"किंमत"
कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत!
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?
: मिलिंद पदकी
कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत!
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?
: मिलिंद पदकी
पृथ्वीगोलाच्या पोटात अगदी मध्यावर एक
विस्तीर्ण दालन आहे ज्यात सर्व हरविलेले मोजे
जातात. त्यांचा प्रतिदिन वाढणारा ढीग पाहून देव
कपाळाला हात लावतो. एकाही मोज्याची जोडी हजर
नसते. तुम्ही जर तुमच्या लाडक्या मोज्याची जोडी
शोधत बसाल तर एक अब्ज वर्षे लागतील. या वरून हे
सिद्ध होते की मानवाच्या दोन बाजू सारख्याच असल्या
पाहिजेत हा नियम निसर्गालाही मान्य
नाही. पुरुषांनी दोन वेगळे मोजे घातले तर
बायकांनी त्यांस हसू नये असा
नियम करता येईल.पुरुषांनीही हसू नये (पुरुषांना).
बायका असे होऊ देतच नाहीत. बहुधा
त्या एकाच प्रकारचे शेकडो
थेट रात्रीचे नऊ वाजता
हजारएक हात इमेल बघायला स्तब्ध असताना मुळे सर
पोतडीतून आज मारायचा विजयी शब्द काढतात
प्रमाथी,दुरंत,अक्षुन्ण
किंवा ग्रामीणपणे
यंग्राट,अत्रंग,आडभंग
एक मिनिटात अर्थ सांगणे दूरच,मात्र
काही स्त्रिया त्यांच्या शब्दांनी कामोत्तेजित होतात
व सर्व पुरुष खजील, असे मानले जाते.
शब्द-घोडा दुबईतील इंजिनियर,अमेरिकेतील
संगणक-अभियंते, दिल्लीतील भाग्यनियंते,
लंडन-मधील वेटर्स पर्यंत जाऊन न मरता
परत येतो,
एक मिनिटात सर पुढची इमेल पाठवितात: 'हात रांडेच्च्यो"
कॉम्प्युटर बंद करतात,
प्रेरणा
जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी,
बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही.
खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही.
समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे,
काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण.
पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती.
या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग.
लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो.
लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती ,
कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती,
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा,
पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना,
ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं,
गवताच्या पातीशी आता जडलंय नातं,
दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं,
अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं,
कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य,
असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्यांचं
कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं,
डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं,
आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं,
मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न,
आपण फक्त बोलतो,
काही तू बोलते,
काही मी बोलतो,
बोलत बोलत कधी हसते
कधी रडते,
मी हि तसाच बोलतो
हसतो ,
पण तुला काय वाटत
या लोकांना ,
आपल्याकडे बघून काय वाटत,
तू म्हणशील सोड न यार ! ह्यांना काय वाटत ,
त्यांना जे वाटत ते वाटत ,
महत्वाच हे आहे कि आपल्याला काय वाटत .
पण मला वाटत आपल्याला समजून घ्यायला पाहिजे
कि यांना काय वाटत कारण
आपल्यालाही कधी कधी आपल्या सारख्यांना पाहूनकहि तरी वाटत
काय हो काका तुम्हलाला काय वाटत
आमच्याकडे बघुन,
मला वाटत
संकेतानंदांच्या या कवितेवरून प्रेरणा घेत माझाही एक दुबळा प्रयत्न
सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी
इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी
लॅपटॉप मांडीवर ठेवून घरीच केले थेटर मी
डोळे फाडून बघत बैसलो वेडा एक निशाचर मी
पेनड्राईव्हे देणे घेणे करण्यामध्ये तत्पर मी
नवे सिनेमे आणिक सीझन जाणून घेण्या ईगर मी
हर वीकांती शुक्र शनीला बघावा नवा पिक्चर मी
असे घरगुती मनोरंजनाचे हे केले फीचर मी
सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी
इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी
बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण
परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण
प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण
समयसारणी हे निकट हे स्तरण
पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण
आकाशग मग कुंडल तंतु भारण
पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण
बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन
प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण
ग्राभित विदरण का विरुप निःशोण
रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण
संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण
विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन
वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन
कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण
अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण
कविवर्य "विकु" यांची मापी मागून…आणखी येक जिल्बी :D
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29907
---------------------------------------------------------------------------------
मी बारच्या टेबलावर (जुना) संत आहे रेखिला
मित्रालाच सांगतो, (थोडी) पीत जा... असा मी बेवडा
दांभिकांची छुपी जागा, जातिवंतांस सोहळा
ढेकूण नामे किटक डसतो, बारवाल्याचा वायझेडपणा
"पक्षी" देतो प्राण येथे, आणे वेटर बावळा
भाव न जाणता (जो) सोनेरी रंगा भुले
वर्ण असो गोरटा मग होई काळा सावळा
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल)
वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको.
नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-|
वि.सू. आम्ही स्वयंभू असल्याने नो प्रेरणा-बिरणा
=================================================================
धाग्याच्या पुढती उभे अजुनही आशाळभुत चोर १ ते
भाषा कृद्ध, तिची अनेक शकले, चर्चेतुनी सांडते
स्व आरतीत मने समस्त नीजली मिपा झाले खुजे