नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २
नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २
प्रा अद्वयानंद गळतगे
नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २
प्रा अद्वयानंद गळतगे
मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी.
साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच......
मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते. गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
(कथा आणि पात्र काल्पनिक आहे)
काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.
मला गांधी भेटला होता ही कविता फेसबुकवर वाचायला मिळाली. कवितेतला आशय कसा असावा याबद्दल कुठलंही मत न नोंदवता पण असं म्हणावंसं वाटतं की साहीत्य अकादमी वगैरे वगैरे वाचून अपेक्षा बनल्या त्या मानाने कविता तितकीशी ग्रेट वाटली नाही. पण या अपेक्षा बाजूला ठेवल्या तर नामदेव ढसाळांच्या प्रभावात कविता लिहीली गेली का अशी शंका येते. कवीविषयी माहीती असल्याशिवाय मत बनवू नये असा नियम आहे हे नव्याने कळालं.
डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे
आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते.
या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपला मिपा वार्ताहर : ठाणे दि १७ मे २०१५ - श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!). आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना टकाच्या भ्रमणध्वनीवर डॉ. खरे यांचा फोन आला (तो त्यांचा फोन आहे हे मला नंतर कळले ).
पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या. मला आवडलेल्या या काही मुद्रा