मुक्तक

क्रिकेट ते कबड्डी...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
4 Aug 2015 - 12:10 pm

शाळकरी वयापासून कबड्डी आणि खो-खो हे माझे आवडते खेळ. क्रिकेटची मात्र पराकोटीची नावड. इतकी पराकोटीची की घरात कोणी क्रिकेटची मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टीव्ही बंद करायला लावायचे.

मुक्तकप्रकटन

जडण घडण - २५

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
1 Aug 2015 - 12:44 pm

जडण-घडण -२५
...कसे आहात. आज कसं काय बोलावंसं वाटलं...
मला रोज वाटतं. इथून ये-जा करावी लागतेच मला. मग... जाऊ दे. तू कशी आहेस. मी इथे उभा आहे, आपल्या बस स्टॉपवर...
मला छान हसू आलं.
अरे वा, लवकर आलात.
मग बराच वेळ माझी चौकशी. कशी आहेस, काय करतेस, घरातलं सगळं आणि बरंच काही. खरं तर मी कार्यालयात इतका वेळ कधीच फोनवर नसते. तो दिवस मात्र अपवाद ठरला. केवढं विचारायचं, बोलायचं आणि सांगायचं राहिलं होतं त्याचं. मी क्वचित बोलत होते.
मग म्हटलं, एका दिवसातच बोलायचंय का सगळं. बरं. मग पुन्हा बोलायला नको. संपवून घ्या आजच सगळं बोलणं.

मुक्तकप्रकटन

पळस दरी कट्टा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 11:33 pm

पळस दरी कट्टा

रविवार सकाळ दिनांक २ ऑगस्ट पळस दरी येथे कट्टा करण्याचे ठरले आहे त्याचा तपशील असा आहे
सकाळी ०८. ३३ ठाणे येथून सी एस टी खोपोली गाडीने सरळ पळसदरी येथे ०९४९ ला उतरायचे. तेथे धरणात पोहोता येईल स्वामी समर्थ यांच्या मठात जाता येईल धबधब्यात जाता येईल. तेथेच हॉटेल मध्ये जेवायचे आणि तेथून १४०८ च्या गाडीने मुंबईला परत यायचे.
अधिक तपशील येइलच
सांगा कोण कोण येणार आहे?

मुक्तकप्रकटन

आमच्या आयुष्यातले कलाम

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
29 Jul 2015 - 12:36 pm

अब्दुल कलाम यांच्या निधनाची बातमी काल व्हॉटस्‌ऍपवर समजली. आणि सगळ्या ग्रुप्सवर हीच चर्चा सुरु झाली. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच दुःख झाले.

महान वैज्ञानिक, मिसाईल मॅन, प्रकल्प व्यवस्थापक, नेते, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती, अशा त्यांच्या अनेक ओळखी आहेत. अनेकांनी त्यांचा आजच्या वृत्तपत्रांमध्ये भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती असा उल्लेख केला आहे, आणि तो अगदी सार्थच आहे.

i1

मुक्तकप्रकटन

जडण- घडण : २४

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 3:28 pm

लग्नाची नियोजित तारीख जवळ येत चाललेली. त्याच्याकडून काहीच संवाद नाही. मी सुद्धा स्वत:शीच कठोरपणे वागत संपर्क नाहीच केला पुन्हा. तेच उत्तर पुन्हा ऐकणं सहन नसतं झालं.. नियोजित नवऱ्याशी बोलणं सुरू. मैत्रीचा, विश्वासाचा एकमेव संवाद. जे त्याला कळत नव्हतं, आई-बाबांपर्यंत पोहोचत नव्हतं, ते याला कसं समजून घेता येतंय, याचं आश्चर्यही वाटत नव्हतं. बाकी सगळी कवाडं घट्ट मिटून घेतल्यासारखी. स्वत:ला शांत ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. प्रत्येक रात्र तगमग करणारी, झरत्या डोळ्यांनी उशी भिजवणारी.

मुक्तकप्रकटन

सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 10:01 am

सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!

मुक्तकआस्वाद

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

ganeshpavale's picture
ganeshpavale in जनातलं, मनातलं
24 Jul 2015 - 12:05 pm

[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा.]

शोकांतिका
*********************

मुक्तकसमाजजीवनमानसद्भावना

पाऊस आपला आणि (पडद्यावरचा)

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
23 Jul 2015 - 10:46 am

पाऊस आपला आणि (पडद्यावरचा) आणि आतला-बाहेरचाही !!!!

=====
त्याचा किंवा तीच्या आर्जवांना "होकार" आलेला असतो अन मन सावरीच्या कापसासारखं हलकं तरंगत असतं वास्तवाची जमीन दिसत नसतेच. फक्त स्वप्नांची दुनिया ती आणि तो बाकी कुणी नाही बस्स!

नेमका पावसाळा येतो आणि आलम दुनियेतील प्रेमीवीरांना तो सिनेमातल्या सारखा भेटत राहतो कधी काळे ढङ दाटून पडेल न पडेल असा तर कधी घरभर धावणार्या बाल गोपाळांसारखा आडवा यिडवा आतून बाहेरून भिजवून चिंब करणरा.

त्यांच्या प्रेमा-विरहासारखाच एकाच वेळी हवा-हवासा आणि नकोसाही!

संगीतमुक्तकआस्वादविरंगुळा

पुनर्भेट

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 10:08 pm

२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली. त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’.

कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच.

मुक्तकअनुभव

पूर्वेच्या समुद्रात ५

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 8:38 pm
मुक्तकप्रकटन