकर धौल, मराठी अनुवादः सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्तीः फेब्रुवारी २०१५, किंमतः रु.३००/-

समाजविचारआस्वादमाध्यमवेधमाहिती

एका दिवसाची कहाणी - सोनेरी किरणे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
9 May 2015 - 7:18 am

नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते.

वाङ्मयआस्वाद

पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’

पारुबाई's picture
पारुबाई in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 12:45 am

पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.

साहित्यिकआस्वादलेख

सुन्न करणारी झाडाझडती

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
6 May 2015 - 10:10 am

नुकतीच माझी विश्वास पाटीलांची "झाडाझडती" हि कादंबरी वाचून झाली. आणि मी शीर्षकात लिहिल्याप्रमाणे या कादंबरीने मला सुन्न करून सोडले. जांभळी नावाच्या एका गावात धरण होऊ घातलेलं असतं. ते धरण बनण्याआधी पासून ते धरण बांधुन झाल्यावर कितीतरी वर्षे या धरणग्रस्त गावातल्या लोकांचे किती हाल होतात हे चित्रित करणारी हि कादंबरी आहे.

मुखपृष्ठ
मुखपृष्ठाचा स्त्रोत

वाङ्मयआस्वाद

कॉफी, समुद्र, कोर्ट, आणि बरंच काही...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
5 May 2015 - 9:25 pm

गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम! कुठल्याही वेळेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा माझा सगळ्यात आवडता छंद. प्रत्येक चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत लेख लिहिणे शक्य नाही म्हणून काही नाटक-चित्रपटांविषयी थोडं लिहिण्याचा हा एक प्रयत्न.

कॉफी आणि बरंच काही...

नाट्यचित्रपटआस्वाद

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
5 May 2015 - 2:37 pm

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

१) मिनियन
.
.

savali
.
.
२) Anandphadke
.
.

छायाचित्रणअभिनंदनआस्वादविरंगुळा

साधु हास्यानंद 2

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
3 May 2015 - 7:48 pm

आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो.  भुतकाळातील आनंदी क्षण  विसरतो,  दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो.  आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो.  जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल,  आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, '

हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.

कथाआस्वाद

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
3 May 2015 - 1:30 pm

बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

साधु हास्यानंद 1

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
1 May 2015 - 11:50 am

एक गाव होते.नाव होते आनंदपुर.गाव लहान होते पण गावचे लोक खुप आनंदी आसे. त्याचे एकच कारण होते ते म्हणजे त्या गावात एक साधु बाबा राहत. त्याचे नाव त्याच्या स्वभावा नुसार पडले होते. त्याचे नाव होते साधु हास्यानंद . लोक त्याना हासरे बाबा नावाने ओळखत.
गावातील जवळ जवळ सर्वच लोक त्याचा सल्ला घेत. त्यामुळे गावातील लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला दिसत.

कथाआस्वाद