हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
7 Sep 2015 - 5:06 pm

पेरणा आणि प्रेरणा

जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती
पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही
....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही
....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही
मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही
दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही
....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई
....... समजून तयाला घेतो, तू मंत्री आगळा नाही
सर्वस्व लाहिले मला, काही ना बाकी ठेवले
मी (उद्)देशास उडवून बसलो, माझी तृष्णा संपली नाही
.........इतुके न स्वतःला घ्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे, तो मंत्री आगळा नाही
या पदातील अपेक्षा मी चूक मानीली नाही
बनलोही असतो राजा, मज पद भेटले नाही
........ स्वःची निर्मम प्रीती, मंत्र्याची वाढविते तृष्णा
........ हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

dive aagarअनर्थशास्त्रअभंगआरोग्यदायी पाककृतीकालगंगाकाहीच्या काही कविताकोडाईकनालचौरागढप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीलावणीवाङ्मयशेतीविठ्ठलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यविडंबनउखाणेम्हणीवाक्प्रचारसुभाषितेविनोदतंत्रkathaaअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकराजकारणरेखाटनस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 5:57 pm | प्राची अश्विनी

:)

पैसा's picture

7 Sep 2015 - 10:31 pm | पैसा

जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!