दिवस असे कि (भाग ३)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
13 Apr 2015 - 2:25 pm

कोळथर ला आल्यावर पहिला दिवस छान पार पडला . दुसर्या दिवशी मुंजीसाठी करंज्या करायच्या होत्या . सकाळी सगळ जेवण वगैरे तयार करून आम्ही करंज्यांची जय्यत तयार केली . गावातील बायका मदतीला येणार होत्या . ताई च घर मस्त जुन्या पद्धतीच आहे. तिच्याकडे तशीच जुनी खूप भांडी वगैरे आहेत . वेगवेगळ्या प्रकारची भांडी मी तिथे बघितली . "पायली" च भांड आमच्याही घरी आहे पण "निठवी " हे एक मापाच भांड मी तिच्याचकडे पहिल्यांदा बघितलं . त्यांच्या घरी एकूण ८/९ पोळपाट आणि त्याहून जास्त लाटणी होती . वेगवेगळ्या प्रकारचे आणि मापाचे हे पोळपाट होते . बरेचसे लाकडी,काही काळ्या दगडाचे , काही पांढऱ्या दगडाचे तर काही नवीन पद्धतीचे अल्युमिनिअम चे . लाटणी देखील काही बारीक काही जाडी काही रेषावाली अशा प्रकारची . ठरल्या वेळेला एक एक करत सगळ्या बायका जमल्या . हळूहळू माझी देखील ओळख सगळ्यांशी झाली . हास्यविनोद करताना काम केव्हाच पार पडल . सगळ्यांना निरोप देऊन संध्याकाळी परत यायला सांगितलं . संध्याकाळी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता . त्यांचा ठरलेला बांगडीवाला घरी येणार होता . हा कार्यक्रम संध्याकाळी होता म्हणजे आज बहुतेक समुद्रावर जायला मिळणार नाही असंच दिसत होत . मी थोडी हिरमुसले . पण इलाज नव्हता .
गावाकडे सगळ्या गोष्टी वेळेवर आणि लवकर सवय असते . दुपारचा चहा ३/३. ३० म्हणजे शहरी लोकांना खूपच लवकर वाटत . पण गावात हीच वेळ असते . त्यामुळे सांगितल्याप्रमाणे बांगडीवाला ३. ३० हजर होता . त्याचा चहा पिउन पाट वगैरे मांडून होईपर्यंत बायका जमायला सुरवात झाली . आणि ६ वाजता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम संपला देखील . आणि मी समुद्रावर जायला मोकळी झाले .
काल लवकर आल्यामुळे वाळू उबदार होती . आज मात्र थोड्या उशिरा आल्याने कालपेक्षा वाळू खूपच सुखद होती . कालच्या अनुभवाने ईशान आज तयार झाला होता . किनार्यावर जाताच त्याने काठी शोधालन आणि वाळूत रेघोट्या मारायला सुरवात केलन . काल्प्रमाणेच विजयकाका ईशान जवळ थांबले आणि मी आणि रेखाकाकू चालत निघालो . चालत चालत आम्ही जाऊन कातळापाशी पोचलो . मग थोड्या वेळ तिथेच बसलो . लाटा जोरात येउन कातळावर आदळत होत्या . किनार्यावर अलगद येउन विसावणार्या याच लाटा तिथे मात्र वेगाने येउन थडकत होत्या . त्या लाटांना खर तर किनार्याची ओढ होती . पण मधेच हा कातळ आल्याने त्या देखील जणू काही वैरी असल्याप्रमाणे त्याला टक्कर देत होत्या . असे वाटले, किनार्याशी एकरूप होणे हेच एक उद्दिष्ट या लाटांचे होते . पण आपल्या या वाटेमध्ये हा निष्ठुर कातळ आला म्हणून त्यांना काहीच फरक पडला नाही . त्या लाटा त्याच्याशी देखील झुंज देत होत्या . येणारी प्रत्येक लाट त्या दगडाला कणाकणाने झिजवत होती . किती वेळ लागेल माहित नाही पण कधीतरी या लाटांनी झिजून तो खडक तिथून नाहीसा होईल आणि मग किनारा आणि लाटा यांच्यामधला अडथळा दूर होईल . त्या आपल्या उद्दिष्टामध्ये सफल होतील . आपल देखील असाच आहे . काहीजणांच आयुष्य अगदी सुरळीत , आखीवरेखीव असत . तर काही जणांच्या आयुष्यात कधी छोटे तर कधी मोठे अडथळे येतात . त्यांच्यावर मत करणारा आपल ध्येय गाठू शकतो . या लाटांनी मला हाच संदेश दिला . ताठ उभी राहा . कठीण प्रसंग आला तरी त्याला सामोरी जा . मग निश्चितच चांगला काळ येईल . पण त्यासाठी पहिली परीक्षा पार करायला हवी .
रेखाकाकुनी हक मारल्यावर माझी तंद्री भंगली . परत वळायचे होते . ईशान नवीन नवीन कलाकृती घेवून वाट पाहत होता . त्यामुळे तिथून उठून झपाझप चालत परत आलो . ईशान ने आज त्याचे नाव काढले होते . शिवाय एक छोटासा किल्ला बनवला होता . काल्साराखाच आज सूर्यास्त बघितला . तोच पश्चिमेकडचा तारा उगवला आणि मग आम्ही घराकडे परतलो .

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

चांगले सरळ साधे लिहिताय. जरा तो शेवट दवणीय वाटला. पण थीक आहे. लिहित रहा.