(चा)वटपोर्णिमा
आजच्या वटपौर्णीमेनिमित्त whatsapp फेसबुकवर अनेक मेसेज येत होते.त्यातले एकदोन सरळ शब्दात शुभेच्छा देणारे मेसेज वगळता बरेचसे मेसेज खिल्ली उडवणारे होते.विवाहसंस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी हे व्रत सुरु झाल असाव.आजच्या काळात याचा फोलपणा जाणवू लागला आहे.म्हणून असे विनोदी मेसेज उत्स्फुर्तपणे शेअर केले जातात. एकंदर स्त्री-पुरुष संबंध आणि त्याला दिलेली विवाहाची चौकट असा हा गुंतागुंतीचा प्रकार आहे.अर्थात हि चौकट केवळ चौकात पाळायची असते यावर ७०% जोडपी सहमत होतील.लिव्ह इन रिलेशनशिप च्या जमान्यात विवाह बंधन हे खूपच जाचक ठरत आहे.
