अत्युच्च साहसी सायकलिंग...
सायकल चालवणे ही काहींच्या सर्वसामान्य जीवनातली आवश्यकता आहे तर इतरांसाठी आरोग्यदायक व व्यायाम आहे. काहींसाठी ते स्वतःतील धमक आणि त्राण सहन करण्याची सीमा (stamina) सिद्ध करण्याचा आनंददायक खेळ आहे. काही थोड्यांनी या वरवर साध्या व सोप्या वाटणार्या आणि केवळ मानवी ताकदीवर चालवल्या जाणार्या दोनचाकी वाहनाला आपल्या साहसाची भूक भागविण्यासाठी एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे... तो खेळ, छंद अथवा वेड साहसी सायकलिंग (adventure cycling) या नावाने ओळखला जातो. ह्या खेळाची आवड असणारा काहीसा वेडा असलाच पाहिजे !