पाऊस आपला आणि (पडद्यावरचा) आणि आतला-बाहेरचाही !!!!
=====
त्याचा किंवा तीच्या आर्जवांना "होकार" आलेला असतो अन मन सावरीच्या कापसासारखं हलकं तरंगत असतं वास्तवाची जमीन दिसत नसतेच. फक्त स्वप्नांची दुनिया ती आणि तो बाकी कुणी नाही बस्स!
नेमका पावसाळा येतो आणि आलम दुनियेतील प्रेमीवीरांना तो सिनेमातल्या सारखा भेटत राहतो कधी काळे ढङ दाटून पडेल न पडेल असा तर कधी घरभर धावणार्या बाल गोपाळांसारखा आडवा यिडवा आतून बाहेरून भिजवून चिंब करणरा.
त्यांच्या प्रेमा-विरहासारखाच एकाच वेळी हवा-हवासा आणि नकोसाही!
पावसात अडकून पडलेल्या सगळ्या प्रेमीजीवांना सिनेमातल्या सारख्या आड-जागा थोडीच मिळतात त्यांची अडकून पडायची ठिकाणे बसस्टॉप नाहीत गेला बाजार हाफिसचा कॅरीडॉर किम्वा बंद दुकानाच्या पायर्या त्यामुळे "पायरी" ओळखूनच थांबावे लागते.
पावसात अडकलेल्या प्रेमी जीवांची तगमग साल १९६९ शक्ती सामंता आणि आवडता काका राजेश खन्ना आणि अतिलाडीक शर्मीला टागोर यांनी "आराधना" करून सार्थ केली आहे. तेव्हाच्या सेंन्सॉरचे बंधन आणि प्रतीगामी (?) समाज यांच्या मुळेच :
(रोक रहा है हमको ज़माना
दूर ही रहना पास ना आना) - (२)
कैसे मगर कोई दिल को समझाये - ए - ए - ए ...
रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना
भूल कोई हमसे ना हो जाये
पण नंतर समाजाची प्रगती झाली आणि भिंतीवर सावल्या दाखविण्यापेक्षा प्रत्यय मागणारे सुजाण प्रेक्षक मागणीला शरण जावून बिचार्या निर्मात्यांनी प्रेमीवीरांना जरा मोकळीक दिली (यात निर्माते बिचारे की प्रेमीवीर हे नक्की ठाऊक नाही)
१९८२ साली आलेल्या "बेताब" मध्ये बाहेर धुव्वाधार पाऊस आणि आत ही मॅन पुत्तर सनी देओल आणि दणकट अमृता सिग यांनी बाहेर कडाडणार्या वीजेला मनापासून दाद देऊन पाऊस साजरा केला.
बादल यूँ गरजता है डर कुछ ऐसा लगता है
चमक-चमक के लपक के ये बिजली हम पे गिर जायेगी
बाहर भी तूफ़ान, अन्दर भी तूफ़ान
बीच में दो तूफ़ानों के ये शीशे का मकान
ऐसे दिल धड़कता है
डर कुछ ऐसा लगता है ...
ये दीवानी शाम ये तूफ़ानी शाम
आग बरसती है सावन में पानी का है नाम
बस कुछ भी हो सकता है
डर कुछ ऐसा लगता है ...
दोन्ही गाण्यातील साम्य म्हणजे सावधानता पाळली नाही तर अपघात होईल याचा सूचक इशारा होता. राजेशने मानला नाही आणि आराधनाला पुढे कथा मिळाली. सन्नीला खलनायकाला तुडवायचे असल्याने त्याने संयम ठेवला ( अमृता च्या भीतीने असे काही जण म्हणतात ख. खो. राहुल रवैल जाणे)
आणिखी एक योगायोग म्हणजे एकात सासुबै तर एकात सुनबै होत्या.
पण याचा अर्थ असा नाही की पावसाने प्रेमीवीरांना कायम अडचणीत आणि प्रलोभनात ओढलयं.
