काहीच्या काही कविता
तीर्थ
तीर्थ कुठले ? इथे कसे?
कुणी आणले?
काय तो आस्तिक!
कोण त्याचा देव?
काssssही विचारु नका.
तीर्थ घ्या.
ठरले एकदा तीर्थ आहे! तर आहे.
वाद नको. विचार नको.
गंगा काय न् नर्मदा काय....
याच समुद्रात मिसळतात!
बसा निवांत.
तीर्थ घ्या.
बाहेर दंगा आहे फार.
जरा मनातच लोळा.
आकांत नका मांडू
एकांताचा.
तीर्थच ठेवा ना उशाला!
रात्र टाका पायथ्याला.
तीर्थ घ्या.
तीर् घ्या.....
एक काली-पिली कविता
सकाळ-संध्याकाळ फेसबुकवर किंवा इतरत्र स्वतःच्या कित्येक कविता, चित्र, लेख प्रसवणार्या आणि स्वतः अनन्यसाधारण कलाकार असल्याचा साक्षात्कार झालेल्या फेसबुकी प्रतिभावंतांना सविनय अर्पण!
आपल्या दिव्य प्रतिभेची गिरणी अशीच अविरत, अहोरात्र चालू द्या! काल्या-पिल्या जनतेला गिरणीच्या धुराने खोकला आला तरी बेहत्तर, माघार घेऊ नका....
अजून एक - take it with a pinch of salt, don't read too much into it!
तर, सादर आहे -
एक काली-पिली कविता
काळी पँट, पिवळा शर्ट
आमच्या गल्लीत, आम्हीच फ्लर्ट
( दीडशे रे.....)
दीडशे रे..........
एक शाळा होती सुंदर
तीत मुले होती शंभर
मग आणखी आले पन्नास
किती किती झाले रे?
दीडशे रे
दीडशेला भागू मी की, दीडशेने गुणू मी
भागू गुणू, भागू की गुणू
गुणू भागू, गुणू की भागू
दीडशे रे
तो सट्टे कसकसले लावे अन् हरतो हो
लावे अन् हरतो हो
मग किती सेशन गेले, अन् पैसे पण गेले रे
पण आशेवर लढला, अन् खेळतच राही रे
तो डाव खेळ-खेळला, हरला हरला आणि हरला
बिल थकले उधार झाली, उधारीत हाय ती खाल्ली
जहरासाठी पैसे नव्हते रे
दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे
दीडशे रे
<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
सोडल्य दह्यात मिश्या ( करून दाखवले )
prequel 1
मुल प्रेना मोकलाया दाहि दिश्या
तसेच हे आव्हान
==============================================
prequel 2
पण ह्या लेखाचा जबाबदार आहे समाज ,तो समाज जो कंपू बाजी करतो तो समाज जबाबदार
.एक माणूस मिपाबालक म्हणून परवेश करतो एका नवीन घरात ,पण मिळते काय तर धिक्कार तिरस्कार
वाटले होते लहान मुलाला समजून घेतील वडीलधारे
पण इथे मिळाले पार बायको सारखे उणे दुने काढणारे
असो
आमचाही पाउस.....
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
आम्ही पाडलेल्या चकल्या चावायच्या आधी त्या चकल्यांमधले खरे पीठ कोणाचे आहे ते बघावे आणि मग आमच्या चकलीचा आस्वाद घ्यावा...
शीर्षक सुचले नाही
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा
असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा
असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले
अजून केस ओढतो कशास काव्य वाचले
इथून चार चोरले तिथून चार ढापले
करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले
म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले"
छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?"
तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता
तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता?
पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी
उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी?
-- स्वामी संकेतानंद
आता मी पळतो..........
वर्तुळ
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न …
चू. भू. दे. घे.
प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित
वर्तुळ
वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही
आयुष्य व्यापून टाकेल इतका
कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही ….
अपुरेपणाच्या विस्तृत्वाला
कोणतीच रेषा छेदत नसते
कितीही 'सुटावं' म्हटलं
प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते ….
वर्तुळाच्या गोलाईचा
कोणताच एक आकार नाही
मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं
कोणतच एक सूत्र नाही ….
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
तेव्हां
चर्चिल घासलेटच्या साठ्यावर
फणा काढून उभा होता
मी मार्क्सला म्हटलं
पेटवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी माओचीही राख झाली
आता इंद्रायणीतून
भिजलेली गारगोटी काढून त्यावर
अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय
मात्र उजवीकडून येणारा
मुसळधार भगवा पाऊस म्हणाला
रांडेच्या, बघतोच तुला
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना
पुरूष कानात कुजबुजला
माणसं पेटवतोस का ?