आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला

खटासि खट's picture
खटासि खट in जे न देखे रवी...
12 Jul 2015 - 6:10 pm

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
तेव्हां
चर्चिल घासलेटच्या साठ्यावर
फणा काढून उभा होता
मी मार्क्सला म्हटलं
पेटवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी माओचीही राख झाली
आता इंद्रायणीतून
भिजलेली गारगोटी काढून त्यावर
अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय
मात्र उजवीकडून येणारा
मुसळधार भगवा पाऊस म्हणाला
रांडेच्या, बघतोच तुला
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना
पुरूष कानात कुजबुजला
माणसं पेटवतोस का ?
गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात
लागतील तेव्हढे !
फक्त त्या आगीत घाल
सगळे ज्वलनशील ग्रंथ
आणि माझं सूक्तही
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?

काहीच्या काही कवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

12 Jul 2015 - 6:19 pm | प्यारे१

___/\____
ही कविता अजरामर होणार!
मराठी आधुनिकोत्तर साहित्य विश्वात एका चमचमत्या आकाशगंगेची भर.

dadadarekar's picture

12 Jul 2015 - 6:39 pm | dadadarekar

छान

कविता पोचली. नव्वदच्या दशकास जास्त फिट बसत असली तरी थोडा अजून विचार केल्यास आजही तितकीच चपखल आहे.

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 8:50 pm | टवाळ कार्टा

कं लिवलयं
काळाच्या पुढची क्विता....

रातराणी's picture

12 Jul 2015 - 9:30 pm | रातराणी

अफाट!

अस्वस्थामा's picture

12 Jul 2015 - 9:34 pm | अस्वस्थामा

__/|\__

लोल. तुम्हाला "छटाक शरदिनी" हा किताब देण्यात येत आहे.

बॅटमॅन's picture

13 Jul 2015 - 1:34 am | बॅटमॅन

हा हा हा, इंडीड.

नाखु's picture

13 Jul 2015 - 9:39 am | नाखु

कित्येक नवटाक पेक्षा ही छटाक भारी आहे!!!

इथे नव हा नवकवीतेंसाठी वापरला नाही याची नोंद घेणे.

मृत्युन्जय's picture

13 Jul 2015 - 6:42 pm | मृत्युन्जय

खिक्क. ....

मंदार दिलीप जोशी's picture

9 Nov 2015 - 2:17 pm | मंदार दिलीप जोशी

हा हा हा

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2015 - 1:46 am | श्रीरंग_जोशी

स्टोव्ह पळवला गेला तर चूल पेटवा. आपले पूर्वज तेच करत होते ;-) .

कवितेद्वारे केलेले भाष्य आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 1:50 am | डॉ सुहास म्हात्रे

स्टोव्ह पळवला म्हणता... हायला, आता लष्करच्या भाकर्‍या कश्या भाजणार ! आँ ?

काव्य लोल आहे हेवेसांन

दमामि's picture

13 Jul 2015 - 7:36 am | दमामि

वाह!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2015 - 9:07 am | अत्रुप्त आत्मा

ऊंsssssउंब,उंब, भुब्बुक!

अजया's picture

13 Jul 2015 - 9:19 am | अजया

अावडली कविता!

पैसा's picture

13 Jul 2015 - 10:30 am | पैसा

स्टोव्ह पळवला? अजून स्टोव्ह वापरताय? बूर्झ्वा कुठले! तुम्ही त्याचे १०/१२ अणुबाँब पळवून आणा आणि वर्गक्रांती करा. हाकानाका!

लग्नाळलेला संसारी गृहस्थ काय पुरोगामित्व गाजवणार हो ?

विजुभाऊ's picture

13 Jul 2015 - 10:44 am | विजुभाऊ

लग्नात लाजा होम काय स्टोव्ह पेटवून केला होता का? लग्नाचा आणि पुरोगामित्वाचा काय सम्बन्ध? जरा एक्षप्लेन कराल का?

पैसा's picture

13 Jul 2015 - 10:49 am | पैसा

लग्न केलेला पुरुष पुरोगामी म्हणजे पुढेच काय मागे किंवा इकडेतिकडे कुठेही जाऊ शकणार नाही असे त्यांचे म्हणणे असावे. बाकी ही क्रांतीकारी कविता घरातून "रेशनला रॉकेलच्या लायनीत उभे रहा" असे सांगितल्यावर वाटेत मदिरागृह दिसल्यानंतर प्रसवली गेली असावी अशी शंका घेण्यास जागा आहे.