काही नितांत सुंदर भिजावसा वाटणारा पाऊस आहे. अग्रभागी आहे साल १९७९ ला आलेला "मंझील" अ गर्ल नेक्स्ट डोअर मौसमी आणि अंन्ग्री नसलेला अमिताभ यांनी पावसात अक्शरशः भिजवीले. योगेशची समर्थ लेखणी आणि पंचमची सुरावट यांना पडद्यावर अस्सल वाटेल असेच छायाचित्रणाची साथ. एकूण मस्त भट्टी जमलेले गाणे.
रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...
जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे,
अरमाँ हमारे पलके न मूंदे
कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...
महफ़िल में कैसे कह दें किसी से,
दिल बंध रहा है किस अजनबी से
हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...
हाच पाऊस आला नाही नुसतंच भरून आलं तर अगदी जीवघेणा ठरतो प्रेमपाखरांना आणि तेच समर्थ पणे आलंय सन १९७१ च्या "शर्मीली" मध्ये. ऐन बहारीतील राखी आणि गुलकंदी शशी कपूर यांची जोडी चांगली होतीच या सिनेमात. पण नीरज सारख्या मूळच्या कवीमनाच्या गीतांना "दादा" माणसाने संगीत दिले होते. त्यातील हे कडवे तर खासंचः
सब के आंगन दिया जले रे, मोरे आंगन जिया
हवा लागे शूल जैसी, ताना मारे चुनरिया ) - २
कैसे कहूँ मैं मन की बात, बैरन बन गयीं निंदिया
बता दे मैं क्या करूँ
मेघा छाए आधी रात, बैरन बन गई निंदिया
असाच आतला अव्य्क्त पाऊस नेमका बाहेर येतो, बाहेर पर्जन्याची नुसती चाहूल लागली तरी. सन १९८१ संतोष आनंदच्या लेखणीतून आलेले "प्यासा सावन" चे गीत (संतोष आनंद ने मनोजकुमार सोडून बाहेरील निर्मात्यांसाठी ही तितक्याच ताकदीची गाणी लिहिली आहेत).
इथेही मौसमी आहेच, पण साडीतही सौंदर्य खुलते ते या “कपडा-कथा काटकसर” जमान्यात कशाला सांगत बसायचे प्रत्यक्ष पहाच.
मेघा रे मेघा रे, मेघा रे मेघा रे
मत परदेस जा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
कहाँ से तू आया कहाँ जायेगा तू
के दिल की अगन से पिघल जायेगा तू
धुआँ बन गयी है ख़यालों कि महफ़िल
मेरे प्यार कि जाने कहाँ होगी मंज़िल
हो मेघा रे, मेघा रे मेघा रे मेघा रे
मेरे ग़म की तू दवा रे, दवा रे
आज तू प्रेम ...
बरसने लगी हैं बूँदें तरसने लगा है मन
हो, ज़रा कोई बिजली चमकी लरज़ने लगा है मन
और न डरा तू मुझको ओ काले काले घन
मेरे तन को छू रही है प्रीत की पहली पवन
हो, मेघा रे मेघा रे
मेरी सुन ले तू सदा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
लक्ष्मी-प्यारेंची भारतीय संगीताशी बांधीलकी+प्रेम या गाण्यात जास्त उठून दिसते.
चांगले गीत समर्थ संगीतकार आणि नशीबी "कला" कार पाहण्याचे सत्भाग्य (?) साल १९७३ ला लाभले
कैफी आझमीचे गीत आणि मदन मोहनची सुरावट असल्याने मुकाट प्रेक्षकांनी पडद्यावरील हे "जख्मं" "हसते हसते" सहन केले.
आत्ताच्या पिढीला "नवीन" कोण हे माहीत नसेल पण तो अभिनयाबाब्त "निश्चल" होता हे अगदी खरे आहे आणि तोडीस तोड म्हणून्च "राजवंशातील प्रिया" होती. (मला या गाण्यातूनच साधारण कल्पना आली होती की "हीरा-रांझा" मध्ये जानी राजकुमार सतत रानोमाळ "ये दुनिया ये मह्फिल" म्हणत कफल्लकपणे का भटकत असावा. अगदी वास्तववादी सिनेमा असावा तो) तर असो.
