शहाणे करोनी सोडावे, सकलजन ? सर्वसामान्याकडे विवेक आणि शहाणपण उपजत असते यावर विश्वास ठेवावा की ठेऊ नये ?
समर्थ रामदास स्वामींच एक वाक्य आहे, "आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन" प्रथम दर्शनी बहुतांश लोकांना भावेल असा हा एक सुविचारच आहे. हे वाक्य मला स्वतःला धरून मोठ्यासंख्येतील मराठी लोकांना प्रेरणादायी आणि लोकप्रीय असल तरी या वाक्यातील, शहाणे करोनी सोडावे, सकलजन हा भाग गैरसमज निर्माण करणारा ठरतो का ? स्वतःची/समुहाची व्यक्तिगत मते/दृष्तीकोण आणि त्या पाठीमागचे हितसंबंध दुसर्यांवर लादण्याच अनाठायी लाभ घेण्यास शहाणे करोनी सोडावे, सकलजन प्रवृत्त करू शकेल का ?