प्रेरणा
जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी,
बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही.
खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही.
समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे,
काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण.
पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती.
या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग.
लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो.
लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती ,
कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती,
मिपा म्हणे 'जेपुना | हा कुठला बे पळपुटेपणा ?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होता लिहाया,
मारे धाग्यावर बैसला | प्रतिसाद काय दिला,
परि तुझ्या लेखाला सोडणार नाही कच्चमजी,
वाजवतो संघटनेची टिमकी| आहे म्हणतो ती खमकी,
आहारे भित्रा भाई | म्हणे मी लिहीणार नाही,
किबोर्ड सोडा रडुबाई | आणी बसा खफ खेळत,
कशाला जमविले कंपुबाज ? नसता बिचारे दिला ताप ,
धाग्यावर प्रतिसाद देत | निपचीत सारे पडले असे,
नव्हते पाहिले मेनबोर्डा | उगाच करी टणाटणा,
म्हणे यंव लिहीन त्यँव लिहीन| आहे का विकली नेट पॅक ?,
लेका वाचनमात्र रहावयाचे वेड| डोक्यात कुठुन शिरले ?,
जेपी म्हणे 'गा मिपाकरा| तुमची कटकट पुरे करा,
दहादा लिवले तरी| हट्ट तुमचाच खरा,
आपण काही लिहीत नाही| नेटबिल शिरी कोण घेई,
वाचनमात्र म्हणा की प्रतिसादक| आपुन आता लिहीणार नाही,
ऐसे बोलुन जेपुन | दुर कळफलक फेकुन,
नेट पॅक बंद करुन| मटकन खाली बैसला .
(इति चालचलाऊ मिपा प्रथमोध्याय समाप्त)
*क्रमश....
वाचने
10121
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी आहे
जेप्या...
मी हाय हितंच
In reply to जेप्या... by नाखु
दिसामाजी काही लिहावे
@जेपी म्हणे 'गा मिपाकरा|
=))
सन्यासाचीही इतकी आसक्ती ???!!
(No subject)
ताटी उघडा जेपीजी ।
+१ फक्त एक दुरूस्ती
In reply to ताटी उघडा जेपीजी । by पगला गजोधर
@"तोटी" टाकून बघा !!! >>
In reply to +१ फक्त एक दुरूस्ती by नाखु
सर्व प्रतिभावंतांना दंडवत.
=))
In reply to सर्व प्रतिभावंतांना दंडवत. by कंजूस
हेच म्हणतो
In reply to सर्व प्रतिभावंतांना दंडवत. by कंजूस
_/\_
उगाच "धन्यवाद" न देत राही , वाढवण्या प्रतिसाद लेखाचे, ...
+१
कोण कृष्ण? कोण अर्जुन? कोण
कोण संजय?
In reply to कोण कृष्ण? कोण अर्जुन? कोण by आतिवास
@कोण संजय? >>> वारलो रे
In reply to कोण संजय? by आदूबाळ
जबराट रे जेप्या.
आज पासून जेपीपण गुरुस्थानी !!
अगदी अगदी!
In reply to आज पासून जेपीपण गुरुस्थानी !! by खटपट्या
लय भारी!
मस्त..
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }मारे धाग्यावर बैसला |
थेट वर्ष
अरे वा !!
आवडल!