खटासि खट's picture

13 Jul 2015 - 11:07 am | खटासि खट

जवळपास सगळंच बिंग फोडलं की. घरात बायको नसताना लायटर सापडत नाही म्हणून स्टोव्ह पेटवायला घ्यावा तर घासलेट पक्षी रॉकेल नाही आणि वर्गीय फोडणीमुळे ते मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर ...पुढचा खुलासा मॅजेस्टीक गप्पांत करायचा विचार आहे, पण त्या पुण्यात ठेवल्या तरच.

- जो मनुक्ष लिव इन न करता लग्न करतो तो पुरोगामी कसा होऊ शकतो ? ऑं ?

विजुभाऊ's picture

13 Jul 2015 - 10:41 am | विजुभाऊ

बूर्झ्वा.............
क्रान्तीचे धगधगते अग्निकुंड स्टोव्ह मुळे पेतते राहिले होते हे ठाउक नव्हते.
नानु सरंजामे (" मी झोपतो हिमालयाची करुन उशी फेम") यांचे आठवण झाली

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2015 - 11:17 am | विशाल कुलकर्णी

जबराट ! आजच्या काळालासुद्धा तितकीच फिट आणि समर्पक _/\_

संदीप डांगे's picture

13 Jul 2015 - 12:11 pm | संदीप डांगे

बुद्धीला न पेलवल्या जाणारे वजन आहे कवितेत.

आवडली...

शैलेन्द्र's picture

13 Jul 2015 - 12:17 pm | शैलेन्द्र

मस्त , पोचलेली कविता

स्वामी संकेतानंद's picture

13 Jul 2015 - 12:18 pm | स्वामी संकेतानंद

सहीच आहे !!!

उगा काहितरीच's picture

13 Jul 2015 - 12:52 pm | उगा काहितरीच

चटका लागेल असं वास्तव !

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2015 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

किती येळा सांगीतल तुम्हाला
ते आइअनस्टाइन बेन लहान पणापासुनच असच विद्र आहे. तेला घरात घेऊ नका. त्याचा नाद करू नका.
त्यो दिसलं तिकड हात मारतोच. आता पर्यंत त्यानं त्यो इष्ठो इकून त्या पैक्याची दारू बी प्यायली असल.
आता येउदे घराकडे त्याला त्याला पायतानान चांगला तुडवूनच काढतो.
अन तुमाला बी सांगून ठ्युतो पुन्यांदा त्याच्या नादाला लागून श्यान खाल्लात तर माझ्या कड कंप्लेण घिउन यिऊ नका तुमची बी खेट्रान पूजा करीन, आत्ताच साण्गून ठेवितो नंतर बोलियाचा नाय.

एका सांगा तुमी ग्यासची सबशीडी सोडली का?

(आइन्स्टाइन चा बाप) पैजारबुवा

कविता मरो, हे बूर्झ्वा काय प्रकरण आहे?

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2015 - 4:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुला बुर्झ्वा माहीत नाही? छे अगदीच बुर्झ्वा आहेस तू.

पैजारबुवा,

आदूबाळ's picture

13 Jul 2015 - 4:51 pm | आदूबाळ

बघा ना. अगदीच प्रोलिटारिएटसारखं... ह्या:...

बास का राव, सांगा की आता!!

कामगार आणि भांडवलदार असे दोन वर्ग आहेत ना, त्यातला भांडवलदार वर्ग म्हणजे बूर्झ्वा. सर्व उत्पादनाची साधने यांच्या मालकीची असतात आणि ते दुष्ट लोक गरीब बिचार्‍या कामगारांचे शोषण करतात. मध्यमवर्गीयसुद्धा कामगारविरोधीच असतात. थोडक्यात म्हणजे तुम्ही जुनाट मध्यमवर्गीय वगैरे दु..दु..दुत्त लोक.

आनंदी गोपाळ's picture

13 Jul 2015 - 9:22 pm | आनंदी गोपाळ

स्पेलिन्ग लिवा पाहु बूर्झ्वा चं

पैसा's picture

13 Jul 2015 - 10:02 pm | पैसा

गुगला!

आनंदी गोपाळ's picture

14 Jul 2015 - 7:52 am | आनंदी गोपाळ

मला ऑल्रेडी येतंय :P

मृत्युन्जय's picture

13 Jul 2015 - 6:41 pm | मृत्युन्जय

वाह. कॉंग्रेस सरकारवरची ही कविता मनाला एकदम स्पर्षुन गेली. +१००००००००००००००००००००००००००० लाइक्स.