तुम जो मिल गए हो तो ये लगता है के जहाँ मिल गया
एक भूले हुए राही को कारवाँ मिल गया
बैठो न दूर हमसे, देखो खफ़ा न हो
क़िस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो
मेरी क्या ख़ता है, होता है ये भी
की ज़मीं से आसमां मिल गया, तुम ...
किमान एका सुंदर संगीतासाठी आणि गीतासाठी तरी याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.(पाहिजे तर ऐकत ऐकत इतर कामे उरका)
प्रियाबैचे भाव संपूर्ण गाण्यात एकसारखे आहेत हे तुम्ही मान्य केलेच पाहिजे!!
बाहेरचा पाऊस पाहून स्वस्थ बसायला न आवडता मनसोक्त भिजण्यात राजेशखन्नाचा पहिला नंबर लागतो. काका त्या काळच्या हरेक हिरवणीबरोबर भिजलाय!! मुम्मु बरोबर जरा जास्तंच. १९७२ च्या "अपना देश"मध्ये पंचमनी आंनंदाचे दान दिले ते लुटा !
कि : कजरा लगा के गजरा सजा के बिजुरी गिरा के जइयो ना
ल : नैन मिला के चैन चुरा के निंदिया उड़ा के जइयो ना
कि : मुखड़ा न देखो दर्पण में झाँको ज़रा मेरे मन में
ऐसे जिया पे छाई हो जैसे घटाएँ सावन में
रात और दिन तुम्हरे बिन मन में और कौन है
अब ज़िद छोड़ो न आगे-आगे दौड़ो दिल ना मेरा तोड़ो
घुँघटा गिरा के मुखड़ा छिपा के बिजुरी गिरा के जइयो ना
ल : नैन मिला के ...
आता एका सुपरस्टार ने केले कि दुसर्याकडून त्या अपे़क्षा आल्याच ! राजेश खन्नासारखे "लटके-झटके" भाव नसून ही सुसह्य नाचलाय अमिताभ १९८२ च्या "नमक हलाल" मध्ये. ह्या गाण्यापूर्वीचा प्रसंग पाहिला की त्याच्या धुस्मुसळेपणाने पाऊस उप्भोगण्याचे तार्कीक कारण पटतेच पटते. आणि योग्य समेवर स्मिताची साथ गाण्याची खुमारी वाढवते.
आज रपट जायें तो हमें ना उठइयो
आज फिसल जायें तो हमें ना उठइयो
हमें जो उठइयो तो
हमें जो उठइयो तो ख़ुद भी रपट जइयो
आयुष्याच्या संध्याकाळी एक सुरेल संगीत लेणे देणारा एकमेव पंचम! त्याच्या वाचून हा लेख पुरा होणार नाही. बर्मन पिता-पुत्र माझे गोड "व्यसन"! दादा "बाप" होता यात वाद नाही पण पंचम ही काही कमी नव्हता.
पंचमवरील कार्यक्रमात स्वतः विधु विनोद चोप्राने सांगीतले की १९४२ अ लव्ह स्टोरी साठी इले़क्ट्रोनीक वाद्यांपेक्षा पारंपारीक व मोजकीच (सिनेमाच्या काळातील) वाद्यांचाच वापर करण्याचा आग्रह पंचमचाच होता. आणि तो किती सार्थ आहे त्याने दाखवून दिले.
सन १९७१ पासून १९९४ पर्यंत २३ वर्षात तब्बल १७ वेळा नॉमीनेशन मिळाले होते पण १९८३ च्या मासूम नंतर मिळाले थेट मरणोत्तर १९९४ मध्ये १९४२ अ लव्ह स्टोरी साठी !!!
त्यातलेच एक गाणे जावेद अख्तरची शब्दकळा आणि मोजका वाद्यमेळ आणि पडद्यावर सुंदर मनीषा आणि काय पाहीजे गाण्याला!!!
रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम
भीगी भीगी रुत में तुम हम हम तुम
चलते हैं चलते हैं
बजता है जलतरंग पर के छत पे जब
मोतियों जैसा जल बरसाए
बूँदों की ये झड़ी लाई है वो घड़ी
जिसके लिये हम तरसे, हो हो हो रिम झिम रिम झिम
बादल की चादरें ओढ़े हैं वादियां
सारी दिशायें सोई हैं
- गाण्यांचे अधिकार त्या त्या माणसांकडे शाबूत आहेत इथे फक्त संदर्भासाठी आहेत
- काही काही कडवी गुन्गुणायला मदत म्हनून दिलीत आस्वादकांनी थेट चित्रफीती पाहिल्या तरी चालतील
- प्रदीप आदी मान्यवरांनी ही गाणी प्रांतातील लुडबुड मोठ्या मनाने क्षमा करावी
- मी काही समीक्षक+संगीताची जाण असलेला नाही फक्त ऐकणाचा कान असलेला माणूस आहे मनात आले ते खरडले इतकेच !!
प्रतिक्रिया
23 Jul 2015 - 11:18 am | एस
क्या बात है!
लिहित रहा असेच अधनंमधनं का होईना! :-)
23 Jul 2015 - 11:51 am | प्रचेतस
ह्या प्रांतातही दमदार मुशाफिरी.
लेख आवडलाच. :)
23 Jul 2015 - 12:10 pm | रातराणी
मस्त लिहिलं आहे!
23 Jul 2015 - 12:59 pm | मित्रहो
पावसाची जुनी गाणी परत आठवली
23 Jul 2015 - 1:23 pm | पद्मावति
.....सहमत.
23 Jul 2015 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
असंच सतत लिहीत रहा !!
23 Jul 2015 - 1:34 pm | यशोधरा
मस्त!
23 Jul 2015 - 1:36 pm | पैसा
लेख खूप आवडला. सिनेमातला असाच अगदी अविस्मरणीय रोमँटिक सीन म्हणाल तर श्री ४२० मधले प्यार हुवा इकरार हुवा है गाणे आणि त्यातला राजकपूरने स्टुडिओत तयार केलेला पाऊस. ते गाणे विसरणे शक्यच नाही!
23 Jul 2015 - 1:41 pm | प्यारे१
महाराष्ट्रात पाऊस खरंच सुरु झालेला दिसतोय!
मस्त लेख. अजून भरपूर गाणी या लेखात 'बरसवता' येतील
23 Jul 2015 - 4:36 pm | अन्या दातार
श्रावण भाद्रपद येतीलच पुढे. तेंव्हा पुढचे भागही तयार ठेवा ;)
23 Jul 2015 - 4:40 pm | नाखु
आम्चे प्राधीकरण स्नेहींना "साकडे" घातलेय बघू कोल्हापूर कट्ट्यानंतर त्यांना फारशी फुरसत नाहीय, बघू कधी जुगाड जमतोय तो, आता कप्तानानेच काही विनवणी केली तर फरक पडेल कदाचीत!!!!
स्नेही नाखुस
याचकांची पत्रेवाला
23 Jul 2015 - 4:20 pm | अजया
पाऊस सुरु असतानाच सगळी गाणी गुणगुणत लेख वाचला!मजा आली!
23 Jul 2015 - 4:42 pm | कपिलमुनी
पडद्यावरचा पाउस लेखामध्ये सुंदर उतरला आहे.
आता त्यांचा पाउस वेगळा आपला वेगळा !
आपला पाउस म्हणजे लौकर न वाळणारे कपडे , बुटात शिरलेले पाणी , नको त्या ठिकाणी ओली झालेली पँट =)
24 Jul 2015 - 8:31 am | नाखु
पण पडद्यावर पाहून तेव्ढेच स्वप्नरंजन !!!! दुसरं काय?
मुकाट चालक नाखु
24 Jul 2015 - 8:38 am | श्रीरंग_जोशी
लेख खूप भावला.
मला आवडणरं पावसाचं चित्रपटगीत म्हणजे सावन बरसे तरसे दिल.
