सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार
सैतानाच्या भात्यामधले
चार बाण धारदार
उपहास, चरित्र-हनन
हत्या व जयजयकार
होता त्यांचा वार संहार
न ज्ञानामाउली वाचणार
ना महात्मा वा घटनाकार
प्रथम उपहासे यथाशक्ती दुर्लक्षीणार
लोकामुखी गाथा इंद्रायणी बुडविणार
नंतर इतिहासे चारित्र्य डागाळनार
बाई वा बाटलीशी नाळ जोडवणार
तरीही न खचला महामानव जर
हत्या त्याची निश्चित ही होणार
जर कीर्तीरूपी तो उरला
तर समाधी स्थळी माथा टेकवून
मुखे जयजयकार करणार