चिगो's picture

14 Jul 2015 - 4:34 pm | चिगो

दाहक.. अत्यंत दाहक कविता..

कोंडमारा झालेल्या भावनांचा भडका उडतोय वाक्यावाक्यातून,
आणि होतेय राखरांगोळी सगळ्या नपुंसक वर्गभेदाची..
ह्यातूनच होणार आता सामाजिक नवनिर्मिती
उकळती, धगधगती आणि तरीही सुंदर आल्हाददायक
स्टोव्हच्या निळ्याशार ज्योतीसारखी..

प्यारे१'s picture

14 Jul 2015 - 9:34 pm | प्यारे१

एक दृश्य डोळ्यासमोर आलं.

ह्ये भलं मोट्टं केबिन. रेड/मरुन कारपेट. जुन्या पद्धतीची लाकडी मोट्टी कपाटं पुस्तकानी ठासून भरलीत. तकडं चार/सा जण बसतील असं सोफासेट. सायबाचं मोट्टं जड टेबल. टेबलावर भारताचा झेंडा आणि बाकी चार मोट्टे ठोकळे. सायेब आसं तितक्याच मोट्ट्या खुर्चीत बसलेत. हाताची बोटं ल्यापटॉप समोर नाचवत २ मिनिटं. चेहर्‍यावर आसुरी आनंद. समोरच्याला काळजी सायेब असं का करतेत....

बगितलं तर समोर मिपा.
सायेब येकदम पेटून खवून प्रतिसाद ल्हितेत.
कोंडमारा झालेल्या भावनांचा...... ;) ;)

(आक्खा प्रतिसाद हलका घ्या मालक.)

चिगो's picture

15 Jul 2015 - 12:15 pm | चिगो

सायेब येकदम पेटून खवून प्रतिसाद ल्हितेत.
कोंडमारा झालेल्या भावनांचा...... ;) ;)

आक्षी बरुबर वळखलंस बग, प्यारे.. ;-)

बाकी तपशिलात चुका हायती, कारण की तुमी कलेक्टर साहेबाचं केबिन नजरेसमोर ठेवूनश्यान प्रतिसाद दिलाय.. आमी सध्या त्या पदावर नाही.. म्हणून समोर फारसं कुणी नसतं, आणि डेस्कटॉप वापरतो बघा.. ;-)

अस्वस्थामा's picture

15 Jul 2015 - 3:57 pm | अस्वस्थामा

अस्लं असतंय व्हय कलेक्टर सायबांचं केबिन ? ह्म्म.. :)

(चिगो, बरेच दिवस काही नवीन लिहिलं नै तुम्ही असं नमूद करतो बादवे.. )

चिगो's picture

15 Jul 2015 - 4:46 pm | चिगो

अस्लं असतंय व्हय कलेक्टर सायबांचं केबिन ? ह्म्म.. :)

असं म्हणतात ब्वॉ.. तशीही ती ठासून भरलेली पुस्तकं फार कामाची नसतात, असंही ऐकलंय.. पण असोच.

आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो. :)

अस्वस्थामा's picture

15 Jul 2015 - 5:11 pm | अस्वस्थामा

आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो. :)

आमच्याकडे सेट म्याक्स नव्हता राव (नै तर आमाला पन दिसलं आस्तं).

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2015 - 5:20 pm | टवाळ कार्टा

आता घ्या मग...अजूनही सुरु असेल तो पिच्चर...सेट मॅक्सवाले मधे मधे दुसर्या गोष्टी दाखवतात :)

कविता शांतपणे वाचल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार !

शब्दबम्बाळ's picture

14 Jul 2015 - 11:15 pm | शब्दबम्बाळ

अगगागागा!!
आईनस्टाईनकडून हि अपेक्षा नव्हती... कशाला आधी वर तोंड करून सिलिंडर सबसिडी सोडायचा ना मग!

खटासि खट's picture

17 Jul 2015 - 8:27 am | खटासि खट

एक नंबरचा नालायक माणूस ! लॉजिकल विचार करायची सवय लावतो लोकांना. कसं चेतवायचं ?

प्रचेतस's picture

15 Jul 2015 - 4:43 pm | प्रचेतस

जबराट कविता.

खटासि खट's picture

9 Nov 2015 - 10:55 am | खटासि खट

..

मारवा's picture

9 Nov 2015 - 12:34 pm | मारवा

खट खट खट