24 Jul 2015 - 11:06 am | प्यारे१
+१११११
दहक ना? सोनाली बेंद्रे, अक्षय खन्ना
सोनाली + आमिर खान चं 'जो हाल दिल का...' पावसाबद्दल थेट नसलं तरी पावसाळी आहे ;)
24 Jul 2015 - 9:26 am | मनीषा
पाऊस गीतांचा सुंदर आल्बम ...
मला हे ही गाणं आवडतं ..
दिल तेरा दिवाना है सनम...
https://m.youtube.com/watch?v=t64FJ1B-b3g
24 Jul 2015 - 10:15 am | सुबोध खरे
श्री मंगेश पाडगावकरांशी बोलताना ते म्हणाले होते कि बाहेर पाउस असो कि नसो आपल्या मनात पाऊस पडत असला तर आयुष्याला धुमारे फुटतात.
अशा प्रतिभावान कवीची गोष्ट निराळी असली तरी आपल्या मनात पाऊस पडत असेल तर आयुष्य आनंदाचे होते यात शंका नाही.
छान लिहिले आहे. लिहित राहा
24 Jul 2015 - 10:25 am | पैसा
पाडगावकरांच्या पाऊस कविता आठवल्या. किंबहुना दर वर्षी लिज्जत पापडाच्या जाहिरातीत पाडगावकरांची कविता यायची त्याची आठवण झाली.
30 Jul 2015 - 6:01 pm | gogglya
त्यांचे नाव पापडगावकर असे पडले आहे...
24 Jul 2015 - 11:46 am | सस्नेह
मस्त कलेक्शन ! पावसाची सर ओलावून गेली..
25 Jul 2015 - 11:42 am | चौकटराजा
सगळेच पुरेशा पावसाची वाट पहात असल्याने हा लेख युक्तच आहे. नाखुदांची अगदी रसपरिपोष करीत तो लिहिला आहे.
पावसाला एकूणच सिनेमा माध्यमात फार महत्व आहे. त्यातून नायिकेला भडक पिवळ्या, सफेद किंवा केशरी रंगाची साडी नेसलेली ( तलम हो !) की मग काय लोकानी पुन्यांदा तिकटी काढून आणखी काही प्रगती हिरो करतो की काय ? ( अशा भाबड्या) आशेने पुन्हा पिच्चर पहायची सोय निर्माता करीत असतो. मनोज भारत कुमार देशभक्त यालाही मग तो मोह टाळता येत नाही. पण बिमलदा यानी 'परख" मधे चित्रीत केलेला पाउस विसरता येत नाही. कृष्ण धवल असूनही ( किंवा असल्यानेच ) चित्रीकरण फारच सुंदर झालेय त्यात.गन्स ऑफ नॅव्हरोन मधील अंथनी क्वीनला चिम्ब भिजविणार अॅक्शन पॅक्ड पाउस हे त्याचे एक रूप तर " डान्सिंग अॅन्ड सिंगिम्ग इन द रेन " या एम जी एम च्या संगितिकेतील पावसाची तर्हाच वेगळी.
30 Jul 2015 - 12:17 am | बोका-ए-आझम
या दोघांनी आयुष्य समृद्ध केलंय. मग ते बर्मन असोत किंवा तेंडुलकर-द्रविड असोत. मस्तच लेख.
30 Jul 2015 - 6:45 pm | बाबा योगिराज
अरारारारा, काय पाप केलत हे. आता दुकानात बसुन हे गाने कशे आईकु? खषट्मबर पळुन जाईन न्ना अश्यानी....
30 Jul 2015 - 7:20 pm | अनिता ठाकूर
सबक सिनेमातलं सुमन कल्याणपूर ह्यांचं ' बरखारानी जरा थमके बरसो 'हे आणि मुकेश ह्यांचं ' बरखारानी जरा जमके बरसो..' हे..ही दोन्ही गाणी छान आहेत.गाण्यांची चाल अगदी साधी आहे, पण गाणी अगदी श्रवणीय आहेत.
30 Jul 2015 - 8:27 pm | रेवती
धागा मस्तच आहे. गाण्यांची त्या त्या काळातील उदाहरणे बरोबर जमून आलियेत. फक्त एक ते प्रिया राजवंशचे गाणे माहीत नव्हते. आता ऐकते.