वात्रटिका- अभियान स्वच्छता
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला
आधी शुभ्र वस्त्र धारण करावे
एक डिझाईनर झाडू आणावे
मग मिडीयाला बोलवावे
स्मायली फोटो चमकावे.
रस्त्यावरी कचरा पसरविला
तोची झाडून स्वच्छ केला
असा स्वच्छता अभियानाचा
नेत्यांनी बोऱ्या वाजविला.